Design a site like this with WordPress.com
Get started

रंग माझा वेगळा

पुणे वेध ची दशक पूर्ती

‘विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती’,अर्थात  Rational Emotive Behaviour Therapy ही ‘self- worth’ या संकल्पनेच्या जरा विरोधातच! कारण मनुष्याला आत्म मूल्य (self worth) आहे असे म्हटले, की त्यामध्ये कमी- जास्त अशी तुलना ही ओघाने आलीच. आणि मग या तुलनेतूनच अनेक अविवेकी विचार (Irrational beliefs) निर्माण होण्याचा धोका ही आलाच. “मी अमूक- अमूक गोष्टीमध्ये अपेक्षित यश मिळवलेच पाहिजे. आणि जर ते मिळाले नाही, तर मला त्या गोष्टीमध्ये अपयश आले…इतकेच नाही तर माणूस म्हणूनच मी अयशस्वी ठरलो, I am a failure”, इथपर्यंत या विचारांच्या साखळीची मजल जाते. 

आता आपल्याला प्रश्न पडेल की यश आणि अपयश याकडे बघण्याचा विवेकनिष्ठ मार्ग तरी कोणता? तर REBT आपल्याला दोन मार्ग सांगते:

१. या अविवेकी विचारावर सगळ्यात जालीम उपाय म्हणजे self worth या संकल्पनेच्या मुळावरच घाला घालणे! आपण सर्वजण अस्तित्वात आहोत, आणि म्हणूनच एका अर्थी ‘अमोल’ आहोत, equal आहोत. 

२. क्रमांक १ चा विवेकी विचार सतत मनात घोकणे, व स्वतःला पटवून देणे, त्याचा सराव करणे, व मग त्याप्रमाणे वर्तन करणे हे बऱ्याच जणांना थोडे अवघड वाटू शकते. पण REBT ने या समस्येवर ही उपाय सांगितला आहे. आणि तो म्हणजे- माणसा माणसा ची तुलना करायचीच असेल तर ती गुणांविषयी, वर्तनाविषयी असावी, आत्म मूल्याविषयी नव्हे. कारण गुण, वर्तन या गोष्टी बदलण्याची शक्यता प्रत्येकात असते, किंबहुना या गोष्टी काळाच्या ओघात जरूर बदलतात. त्याचा पुरावादेखील quantitatively मिळवता येतो. हे बदल observable असतात. अशा बदलणाऱ्या गुणांवरून एखाद्याचे मूल्य ठरवणे, त्याच्यावर ‘हुशार’, ‘कामचुकार’, ‘ढ’, ‘टॅलेंटेड’, असा ठप्प लावणे हे म्हणजे overgeneralization होय!
त्यामुळे दुसरा मार्ग हे स्पष्ट करतो की माणसाचे आत्म मूल्य अशाच गुणांशी जोडावे जी नित्य आहेत: 

 • १. Alive – माणसाचे अस्तित्व
 • २. Human –  माणूसपण
 • ३. Fallible- कोणत्या ना कोणत्या बाबतीत प्रत्येकाची काही ना काही चूक होणारच, त्याचा स्वीकार. 
 • ४. Complex –  गुण, दोष यांचा बदलत राहणार ratio 
 • ५. Unique- वेगळेपण, इतर सर्वांसारखेच (just like everyone else)

वरील सर्व घटकांमधून येतो तो स्वतःचा, इतरांचा आणि जगाचा विनाअट स्वीकार- Unconditional self, others and world acceptance. 

वेधच्या या वर्षीच्या सूत्रासाठी शेवटचा घटक ‘uniqueness’ हा सगळ्यात महत्वाचा! गेली दोन वर्ष आपण पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत त्या पुणे वेधचे या वर्षाचे सूत्र आहे “रंग माझा वेगळा”. यावर्षी आपल्या भेटीला येणार आहेत प्राजक्ता वढावकर, रुचिरा सावंत, चिंतामणी हसबनीस, डॉ. शरद बावीस्कर व निपुण धर्माधिकारी, ही unique मंडळी. या सर्व मान्यवरांच्या कार्याविषयी अधिक माहिती तुम्हाला सोबतच्या फ्लायर मध्ये वाचता येईलच..

या वर्षीचे सूत्र ऐकताच माझ्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे या सर्वांमध्ये केवढे वेगवेगळेपण आहे. असे असताना हा वेध एका साचेबद्ध लेन्स ने अनुभवता, टिपता येईल का? या सर्व मंडळींचे वेगळेपण कशात असेल? अर्थात या प्रश्नाचे उत्तर आपल्याला वेध च्या या कार्यक्रमात मिळेलच. पण आपण या सर्व मान्यवरांचे वेगळेपण कशात पाहायचे? तर त्यांनी घेतलेल्या unique निर्णयांमध्ये!

मात्र वेधचा  हा कार्यक्रम पाहताना आपण एका गोष्टीची काळजी पण घ्यायला हवी असे मला वाटते…ते म्हणजे, आपला समाज एखाद्याच्या वेगळेपणाला संपूर्ण चांगले किंवा वाईट असे लेबल लावतो. इंग्रजी मध्ये म्हणतात ना, ‘putting on a pedestal’…तसं! पण या विचारला धरुन राहिलं तर या माणसांचे वेगळेपण समजून घेणे अवघड जाईल. “ते वेगळे आहेत म्हणूनच हे करू शकले”, असा विचार केला जाईल. या मान्यवरांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर घेतलेल्या निर्णयांना, त्या मागील विचार, भावना, उद्दिष्टे, या सर्वांना समजून घेण्याचा विवेक पण आपण बाळगला पाहिजे. 

या सर्व मंडळींना भेटल्यावर, त्यांना जाणून घेतल्यावर आपणही आपल्यातले वेगळेपण, माणूसपण, गुण दोषांचा ratio लक्षात घेऊन त्याला polish करून पाहूया! पाहूया ना?  

-केतकी जोशी,
वेध कार्यकर्ती

Advertisement

बुद्धांसोबत क्षणोक्षणी…

पुण्यातल्या एस. एम. जोशी सभागृहातली एक सुरेख सायंकाळ…डॉ. आनंद नाडकर्णीनी लिहिलेल्या आत्तापर्यंतच्या पुस्तकांनी आयपीएचचा एक स्टॉल सजलेला, तर मनोविकास प्रकाशनाच्या पुस्तकांनी नटलेला दुसरा स्टॉल, येणारे लोक थबकताहेत, पुस्तकं हाताळताहेत, काहीजण विकत घेताहेत, काहीजण खूप दिवसांनी एकमेकांची भेट झाल्यामुळे आनंद व्‍यक्‍त करताहेत आणि हळूहळू ते सभागृहात येऊन दाखल होतायत….दाखल होतानाच प्रत्येकाच्या हातात बुद्धाचं सुरेख रेखाटन असलेलं कार्ड आणि त्यामागे असलेली डॉ. नाडकर्णींची कविता रसिकांच्या हातात दिली जातेय असं दृश्य (प्रत्येक रसिक वाचकाला भेट देण्यात आलेलं बुद्धाचं रेखाटन केलेलं कार्ड तन्वी पळशीकर या तरुणीने केलं होतं.) ….ही गोष्ट १६ तारखेच्या म्हणजेच बुद्धपोर्णिमेच्या संध्याकाळी घडलेली…निमित्त होतं, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या ‘बुध्दांसोबत क्षणोक्षणी’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित केलेल्या मुक्त संवाद सत्राचं.

व्‍यासपीठावर ज्येष्ठ प्राच्य विद्या विशारद आणि संशोधक, संस्कृत विषयाचे अभ्यासक, चाळीस वर्षं संस्कृत भाषेचा अविरत अध्यापन करणारे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत भाषा विभाग प्रमुख, वेद आणि बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि संशोधक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाली भाषेचे सहाय्यक अध्यापक, जगातल्या अनेक देशांपर्यंत कार्य पसरलेलं असे डॉ. श्रीकांत बहुलकर, तसंच ३५ वर्षांहून अधिक काळ मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे, श्रीलंकेच्या पॅगोडा मेडिटेशन सेंटरची सुगत आचार्य हे पद प्राप्त केलेले, आयआयटी मुंबई आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंट इथे सन्माननीय अध्यापक आणि सल्लागार असलेले, थायलंडमधल्या वेगवेगळ्या परिषदांमध्ये सामील झालेले, माइंडफुलनेस आणि भगवदगीता यांचे गाढे अभ्यासक असलेले, पाश्चात्य वैद्यकीय वैज्ञानिक पध्दती आणि पौर्वात्य तत्वज्ञान यांची सांगड घालून उपचार करणारे डॉ. राजेंद्र बर्वे, तसंच मनोविकास प्रकाशनाचे संस्थापक/संचालक अरविंद पाटकर, वैद्य ज्योति शिरोडकर आणि इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ म्हणजे आयपीएचचे संस्थापक/संचालक, मुक्तांगण व्‍यसनमुक्‍ती केंद्राचे अध्यक्ष, मानसिक आरोग्यावर विपुल लेखन करणारे, नाटककार, मनोविकासतज्ज्ञ असलेले डॉ. आनंद नाडकर्णी स्थानापन्न झाले होते.

प्रसन्न व्‍यक्‍तिमत्वाच्या ज्योतीने सभागृहात स्थानापन्न झालेल्या रसिकांचं आपल्या मधुर आवाजात स्वागत केलं. मनोज देवकर, अतुल कस्तुरे, दीपा देशमुख अशा काही स्नेह्यांचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आला. ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ या डॉ. आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाची निर्मिती करणारे अरविंद पाटकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत अवघ्या ३ मिनिटांत प्रास्ताविक केलं आणि संपूर्ण सभागृहातलं वातावरण ताजंतवानं झालं. काहीच क्षणांत पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि दिग्गजांच्या गप्पांना सुरूवात झाली. या सगळ्यांचा संवाद एका धाग्यात गुंफायची जबाबदारी ज्योती अतिशय समर्थपणे पार पाडत होती.

माझ्या मनात अनेक प्रश्न उमटत होते, बुध्दांसोबत क्षणोक्षणी म्हणजे काय, बुद्ध इतका सहजी भेटतो का, त्याला भेटायचं असेल तर काय करावं लागेल, कसा प्रवास करावा लागेल, बुद्‍ध म्हणजे जर विचार असेल, तर तो विचार आपल्याला कसा समजेल, आपल्यात कसा रुजेल? डॉ. आनंद नाडकर्णींना भेटलेला बुद्‍ध कसा आहे, डॉ. बर्वेंना बुद्ध कुठे भेटला आणि डॉ. बहुलकरांनी बुद्धाला भेटत असताना किती खोलवर तळ गाठला असेल?

कार्यक्रम सुरू झाला होता, संपूर्ण सभागृह या दिग्गजांना ऐकण्यासाठी आतुर झालेलं होतं. काहीजण तर पुण्याबाहेरून खास हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आले होते. मी व्‍यासपीठावरून बोलणाऱ्यांचं बोलणं ऐकत होते आणि त्याचबरोबर माझ्या मनात उमटलेल्या संवादासोबत बोलतही होते.

डॉ. राजेंद्र बर्वे यांनी बुद्धाची भेट आणि माइंडफुलनेस याविषयी सांगायला सुरुवात केली. ते बोलत असताना आधीचे बर्वे आणि आजचे/या क्षणाचे बर्वे वेगळे आहेत असं वाटत होतं. त्यांना या बुद्धाने काहीतरी दिलंय, त्यांना काहीतरी मिळालंय असंही जाणवत होतं. माइंडफुलनेसबद्दल बोलताना राजेंद्र बर्वे यांनी हुका (VUCA) या संकल्पनेविषयी सांगितलं. ही एक विचारपद्धती असून जगण्यासाठी ती खूप महत्वाची आहे. आज अस्थिर होत चाललेल्या जगात कोणत्या क्षणी काय होईल ते सांगता येत नाही. तसंच वर्तमानात अत्यंत अकल्पितपणे गोष्टी घडताहेत, शिवाय जग कमालीचं गुंतागुंतीचं झालंय. यामुळे माणूस सदैव द्विधा झालाय. अशा वेळी बौद्ध तत्वज्ञान जगाकडे कसं बघायचं याची दृष्टी देतं. खरं तर सुमारे अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी तत्वज्ञानाकडे, व्‍यवहाराकडे, कर्मकांडाकडे, धर्माकडे, जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी बुद्धाने दिली. “अत्त: दीपो भव” – स्वत:ला जाणून घ्या, क्षणोक्षणी स्वत:ला शोधा. जगाला समजून घ्या, जगात दु:ख असतं ते नाकारू नका, असं त्यानं सांगितलं. मनाप्रमाणे न घडणं, किंवा मनाच्या अस्थिर अवस्थेला त्यानं दु:ख असं संबोधलं होतं. त्यासाठी त्यानं अष्टांग योगाचा मार्ग सांगितला होता. पंचशीलाचं पालन करायला सांगितलं. जगाकडे स्वच्छ नजरेने बघायचं. क्षणोक्षणी आपण जजमेंटल होत सगळीकडे बघत असतो. भावना, विचार, विकार, घटना या सगळ्या गोष्टीकडे स्वच्छ नजरेने पहावं आणि त्यांचा स्वीकार करावा कारण ते टिकणारं नाही. प्रत्येकाने माझं दु:ख काय, त्याचं कारण काय, त्याचं निवारण होउ शकतं, या मार्गाने आपण चालायचं आहे. चार आर्यसत्य प्रत्येकाने स्वत:मध्ये शोधावीत असं बुद्धानं म्हटलं. एकदा बुद्धाला कोणीतरी विचारलं, तुम्ही करता काय, तेव्‍हा त्यांनी म्हटलं, मी जेवतो तेव्‍हा जेवतो, चालतो तेव्‍हा चालतो, झोपतो तेव्‍हा झोपतो. आपण असं करतो का? हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. आहे तो क्षण अनुभवणं, जगणं म्हणजेच खरं तर माइंडफुलनेस!

डॉ. राजेंद्र बर्वे यांनी आपल्या आयुष्यात बुद्धाचा प्रवेश कसा झाला, ते सांगितलं. त्यांनी त्या वेळची स्थिती सांगणारी एक हायकू सादर केली:
शांत जलाशय
काठी बसला बेडूक
प्लाँक, उडी मारली
आपल्या शांतपणे चाललेल्या आयुष्यात एकदा मोठ्या बेडकाने उडी मारली, म्हणजे त्या वेळी काय घडलं, अजिंठ्याच्या लेण्या बघताना बुद्‍धाचं शिल्प बघून त्यांना काय जाणवलं, स्वत:च्या आयुष्यात आलेली रिग्रेशनची अवस्था आणि केलेले उपचार, बुद्धाबरोबरचं नातं याबद्दल डॉ. बर्वे खूप प्रांजलपणे बोलले.

त्यानंतर प्राच्यविद्या अभ्यासक, डॉ. श्रीकांत बहुलकर यांच्याकडे बघताना तर लालबहादूर शास्त्री आठवत राहिले. मूर्ती लहान मात्र त्यांचा व्‍यासंग, अभ्यास आणि विद्वत्ता अंगी रुजवलेला हा माणूस बघताना मन आदरानं झुकून गेलं. ते बोलत होते, ऋजूतेनं, सौम्यपणे – इसपू पाचवं शतक – त्या वेळची परिस्थिती कशी होती, वैदिक परंपरेचं प्राबल्य कसं होतं, यज्ञ परंपरेत लोक मग्न होते. माणसानं यज्ञ करावा आणि स्वर्गप्राप्ती करावी अशा प्रकारचा पगडा जनमानसावर होता. वर्णाश्रमाची चौकट घट्ट पकड घेत चालली होती. एकीकडे वैदिक धर्म कर्मकांडात गुंतलेला होता, आणि त्याच वेळी उपनिषदांचा विचारही प्रबळ होत चालला होता. अशा सगळ्या वातावरणात बुद्धांनी आपला विचार मांडायला सुरुवात केली होती. ऐहिक आनंद घेणारं, उपभोग घेणारं असं एक जग आणि आत्मक्लेश करणारं दुसरं जग असे दोन टोकाचे विचार मांडले गेले होते. ही दोन्ही टोकं सोडून बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला होता. त्या वेळच्या विद्वानांनी सांगितलेले जीवनविचार बुद्धांनी नाकारले. त्याविषयीची मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथात केली, तो उतारा बहुलकरांनी श्रोत्यांना वाचून दाखवला.

प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा, ती पडताळून बघा, केवळ मी म्हणतो म्हणून ती करू नका असं स्पष्‍टपणे बुद्धांनी सांगितलं. संसारात पिडलेल्या लोकांना त्यांनी दु:खातून मुक्‍त होण्याचा मार्ग सांगितला. यज्ञात पशुंची आहुती देऊन काहीही होणार नाही, असं सांगून त्यांनी यज्ञ या शब्दाचा अर्थ म्हणजे दान असा सांगितला. त्यांनी वेदपरंपरा, कर्मकांडाची परंपरा मानली नाही, महत्वाचं म्हणजे वेदप्रामाण्य मानलं नाही. जन्मानं कोणी श्रेष्ठ होत नाही, तर कर्माने होतं हेच त्यांनी सांगितलं. इतकंच नाही, तर स्त्रियांना देखील संघामध्ये प्रवेश दिला होता.
डॉ. बहुलकरांचं बोलणं होताच डॉ. आनंद नाडकर्णी यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. कोरोनानं उलथापालथ केलेल्या वातावरणात डॉ. आनंद नाडकर्णींना बुद्ध भेटला आणि आपले विचार व्‍यक्‍त करण्यासाठी त्यांच्या भावना कवितेचं रूप घेत राहिल्या. या संवादसत्रात डॉ. नाडकर्णी यांनी अनेक अर्थांच्या कविता सादर केल्या. मात्र सुरुवातीला डॉ. राजेंद्र बर्वे यांनी सांगितलेल्या माइंडफुलनेसवर त्यांनी एक कविता सादर केली :

मनाने मनात मनाला पाहावे
भाव विचारांचे रंग न्याहाळावे
म्हणू नये कोणा हवेसे नकोसे,
खेळ मात्र त्यांचे अवलोकावे
तुझी पंचेंद्रिये सतत सोबती
उत्तेजना बाह्य हो त्यांचा सोबती
ध्वनी-स्पर्श-स्वाद, दृष्टी आणि गंध
मर्म प्रत्येकाचे ओळखावे
पुढती हे येती अन्य आणि जग
अनुभव तयांना अ-मग्न पहावे
प्रवास पळांचा जळावे फळावे
ढग वादळांच्या पल्याड अंबर
रात-दिवसाचा अनंत हा खेळ
कधी वीज वाजे कधी सप्तरंग
आकाशासाठी हे फक्‍त येणे-जाणे
तसे पहावे रे चित्ताच्या नभास
ना ते कुणाचेही, अंग-रंग घेई
दिसे तैसे नसे निळे किंवा काळे
न लगे तसाच थांग चैतन्याचा

बुध्दासोबत म्हणजे कोणासोबत, बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध म्हणजे विचार असं डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले. बुद्धांनी ग्रंथप्रामाण्य, प्रेषित असणं, दैवतीकरण नाकारलं. त्यांनी स्वत:मधल्या ‘मी’चा म्हणजेच अहंकाराचं निर्वाण करा असं सांगितलं. स्वहित आणि परहित यामधली रेषा पुसून टाकणं बुद्ध शिकवतात. अहंकाराचं निर्वाण करा म्हणजेच विचार, इतरांच्या दु:खाबद्दलची तळमळ म्हणजेच भावना आल्या, स्वहित आणि परहित यांचा मेळ घालणारी सातत्यपूर्ण कृती करा म्हणजेच वर्तन आलं, थोडक्यात म्हणजेच बुद्ध आपल्याला मानसिक आरोग्य शिकवतात. बुद्ध हे जगातले पहिले कॉग्निटिव्‍ह सायकॉलॉजिस्ट आहेत. कारण त्यांनी विचार, भावना, वर्तन या कॉग्निटिव्‍ह सायकॉलॉजी ही जी तिवई मानते तीच त्यांनी मांडली आणि या तिवईकडे कसं बघायचं हे त्यांनी सांगितलं.
बुद्ध हे लोकशिक्षक होते, समाजशिक्षक होते आणि संस्कृती शिक्षकही होते. लोकांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी पाली भाषा वापरली. त्या वेळी त्यांना आत्मज्ञानात विहरत राहता आलं असतं, पण त्यांचा मानवजातीला नवा मार्ग दाखवण्यासाठीचा शोध सुरू होता.

डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. श्रीकांत बहुलकर आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून अनेक गोष्टींची उकल झाली. बुद्‍ध विचारांचे ग्रंथ कसे नष्ट झाले आणि काही ग्रंथ आजही तिबेट, इंडोनेशिया आणि चीन या देशांत कसे जतन केले गेले याविषयी बोललं गेलं. आज चीनमध्ये बौद्धधर्माला जास्त उत्तेजन दिलं जात आहे. बुध्दाचं नवं रूप म्हणजे सेक्युलर बुदिधझम असून याच वेळी माइंडफुलनेसवर कसा रिसर्च सुरू आहे आणि माइंडफुलनेसचा मेंदूवर परिणाम कसा होतो याबद्दल डॉ. बर्वे यांनी सांगितलं. बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा, करुणा यांची मेंदूतली स्थानं सापडताहेत, असं ते म्हणाले. आज अमेरिकेतल्या २० हजार शाळांमधून माइंडफुलनेस शिकवलं जातंय. चिकित्सा करणारं, तपासणारं, अनुभवानं, प्रयोगानं सिद्घ करणारं बुद्धाचं नवं रूप लोभस असून बौद्ध धर्माने कूस बदलली आहे असं डॉ. बर्वे म्हणाले. या वेळी डॉ. नाडकर्णी यांनी डॉ. अल्बर्ट एलिसनं लिहिलेल्या ‘द मिथ ऑफ सेल्फ एस्टिम’ या पुस्तकाचा उल्लेख केला आणि बुद्धाचा विचार आपल्या अखेरच्या काळात एलिसने रुजवण्याचा प्रयत्न कसा केला याबद्दल ते बोलले. याच वेळी आपल्याला भारतातल्या लोकांवर/लोकांसाठी काम करायचं असल्यामुळे आपल्याला लोकपरंपरांपासून फारकत घेता येणार नाही तर लोकांच्या जवळ जाण्यासाठी परंपरांचा अभ्यास करणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. डॉ. नाडकर्णी यांनी भगवदगीता, अद्वैत वेदांत यांचा अभ्यास कसा सुरू झाला आणि तो पुढे कसा जात राहिला याविषयी बोलताना ‘मनमैत्रीच्या देशात’ वेदांत, न्यूरोसायन्स आणि कॉग्निटिव्‍ह सायकॉलॉजी यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांनी कसा केला याविषयी सांगितलं. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नाडकर्णी यांनी बौद्धविचाराचं पसायदान सादर केलं.

या तिन्ही दिग्गजांनी या कार्यक्रमातून बुद्धविचारांतून बुद्धाचा सहवास उपस्थितांना करवला. संपूर्ण सभागृह बुद्धमय झालेल्या वातावरणात विहार करत होतं. खरंच, एक चांगला विचार, चांगली दिशा, आयुष्याचं शांत सरोवर कसं अबाधित राखावं, त्यातल्या अलगद उमटलेल्या हळुवार तरंगाकडे कसं बघावं आणि आपल्या आत दडलेला, आपल्याला सोबत करणारा बुद्ध कसा शोधावा हे या कार्यक्रमाने सांगितलं.

डॉ. आनंद नाडकर्णी, तुम्ही मीच नव्‍हे, तर महाराष्ट्र आणि त्याच्या सर्व सीमा ओलांडून गेलेल्या सर्वांची आवडती व्‍यक्‍ती आहात. तुमचं कार्यकर्तृत्व, तुमचा उत्साह, तुमच्यातलं माणूसपण आम्हाला आमचं आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी खूप काही देत असतं. आजही तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने किती भरभरून दिलंत.
आज मनाचा तळ ढवळून निघालेला असताना, सगळं वर्तमान अस्वस्थ झालेलं असताना, सगळ्या स्तरावर हिंसेंचीच भाषा सुरू असताना तुम्ही आपल्या सोबत बुद्धाला घेऊन आलात आणि आम्हाला आश्वस्त केलंत, आमचा बुद्ध शोधण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलंत, तेही कसं, तर हसतखेळत, आमच्या मनात कुठलंही न्यून न येऊ देता, आमच्यासमोर मैत्रीचा/स्नेहाचा हात पुढे करून – मी/आम्ही तुमचे खूप खूप ऋणी आहोत.

‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ या पुस्तकाची सोबत किती महत्वाची आहे, हे पुस्तक वाचूनच प्रत्येकाला कळू शकेल. जरूर वाचावं – मनोविकास प्रकाशनाचं डॉ. आनंद नाडकर्णी लिखित ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’!


दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com

मनबुध्दाच्या मयुरनृत्याची मैफल

“बुध्दांसह क्षणोक्षणी” या डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या कवितांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी आमच्या वेध चळवळीतील आमचे पालक श्री. दीपक पळशीकर सर यांच्यामुळे लाभली. नोव्हेंबरमध्ये डॉ. नाडकर्णी यांनी त्यांच्या कोविडकाळात लिहिलेल्या कवितांचे अभिवाचन केले होते. त्याच वेळी या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणा केली गेली होती. त्यामुळे या सोहोळ्याची उत्सुकता तेव्हापासूनच होती. त्या उत्सुकतेची सहर्ष प्रतिपूर्ती आज झाली.

स्टेजवर पुणे वेधच्या डॉ. ज्योती शिरोडकर होत्या, मनोविकासतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी होते, वैदिक आणि बौध्द इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर होते, प्रख्यात मनोविकासतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे होते. खरे तर व्यासपीठावर स्थानापन्न अशा विद्वानांना पाहून मन आदराच्या भाराने झुकते, सचेत होते. मात्र आजच्या या कार्यक्रमात थोडा वेगळा अनुभव आला. पूर्ण कार्यक्रमभर मन एका ताणरहित, भाररहित मुक्तावस्थेत होते, एका वेगळ्याच प्रतलावर स्थित होते. कारण व्यासपीठावरील व्यक्तींच्या मुखातून बुध्द पाझरत होता, आणि तो श्रोत्यांच्या मनातील बुध्दाला रिझवत होता, चेतवत होता, जागवत होता. पूर्ण सभागृह जणू बुध्दांच्या अस्तित्वाने एकतान झाले होते. मेघांच्या दर्शनाने भान हरपलेल्या मोराने नृत्य करावे तसे सारे सभागृह उदात्त भावनांच्या लयबध्द लालित्यात मग्न झाले होते.

Volatility, uncertainty, complexity and ambiguity म्हणजे अस्थिरता, अनिश्चितता, जटिलता आणि संदिग्धता यांच्या भोवऱ्यात आपण सारे अडकलेले आहोत. समोरच्या माणसाचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती मनाच्या तराजूने जोखायची आणि त्यानुसार त्या माणसाबद्दल मत बनविण्याची सवय आपल्याला फार लागलेली आहे. नको त्या अनावश्यक माहित्यांचा मारा सतत आपल्यावर होतो आहे. त्या प्रत्येक माहितीमुळे भावनांचे पडसाद सतत मनात उमटत असतात, आणि मनात विचारांचे काहूर माजलेले असते. या काहुरामुळे मनाच्या गाभाऱ्यात जपलेला बुध्द पार झाकोळून जातो. आजच्या कार्यक्रमात काही वेळासाठी का होईना ते काहूर शमले. “(ज्ञानप्राप्तीसाठी) दुसऱ्या कुणावर अवलंबून राहू नका, स्वतःच्या आधारावर उभे राहा” असे सांगणारा बुध्द व्यासपीठावरील वक्त्यांच्या मुखातून प्रकटला आणि मनाच्या गाभाऱ्यात खोल लपलेल्या बुध्दाचे ओझरते का होईना पण दर्शन झाले.

इसवीसनापूर्वीचे पाचवे, सहावे शतक हा बुध्दाचा ऐतिहासिक काळ. उपनिषदे रचली गेली तो हा काळ. एकीकडे कर्मकांडात्मक, भोगविलासात्मक यज्ञसंस्कृती तर दुसरीकडे आत्मक्लेशातून ज्ञानप्राप्ती मिळवू पाहणारी महावीरांची श्रमणसंस्कृती. या दोन्हीच्या मधला मार्ग निवडणारा बुध्द. बुध्दिप्रामाण्य मानणारा, प्रत्येक गोष्ट तपासून अनुसरणारा, अंतर्मुख होउन शोध घेणारा. वेदांतील विचार स्विकारणारा पण त्यांचे प्रामाण्य नाकारणारा. आधुनिक विज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत असणारा.

दोन्ही मनोविकासतज्ज्ञांनी बुध्दाचे हे स्वरुप मोठ्या देखणेपणाने मांडले. आधुनिक मानसशास्त्राशी त्यांची संगती खुबीने उलगडली. डॉ. बहुलीकरांनी काळाची चौकट आणि तत्कालिन समाजजीवनाची वीण वर्णन केली. ज्योतीताईंनी कार्यक्रमाचा सारा प्रवाह सुविहित ठेवला.

ज्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा हा सोहळा होता ते “बुध्दांसह क्षणोक्षणी” हे पुस्तक डॉ. नाडकर्णींच्या बौध्द तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची टिपणे आहेत. ती आपोआप काव्यरुपात उमटत गेली. प्रत्येक कवितेचे निरुपणही त्यांनी शेजारच्या पानावर केले आहे.

एका अर्थी हे पुस्तक म्हणजे VUCA च्या आवर्तात सापडलेल्या तुम्हाआम्हा सर्वांसाठी सुखाचे आश्रयस्थान आहे, निवारा आहे. जगाच्या कोलाहलात वावरताना स्वत:साठी थोडा वेळ काढून, हातात कॉफीचा कप घेउन यातील रोज एक तरी कविता रोज वाचावी. मन निववावे, त्या क्षणात विहरावे, तेव्हढ्यापुरते सारे आवर्त, सारे ताण विसरुन जावे. रोज आपल्या हक्काचे पर्यटनस्थळ – आपलेच शांत मन एकदा तरी गाठावे.

मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे देखणे पुस्तक प्रत्येक सुबुध्द वाचकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे आहे.

जेव्हा एखादा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरेल मैफिलीसारखा रंगतो, तेव्हा ते पुस्तक अंतर्मुख करणाऱ्या आनंदाची पर्वणी घेउन येणार यात शंकाच नाही.

– मंदार परांजपे, वेध

छंदबद्ध

यूट्यूबवरी वेधची झलक आली
आर्निका नामक एक पाहुणी ती

धाव घेई गूगलकडे लगेच
घेतला शोध तिचा मग लागलीच

नि शोधमोहीम अपूर्णच राहिली
अभ्यासाची लुडबूड उगा झाली

वाट बघूया असे ठरविले मी
काही दिवसांमध्ये विसरले ही

भाग आला पाहिला तत्क्षणी मी
भारावुनि पार मग गेले बाई

लावले वेड तिने मला वृत्तांचे
छंदोरचना झपाटून वाचले

ते उमजण्यात काळ अल्प गेला
लिहिण्या उशीर रे त्यास्तव झाला

खुशाल म्हणा अता लेट लतीफ
परि अढी नको मजला करा माफ

(मात्रावृत्त- दिंडी)


अशी एक कन्या मराठी असे ती
तशी वेधची बाळमैत्रीण ही
हिचे फार भाषेवरी प्रेम तैसेच
विज्ञानही लाडके खास की
हिचे बाल्य श्रीस्थानके आणि गेलीच
ती दूरदेशी तिथे राहते
तरी यक्ष आणि प्रियेसारखी प्रीत
ही मायभाषेवरी दीसते
नसे कोणता हेल वा भेसळीला
न जागा दिली वाटते हो तिने
परी आंग्लभाषेत ॲक्सेंट तीचा
बहू खास की राखलासे तिने
पहा दोन कप्पे असे टप्परा*
लाजवीती असे घट्टसे पॅक ते
(टप्परवेअर ला)

जितक्या हि भाषा तितक्याच रीती
असे बोलणे केवढे दिव्य ते
तशी शिक्षणाने ति विज्ञान शाखेत
संपादकाची तिची भूमिका
तरी जीवशास्त्रासवे छंदशास्त्रा
वरी जीव तिचा जडावा न का
भुजंगप्रयातीतले टोमणे वा
असो मालिनीतील कॉमेंटरी
तिचे फार पूर्वीच छंदावरी प्रेम
आले अशी वाटते खातरी*
(त्री चं तरी करून लगावलीत कोंबण्याचा केविलवाणा प्रयत्न. चूभूद्याघ्या)
कधी ऐकिली फारसी ना कळे
फारशी किंतु नादावली ती तरी
मनी घेतले की शिकाया सुरु ऐसि
भाषेसही आवडे ती खरी
जशी घेतली ग्रीक तालीम खाशी
तसे झाले तिचे ते गुरू
अशी जाहली ही ग यात्रा तिची जी
न थांबेल संपेल राही सुरू
नसे वाक्य शब्दाक्षरांएवढी
एक भाषा असे भावना त्यात रे नि भाषेचिया आठवांचा असा
त्रास होतो मनी डाग तोचि उरे
तरी एक शब्दे कुणाच्या मनी
घातली फुंकर त्या चटक्यांवरी
पुरा डाग नाही मिटे तो परि
वेदना मात्र होई कमी ती तरी
असे आणखी खूप बोलायचे
किंतु हे वृत्त सारे न झेपे मला
अता जाउनी बांधणीच्या कवीता
हि अभ्यासते वाचते मी चला
तिचा वेधचा व्हीडियो पाहुनी
घेतली प्रेरणा मी पहा तुम्हिही
इतिवृत्त वाचायचे जाहले की
असे ब्लॉगही वेधचा सोबती

(अक्षरगणवृत्त- वागीश्वरी/ सुमंदारमाला)

राष्ट्रीय वेध मध्ये हसऱ्या चेहऱ्याच्या, बोलक्या डोळ्यांच्या आर्निका परांजपेशी ओळख झाली आणि छंद आणि वृत्तांच्या रंगीत जगाची दारं उघडली गेली. तसं शाळेत शिकलेल्या कवितांमधून छंद भेटले होतेच पण त्यांच्याशी मैत्री मात्र झाली नाही. मात्र तिच्या मुलाखतीतून आणि बांधणीच्या कविता ह्या You Tube channel ने हा वृतांचा नवा छंद दिला आणि मग तिच्या विषयी लिहिताना छंदबद्ध कविता का लिहू नये असं वाटून गेलं, आणि मग छंदोरचना हे माधव ज्युलियनांचं पुस्तक आणि बांधणीच्या कविता अशा समांतर ट्रॅक वरून गाडी निघाली!

आभा,
कार्यकर्ती,
वेध

“राहुल जाधव – मुक्तांगणच्या स्वप्नाची सार्थकपूर्ती”

मातीची मशागत केली जाते, नंतर पेरणी, सिंचन, रोपांची वाढ, त्यांची काळजी – अशा मोठ्या प्रक्रियेनंतर पिकांत दाणा भरतो, शेत बहरते. मात्र हे बहरलेले शेत शेतकऱ्याच्या डोळ्यांनी मातीत पहिला हात घालण्याआधीच पाहिलेले असते. सारे कष्ट त्याच्यासाठी केवळ त्याच स्वप्नाचा पाठलाग असतात.

डॉ. अनिता (सुनंदा) आणि अनिल अवचटांनी असेच एक स्वप्न मुक्तांगणच्या रुपात पाहिले होते, पुलं आणि सुनीताबाईंचे साधार पाठबळ या स्वप्नाला लाभले होते. अनिता अवचटांच्या पश्चात डॉ. अनिल अवचट, सौ. मुक्ता अवचट-पुणतांबेकर, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या सारख्यांच्या समर्थ हातांनी हे स्वप्न पेलून धरले. १९८६ ते २०२१ अशा ३५ वर्षात मुक्तांगण व्यसनमुक्ती-केंद्राने काय सामाजिक चमत्कार घडवून आणला आहे हे अनुभवायचे असेल तर २०२१ च्या राष्ट्रीय वेध मधील राहुल जाधव यांची डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा!

वेधच्या व्यासपीठावर सांगितल्या गेलेल्या गोष्टी नेहमीच आगळ्यावेगळ्या असतात. रेल्वे स्टेशनवर रॅगपिकर असलेला विकी रॉय आंतरराष्ट्रीय ख्यातीचा फोटोग्राफर बनतो त्याची गोष्ट तुम्ही वेधच्या व्यासपीठावर पाहिली असेल. त्यातील सुखद धक्का, माणसाच्या आयुष्यात होणारे विधायक, आमूलाग्र बदल आपल्याला एकप्रकारचा निरपेक्ष आनंद, दिलासा देऊन जातात. ‘अरे, असंही होऊ शकतं बरं का, जगात इतकं चांगलही घडू शकतं’ – अशी उभारी मनाला देतात. राहुल जाधवची गोष्ट याच्या मैलोगणती पुढे जाते.

लालबाग ते ठाणे, ठाणे ते डोंबिवली असा उताराचा प्रवास करणाऱ्या निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला राहुल. त्याच्यातील असामान्य काय ते ओळखू न शकलेल्या शिक्षण-व्यवस्थेचा बळी ठरतो. रूढ-धोपटमार्गाने प्रतिष्ठा आणि पैसा आपल्याला मिळूच शकणार नाही याची खात्री पटल्यावर ‘इझी मनी’चा फुलप्रूफ मार्ग – गुंडगिरी स्वीकारतो. खिशातील पिस्तूलाचा बार काढला तर लोक सैरावैरा पळतात, आपली दहशत निर्माण होते, शिवाय पैसाही मिळतो. पण यात घर तुटतं, मग बाहेर गुंड मात्र आतून पूर्ण घाबरून गेलेला असा दुहेरी व्यक्तिमत्वाचा माणूस तयार होतो. घरातून, जगाकडून माया मिळत नाही म्हणून पोटाशी पाय जुळवून, स्वतःला पांघरुणात लपवून झोपण्याची वेळ येते. एकीकडे अटक टाळण्यासाठी पळत असताना, शाळेतली, कॉलेजातली, तारुण्यातली अपुरी राहिलेली स्वप्ने पाहण्यासाठी तो त्या त्या ठिकाणी फिरतो.

अटक होते, चार वर्षे तुरुंगात जातात. अनेक केसेस अंगावर असतात. त्यातून सुटण्यासाठी वकील हवा असतो, तो परवडत नाही, मग स्वतःच कायद्याचा अभ्यास करतो. सर्व केसेसमधून मोकळा होऊन जगात प्रामाणिकपणाचं आयुष्य जगायला येतो, तेव्हा जग ते जगू देत नाही. जगाचं काही चुकीचं नसतं, जग त्याला घाबरतं, त्याच्यावर विश्वास ठेऊ शकत नसतं. मग हा व्यसनाधीन होतो, दारू आणि ड्रग्जच्या आहारी जातो. त्यातून सुटका करून घेण्यासाठी मुक्तांगणमध्ये जातो, एकदा, दोनदा नाही सात वेळा.

मुक्तांगणमध्ये घडणारा स्वीकार आणि बाहेर मिळणारे नकार यांच्या द्वंद्वात घुसमटून जातो. शेवटच्या वेळी मी आता मुक्तांगणच्या बाहेर जाणारच नाही असा हट्ट धरून बसतो. तिथल्या हाऊसकीपिंगच्या कामात स्वतःला झोकून देतो. स्वच्छ होणारे प्रत्येक टॉयलेट, हॅल्युसिनेशनमध्ये गेलेल्या पेशंटची केलेली स्वच्छता जणू याच्या मनावर चढलेली पुटं स्वच्छ करते. बाह्यजगातली हातांनी केलेली चकाकती स्वच्छता याच्या मनात प्रकाश उजळत जाते. बरे झालेल्या पेशंटच्या नातेवाईकांकडून मिळणारी प्रशंसा याला माणूस म्हणून उभारी देते.

राहुलची मानसिक उत्क्रांती आणि मुक्तांगणमधील व्यावसायिक प्रगती चालूच राहते. तो आता हाऊसकीपिंग विभागाचा मॅनेजर आणि समुपदेशक बनतो. लग्न करतो, सुयोग्य, काळजी घेणाऱ्या पत्नीमुळे त्याचं आयुष्य स्थिर होतं. वयाच्या चाळीशीत पदवी परीक्षेचा अभ्यास करतो. आजच्या राहुलचं बोलणं ऐकून हा कधी ‘त्या’ जगात राहिला असेल असं वाटतही नाही. अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने तो स्वतःच्या भूतकाळाविषयी बोलत असतो, जणू दुसऱ्याच कुणाची गोष्ट सांगतो आहे.

पोलिसांपासून, जगापासून पाळणारा राहुल आज ‘धावतो’. गेट वे ऑफ इंडिया ते इंडिया गेट असे तो धावला आहे. पुणे ते डोंबिवली/मुंबई अंतर तो सहज धावून काढतो. पाहिले साठ किमी भूत, वर्तमान, भविष्याचे विचार त्याच्या मनःपटलावर उमटत राहतात, मात्र खोपोलीच्या पुढे त्याच मन निभ्रांत होतं, शरीर हलकं होतं. योग्यांना चिरकाल लाभणारी ब्रह्मस्थिती त्याला काही काळ गवसते, याहून मोठं वैभव कोणतं?

त्याला सात वेळा पुनःपुन्हा स्वीकारणारे, पिस्तुलाऐवजी टॉयलेट साफ करण्याचा ब्रश हातात असणे अधिक चांगलं आहे हे पटवून देणारं मुक्तांगण! एखाद्याच्या मनात होणारी ही क्रांती आणि त्यातून घडणारी उत्क्रांती – पुलं, सुनीताबाई आणि डॉ. अनिता अवचटांनी पेरलेले स्वप्न राहुलसारख्या अनेकांच्या रुपात साकार झाले आहे. याचा अनुभव घेणंही किती सुखद धक्कादायक, आनंदाचं, मनाला उभारी देणारं आहे!

राहुलची मुलाखत भावभावनांचा रोलरकोस्टर आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी हा एक सिनेमाच रचल्यासारखी ही मुलाखत झाली आहे. मुक्तांगण नावाची मनाची प्रयोगशाळा मध्यवर्ती भूमिकेत असलेला सिनेमाही असा की, रमेश सिप्पी ते सुमित्रा भावे अशी या सिनेमाची कथा वळणे घेत जाते.

यातून मिळणारे संचित भलेमोठे आहे. पुढले अनेक दिवस याचे विविध पैलू आठवून स्वतःच्या मनाची मशागत करावी असे आहे. मुक्तांगणने पेरलेल्या स्वप्नांच्या सार्थकपूर्तीचे प्रतीक बनलेला राहुल जाधव वेधच्या व्यासपीठावरील एक महानायक बनला आहे!

– मंदार परांजपे, कार्यकर्ते, वेध

मुलाखतीची लिंक: https://youtu.be/U3hhsks0kFs

सुभाषिनी अर्निका – भाषेविषयी ऐसपैस गप्पा

“राष्ट्रीय वेध” मालिकेतील दुसरे पुष्प – अर्निका परांजपे यांची मुलाखत शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी Avahan IPH च्या युट्युब चॅनेलवर प्रसारीत झाली. मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ठाण्यातील Avahan च्या स्टुडिओतुन लंडनमधील अर्निकाशी गप्पा मारल्या. तंत्रज्ञानाच्या सुविधांमुळे भौगोलिक अंतर क्षणात मिटवून टाकता येते, अन्यथा या गप्पांसाठी बराच वेळ, पैसे आणि कार्बन खर्च झाला असता.

वेधमधील गप्पा नेहमीच आनंद-शिक्षणाचा ठेवा असतात. मनोरंजनाच्या शर्करा अवगुंठीत कुपीतून समृद्ध अनुभवाचा ठेवा घेऊन त्या सामोऱ्या येतात. अर्निकाच्या एका तासाच्या या मुलाखतीतून ‘भाषा’ या विषयातील मूलगामी चिंतन मनोरंजक गप्पांच्या रुपात सामोरे आले.

अर्निकाचे शिक्षण बायोमेडिकल सायन्समध्ये झाले आहे, आणि ती सिनियर मेडिकल एडिटर म्हणून कार्यरत आहे. औषधोपचारातील जटील माहिती, संकल्पना डॉक्टर, नर्सेस, रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांना त्यांच्या त्यांच्या भाषेत समजावून देण्यासाठी आवश्यक दस्तऐवज निर्माण करणे असे तिच्या कामाचे स्वरूप आहे. ही तिची ‘उपजीविका’ असली तरी तिची ‘मुख्य’ जीविका भाषांवर प्रेम करणे, भाषांचे लाडकोड पुरविणे आहे. अर्थात, दोन्ही जीविकांमध्ये चांगला समन्वय आहे, या अर्थाने अर्निका फार भाग्यवान आहे.

अर्निकाची गोष्ट तशी रोचक आहे. आठवीपर्यंत ठाण्याच्या सरस्वती शाळेत मराठी माध्यमात शिकलेली अर्निका पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली. इंग्रजी भाषेच्या पर्यावरणाशी जुळवून घेताना तिला थोडा त्रास झाला, तसेच इतिहास, भूगोल या विषयातील गाभाही देशबदलामुळे बदलला. विज्ञान आणि गणित हेच काय ते जुने साथी नव्या देशी सोबतीला राहिले, आणि त्यामुळे विज्ञान विषयात तिचे करियर घडले.

असे असले तरी ‘भाषा’ तिचे पाहिले प्रेम होते आणि आहे. उत्तम मराठी भाषेचे संस्कार लहानपणापासुन घडले होतेच. आनंद साजरा करण्याची त्यांची कौटुंबिक पद्धत कविता म्हणायच्या आणि ऐकायच्या. भाषेची लय, भाषेचा नाद, शब्दांतील तालबद्धता यांचे संस्कार आपसूकच तिच्यावर घडले होते. त्यामुळे तिला फारसी भाषेतील नादाने जसे खुणावले तसे उच्चशिक्षण घेताना सायप्रस आणि ग्रीसमधील मित्रमंडळी लाभल्यावर ती ग्रीक भाषाही तितक्याच आत्मीयतेने शिकली. मराठी, इंग्रजी, फारसी आणि ग्रीक भाषेची जाणकार आणि त्यातील काव्याची आस्वादक अशी तिची आजची ओळख आहे, भविष्यात दक्षिण भारतातील एक – विशेषतः तामिळ आणि आफ्रिकेतील एक – विशेषतः स्वाहिली भाषा शिकण्याची तिची इच्छा आहे.

भाषेतील शब्दांचे भाषांतर होऊ शकते, त्यातील नाद दुसऱ्या भाषेत आणता येत नाही. ‘ए, असं काय गं?’ या वाक्यातील ‘असं’ आणि ‘गं’ यातील ध्वनीची लांबण भाषांतरित करणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक भाषा निराळी असते. भाषेच्या उगमापासून आजपर्यंत असंख्य लोकांनी त्या भाषेवर संस्कार केलेले असतात. भाषेच्या ठिकाणची भौगोलिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय परिस्थिती, इतिहास, धर्म, अध्यात्म अशा असंख्य गोष्टींचा प्रभाव भाषेवर पडलेला असतो. भाषा नित्यनूतन असते तेव्हढीच प्राचीन-पुरातन असते. भाषा इतर भगिनींच्या संसारातून अनेक गोष्टी मागून घेत असते, आपल्याकडील त्यांना देत असते. भाषा सातत्याने समृद्ध होत असते. ग्रीक भाषेत मुलं ‘करतात’, इंग्रजीत ती ‘असतात’ तर मराठीत ती ‘होतात’. इंग्रजीत teaching आणि learning असते, तर मराठीत शिकणे आणि शिकविणे. इंग्रजीत या दोन्ही क्रिया परस्परांपासून वेगळ्या मानल्या गेल्या आहेत, तर मराठी या क्रियांत फारसा फरक नाही असे मानते. अशा अनेक गमतीजमती अर्निकाला समजत गेल्या, तसे तिचे भाषांवरील प्रेम प्रगल्भ होत गेले.

काव्यातील छंदबद्धता आणि वृत्तबद्धता जटीलता नव्हे तर सुलभता निर्माण करण्यासाठी असते. मौखिक परंपरेत शब्द लक्षात ठेवण्यासाठी वृत्त आणि छंद उदयास आले. कवींना त्या त्या वृत्तातच शब्द स्फुरतात. सामान्य जनांना त्यातील व्याकरण समजून न आल्याने ते जटील आहे अशी भावना निर्माण होते. वृत्तबद्ध काव्यातील सौंदर्य उलगडून दाखविण्यासाठी अर्निकाने “बांधणीच्या कविता” नावाने एक युट्युब चॅनेल सुरू केले आहे, त्यात ती अतिशय रोचक आणि सोप्या भाषेत कवितेचे व्याकरण समजावून सांगते.

अर्निका शब्दाचा अर्थ युरोपातील पहाडी भागात आढळणारे (कोकराच्या मऊसूत त्वचेसारखा स्पर्श असणारे) एक औषधी फुल असा आहे. अर्निकाची भाषाही तशीच मऊसूत, सौम्य आहे. तिचे भाषेवर नितांत प्रेम आहे, ते प्रेम तिच्या शब्दांतून व्यक्त होत असते. इंग्लंडमध्ये एका इराणी आजीला वाट दाखविताना ती एक दोन वाक्येच फार्सीतून बोलली, पण त्यातून समोरच्या अफगाण निर्वासित स्त्रीच्या मनाची तार छेडली गेली. आजवर अफगाणिस्तानात तिने जे फार्सी शब्द ऐकले होते ते केवळ भीती, हिंसा, दहशत यांची पार्श्वभूमी घेऊन आलेले होते. त्यातून फार्सीविषयीची अढी तिच्या मनात निर्माण झाली होती. फार्सीतून इतक्या प्रेमानेही बोलता येते याची जाणीव तिला आयुष्यात पहिल्यांदाच झाली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. भाषेवर प्रेम करणाऱ्या एखादीला याहून मौल्यवान बक्षीस अजून काय हवे असेल?

अर्निकाची मुलाखत डोंगरातून वाहणाऱ्या पाटाच्या पाण्यासारखी खळाळती होती. कुठे जायचे नाही, कुठे पोहोचायचे नाही, आहे तो क्षण, आहे ती भावना शब्दांच्या लेण्यांनी सुंदर करायची, ते सौंदर्य मनात साठवून ठेवायचे आणि पुढल्या क्षणाला सामोरे जायचे. अशी ही भाषांमध्ये रमलेली गोड मुलगी – राष्ट्रीय वेधमुळे ती सर्व मराठी भाषिकांना परिचित झाली. तिचा ब्लॉग, तिचे युट्युब चॅनेल याद्वारे तिच्याशी जोडले जाणे नक्कीच आनंददायी असेल.

-मंदार परांजपे,
कार्यकर्ते,
वेध

कवितेचा वेध घेणारी सोनेरी संध्याकाळ

आजवर IPH आणि वेध ने मिळून मला (आणि इतर अनेकांना) कितीतरी सुंदर दिवस दिलेत. कॅलेंडरमध्ये जशा निळ्या आणि लाल तारखा असतात, तशा वेध किंवा वेध संबंधित इतर कार्यक्रम असतात त्या तारखा मला नेहमी सोनेरी वाटतात. त्याआधी आणि नंतरचे कितीतरी दिवस त्याच एका दिवसाचे विचार मनात घोळत असतात आणि इतके दिवस पुरेल इतकी ऊर्जा त्या दिवसातून मिळालेली असते. गेलं दीड वर्ष जगातील इतर अनेक गोष्टींप्रमाणे या सोनेरी दिवसांमध्येही खंड पडला होता. ऑनलाईन कार्यक्रमांचाही आशय तोच असला तरी प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये तिथलं भारलेलं वातावरण, प्रेक्षक आणि डॉ. नाडकर्णी सर यांच्यातली उत्स्फूर्त interaction, भेटणारे लोक हे सगळं बोनस म्हणून मिळतं.

गंमत म्हणजे ज्या कारणामुळे वेध ला ऑनलाईन बनावं लागलं, त्याच कारणामुळे कालचा वेध कट्टा शक्य झाला. लॉकडाऊनच्या काळातील अभूतपूर्व परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांनाच मानसिक संतुलन सांभाळत पुढे जात राहायचे नवे मार्ग शोधावे लागले. नव्या अडचणींबरोबर नव्या संधीही समोर आल्या. याच काळात नाडकर्णी सरांनी वेगवेगळ्या विषयांवर 300 हुन अधिक कविता लिहिल्या. नुसतं लिहून न थांबता त्यांनी त्या साजेशा आर्टवर्कसह (ज्याचं श्रेय सरांचे मित्र अतुल कस्तुरे यांना जातं) सोशल मीडियावर पोस्ट केल्या. ह्यातील निवडक कवितांचे वाचन आणि त्याबद्दल डॉ. ज्योती शिरोडकर मॅडमनी घेतलेली नाडकर्णी सरांची मुलाखत असं कालच्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं.

सरांच्या कविता या impulsive असतात की spontaneous या शिरोडकर मॅडमच्या प्रश्नानी कालच्या काव्यमय प्रवासाला सुरुवात झाली. वरवर या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच वाटला तरी impulsive (आवेगी) या शब्दाला किंचित अविचारीपणाची छटा आहे. याउलट spontaneous (उत्स्फूर्त) क्रिया ह्या सहज तरीही जाणतेपणी घडतात. यावर सर म्हणले, की कविता किंवा कलाकृती ही निर्मितीच्या trance मध्ये असताना आवेगी वाटू शकते. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी मनाची तयारी लागते, तिच्यामुळे कलानिर्मिती ही नेहमी उत्स्फूर्तच असते. त्यानंतर सरांनी त्यांच्या कवितेबद्दलच्या दोन कविता वाचून त्यांची कविता लेखनाची प्रक्रिया उलगडून दाखवली. अशाप्रकारे कवितेच्या उगमाशी सुरू झालेला प्रवास सरांच्या इतर कवितांच्या काठाकाठाने चालत राहिला. ‘उनाडगप्पा’, ‘आळसाचे श्लोक’ अशा हलक्याफुलक्या कविता, नंतर काही यंगिश तर काही गंभीर प्रेमकविता, विरहकविता, मैत्री बद्दलच्या कविता, सामाजिक जाणिवेतून आलेली उद्विग्नता दाखवणाऱ्या कविता, असा वेगवेगळ्या पातळ्यांवरील भावनांचा इंद्रधनु उभा राहिला. तो पाहून सरांनी त्यांच्या कवितासंग्रहाला ‘अव्यक्त मनाचा आरसा’ हे नाव का दिलं हे समजल्यासारखं वाटलं.

पण मग या भावनांच्या गराड्यात मन स्थिर कसं ठेवायचं? यावर सरांनी बौद्ध तत्वज्ञानातील एक वाक्य सांगितलं. अधांतरी अवस्थेत क्षणस्थ राहणं. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जगाचं आणि त्याबरोबर आपलंही अधांतरी आणि अनित्य असणं स्वीकारणं. आणि त्या त्या क्षणी पावलोसावली चालत असल्यासारखं जगणं.(पावलोसावली हा सरांचाच शब्द. त्याचा अर्थ आपल्या शरीराच्या सावलीत पाय टाकत चालणं.) पुढे त्यांनी यासाठी ज्ञानेश्वरांनी दिलेलं भोवऱ्याचं उदाहरण सांगितलं. भोवरा जेव्हा सर्वात जास्त गतीने गोल फिरत असतो, तेव्हा तो बाहेरून स्थिर असल्यासारखा दिसतो. मनाचंही असंच काहीतरी असतं. मनाच्या हळव्या जागाही असतात आणि मनामध्ये खंबीर धागाही असतो.

त्यानंतरच्या ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ या मालिकेतील कविता म्हणजे या भावनांच्या इंद्रधनुतील सर्व रंग एकत्र येऊन बनलेल्या शुभ्र रंगासारख्या होत्या. म्हटलं तर सगळ्या भावना सामावलेल्या, म्हटलं तर कोणतीच भावना नाही.

‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ या मालिकेतील कविता म्हणजे सरांच्या बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून गवसलेल्या पद्यरूप ‘नोट्स’ आहेत. त्यांच्या सगळ्या काव्यलेखनावर विंदा करंदीकरांचा खूप प्रभाव असल्याचं ते सांगतात. सरांच्या कवितांचा ताल त्यांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत मराठी भावकवितांच्या ऑर्केस्ट्रा मध्ये असताना मिळाला. त्याच काळात त्यांनी सुरेश भटांबरोबर काही काळ घालवला आणि त्यांच्या एका गझलचे पहिले श्रोतेही बनले.

अशा कवितांच्या आठवणी आणि आठवणींतून स्फुरलेल्या कविता या दोन सियामी बहिणींच्या फुगडीमध्ये काल संध्याकाळच्या गप्पा रंगत गेल्या. आणि या शब्दांच्या पावसामध्ये तिथे जमलेल्या वेध परिवारासमवेत आणखी एक सोनेरी संध्याकाळ संस्मरणीय झाली.

मुक्ता परांजपे, कार्यकर्ती, वेध

Little by Little

Choosing a career is rather a complicated business. It is certainly not as plain and simple as looking at one’s marks and deciding what stream to opt for. There is aptitude, interest, intellectual ability, and personality to be considered. Now place these four variables in a context-the personal, economic, and socio- political context that an individual comes from. It is an individual coming from a context who selects a career. Even after having made this complicated, dear reader, I would not be so bold to say that this is the complete, whole mechanism behind career selection. For it would just be like giving a recipe to someone and asking them to follow it to the tee. There is something more that goes on into making a dish than a methodology. There is a factor ‘x’, a very humane factor, that makes anything complete. In the case of choosing a career, it could be conceptualized as personal goals, passion, and morals. Mr. Mahesh Bhagwat currently serves as the Commissioner of Police, Rachakonda, Telangana. He was interviewed as the first faculty of National VEDH 2021. I believe his career graph is a prime case study for not only career selection, but also uplifting himself and the society at large in his chosen career. Selecting a career is only the beginning. What lies ahead is a long process of adhering to it, skill building, staying relevant to changing times, expanding its reach, and doing all it gracefully.

Commissioner Bhagwat’s work against human trafficking, and more importantly, rehabilitation of rescued persons and their family, has won him many national and international laurels. Through the scope of this blog, I would like to focus on the factor ‘x’, the humane factor, that shines luminously through his work, making it unique. I opine there are five ‘Cs’ that make up the factor ‘x’ in Commissioner Bhagwat’s case- compassion, courage, conscientiousness, completion of the task at hand, and consistency. Commissioner Bhagwat’s body of work is certainly not the product of a day’s whim or fancy. But of a strong value system that was built over the years, through the interaction of factors within and beyond him. It would not be an exaggeration to say that this value system drives him just as fundamentally as the earth’s axis drives its rotations.

To put it in words, what could be the ‘recipe’ of conducting oneself successfully on a career path? Could it be identifying one’s aptitude, interests and pursuing them to the best of our capabilities? Could it be self- work, developing a bed of soil rich with morals, values? Or as the rule of golden mean applies; as things are always more grey than black or white, is it a little of both?
Give it a thought!

Little by Little
Disturbed one is, by cruelties that crawl around, 
Cruelties, that one is only aware of, but not acquainted with; 
Cruelties, that are more black than white, 
That are deeper than shallower, 
Wider than contained, 
More disturbing to the everyday heart than not; 
They need be addressed as such... 
Not by one, but many,
Not by sheep in a herd, but leaders. 
By souls passionate, than mere doers. 
By healers, not prestige seekers. 
They say, people change... 
Why not change for the better?
Little by little, everyday? 

-Ketaki Joshi,
Volunteer,
VEDH.

Here’s sharing the link to Commissioner Mahesh Bhagwat’s interview at National VEDH 2021. DO give it a watch!

लॉकडाऊनमधील कविता !

    "अव्यक्ताचा आरसा"-कसोटीच्या काळातील भावनांची सोबत, हा एक अखंड उर्जा देणारा डॉ. आनंद नाडकर्णी यांचा कवितासंग्रह. सरांच्या जिवंत लेखणीतून साकारलेल्या या कवितांचे दिनांक ५ मार्च,२०२१ ला ऑडिओ-बुक, इ-बुक व हार्ड-बाऊंड बुक अशा ३ वेगवेगळ्या रुपात, एकाच वेळेस पहिल्यांदाच प्रकाशन झाले. लॉकडाउनच्या काळात अंत:स्फूर्तिने, उस्फुर्तपणे जन्मलेल्या या सरांच्या कविता, अशाप्रकारे एका देखण्या पुस्तकाच्या रुपात प्रकाशित झाल्या. सरांच्या लॉकडाऊनमधील या कवितांच्या निर्मितीच्या प्रवासात, त्या अनुषंगाने मी अनुभवलेल्या काही आठवणी तुम्हा सर्वांसोबत येथे शेअर करत आहे.     
काही वर्षापूर्वी नाडकर्णी सरांच्या कविता ऑडिओ फॉर्ममध्ये 'AVAHAN IPH' च्या यूट्यूब चॅनेलवर त्यांच्याच लोकप्रिय आवाजात प्रसिद्ध झाल्या होत्या,'मनोगती कवितारती' च्या ३ एपिसोड्स मध्ये. पण या कोरोना काळात ऑडिओ-बुक, इ-बुक व हार्ड-बाऊंड बुक या ३ वेगवेगळ्या रुपात, बुकगंगा पब्लिकेशन्सकडून प्रकाशित झालेल्या सरांच्या कविता माझ्यासाठी खूप खास ठरल्या.
    माझा परिचय असा: मी प्रथम IPH-'वेध' कार्यक्रमाचा एक प्रेक्षक, व नंतर पुढील काही वर्षात याच कार्यक्रमात एक कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो. माझी कॉर्पोरेट लॉयरची बॅकग्राऊंड, व हळूहळू IPH परिवाराशी वेगवेगळ्या कार्यक्रमातून, कामातून मी जोडला जात होतो. कोरोना संसर्गाची येथे सुरुवात झाली त्या काळात सरांनी मला हक्काने दिलेली त्यांच्या कवितांच्या 'इमेज डिझाईनिंगची' (कवितांचे दृश्य-रूप बनवण्याची) संधी माझ्यासाठी खूप आगळीवेगळी गोष्ट ठरली. सरांच्या या कविता वेगवेगळ्या समाज माध्यमांवर शेअर करायला सुरुवात झाली होती, कोरोनामुळे उद्भवलेल्या भावनिक लढ्यात सोबती म्हणून.
    प्रथम लॉकडाऊन, व नंतर Un-लॉकडाऊनचा काळ सर्वांसाठीच अनिश्चिततेचा ठरला. पण अशा काळामध्ये, माझ्यासाठी एक निश्चितता होती, ती म्हणजे सरांकडून नित्यनेमाने येणारी त्यांच्याच TM (ट्रेडमार्क) हस्ताक्षरातील, एक ताजी ताजी कविता! या कवितेचे दृश्यरूप बनले की सर तिला दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांसोबत शेअर करायचे. सरांच्या हस्ताक्षरात लिहिलेली ही कविता कित्येकदा, मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे पहाटे सव्वाचारलासुद्धा माझ्या फोनमध्ये आलेली असायची!! तर कधी त्यांच्या खास कमेंटसोबत पाठवलेली असायची, जसं की, "ही तव्यावरून गरमागरम!" ( म्हणजेच त्यांची नुकतीच अवतरलेली, ताजी कविता!).
    सामाजिक जाणीव सतत जगत असलेला एक प्रतिष्ठित, जेष्ठ मानसोपचारतज्ञ, व त्यातच कोरोना काळातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नाडकर्णी सरांची दिनचर्या तर अचाट व्यस्त झाली होती. पण या व्यस्त दिनचर्येनंतरही, त्यांच्याकडून आलेली त्या दिवसाची कविता प्रथम वाचताना मला कळायचं की सरांच्या शब्दात किती वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे विषय, अचूक भावार्थ व एक नवीन ऊर्जा भरलेली आहे. त्यात कधी विस्मरणात चाललेल्या काही सुंदर मराठी शब्दांचा चपखल वापर असायचा, तर कधी आपल्या माय-मराठीला नवीन शब्दांनी सजवणे हे सरांकडून सहज व्हायचे (उदाहरणार्थ, सरांनी निर्मिलेला 'पावलोसावली' हा नवीन अर्थपूर्ण जोडशब्द). असा नवनवीन खजिना मला त्यात भरलेला सापडायचा- अर्थात माझ्या आकलन क्षमतेनुसार. थोडक्यात काय, तर सरांची प्रत्येक दिवसाची नवी कविता, ही तेवढीच स्वयंपूर्ण ताकदीची, सर्वस्पर्शी, व मनाला उभारी देणारी असायची. व यातच काय तो बदल म्हणून सरांकडून कधी रूमीच्या रचनेचा मुक्त भावानुवाद, तर कधी हिंदीतून लिहिलेल्या चार ओळी यायच्या!
    मी आदरपूर्वक सांगू इच्छितो की या कवितांना प्रतिमा-रूप देण्याच्या अनुभवातून माझा मराठी भाषा समजण्याचा एक नवीन व अर्थपूर्ण प्रवास झाला. मला या कवितांच्या रुपाने काही नवे संदर्भ पहिल्यांदाच कळले. त्याचसोबत व्याकरण, विरामचिन्हे याचे महत्त्वही नव्याने उमगले. आजूबाजूच्या बंदिस्त व त्यामुळेच नकोशा झालेल्या लॉकडाऊनच्या वातावरणात या कवितांमुळे माझा वैयक्तिक फायदा असा झाला की माझा हा 'बंदिस्त'वेळ खूप उत्साहात, नवीन गोष्टी शिकण्यात व आनंदात पार पडला.
    लॉकडाऊनच्या काळात सरांच्या कविता जसजशा नियमितपणे सोशल मीडियावर प्रकाशित होऊ लागल्या तशा काही मिनिटांमध्येच त्यावर लाईक्स व वाचकांच्या डिटेल कमेंट्स येऊ लागायच्या. वाचकांच्या या उस्फुर्त कमेंट्स वाचल्यावर कळायचं की वेगवेगळ्या लोकांना सरांची ही कविता काय व किती म्हणून प्रेरणा नित्यनेमाने, भरभरून देते आहे. त्यातच बाबा (अनिल अवचट सर) यांच्याकडून समाज माध्यमावर आलेली या कवितांबद्दलची एक मोकळी दाद, आम्हा सर्व वाचकांचा उत्साह वाढवून गेली. मला जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे, त्या वेळेस होणारे समाज वातावरणातील बदल सर सहज ओळखायचे व त्या अनुषंगाने पुढच्या दिवसासाठी एक पोषक अशी सरांची उस्फुर्त कविता लगेच यायची! हे सरांना थोडक्या वेळात कसं काय जमायचं देवच जाणे! "आजची (कविता) जरा सिरीयस झाली आहे, उद्या एक हलकी-फुलकी घेऊ या"! हे सरांचे मला पाठवलेले शब्द आणि ते वाचून मी इथे अचंबित झालेला!
   हा सर्व झाला माझा आनंदाचा भाग, पण सुरुवातीला मनात एक मोठी भीती पण होती. सरांनी इतक्या जबाबदारीने सोपवलेले हे कवितांना दृश्य-रूप देण्याचे काम (सरांच्या शब्दांना योग्य अशी बॅकग्राऊंड इमेज नेमक्या वेळात शोधून तयार करणे) हे मला व्यवस्थित जमेल का? त्यात माझ्याकडून काही चुका झाल्या तर? पण अगदी पहिल्या कवितेपासूनच माझा हा प्रवास अत्यंत आनंददायी होणार आहे याची मला खात्री पटली होती. 
   सरांच्या शब्दांना डिजिटल फॉर्ममध्ये बदलताना, त्या कवितेतील Key-words ओळखून समर्पक बॅकग्राऊंड इमेजेसमधून योग्य ऑप्शन निवडताना, सरांनी माझ्या चुका सुधारण्यासोबतच, मला न उमगलेल्या कित्येक शब्दांचा अर्थ व संदर्भ समजावून सांगितला. त्यामुळे प्रत्येक कवितेचा भाव ओळखून, बॅकग्राउंड इमेज करताना दरवेळी कोणती ना कोणती, एक नवीन गोष्ट सरांकडून शिकणे व्हायचे. व माझे हे प्रयोग करताना, मला संपूर्ण क्रिएटिव्ह स्वातंत्र्य देण्याच्या सरांच्या मनाचा मोठेपणा प्रत्यक्ष अनुभवास आला.
   माझ्या या शिकण्याच्या (व धडपडण्याच्या) सर्व सोपस्कारानंतर फायनल इमेज छान झाली की सरांची उस्फुर्त अशी दाद यायची, "वा" म्हणून....अतिशयोक्ती नाही, पण सरांचे हे शाबासकीचे शब्द माझ्यासाठी खूपच मोठे होते, व रहातील. ते शब्द वाचून थोडा घाबरलोही, व भरूनही पावलो. मनात एकच इच्छा असायची की हा अनुभव मला, असाच निरंतर मिळत रहावा. हो, पण सरांच्या अशा शाबासकीनंतर माझ्यातल्या लहान मुलाला मात्र..."आनंद पोटात माझ्या माईना रे माईना" असे व्हायचे!
    पुढे जाऊन करोना विषाणूच्या निर्बंधांचा फटका IPH चा आयकॉनिक वार्षिक कार्यक्रम 'वेध'लाही बसला. पण या बाह्य-परिस्थितीवर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मात करून, IPH ने २०२० मध्ये चक्क "ग्लोबल वेध" चे Online आयोजन केले. दरवर्षी होणाऱ्या या वेध कार्यक्रमाची एक खासियत असते, ती म्हणजे त्या वर्षीच्या वेध सूत्रावर सरांनी स्वतः लिहिलेले 'वेध-गीत'. मग याच दिवसात, ग्लोबल वेध गीताचा जन्म पाहण्याचे भाग्य मला लाभले. या वेध गीताची दृश्य प्रतिमा तयार करण्यासाठी सरांनी माझ्या मागणीनुसार वेगवेगळ्या दिव्यांची सुंदर रेखाचित्रे स्वतः काढून लगेच पाठवली! सरांचेच शब्द व सरांचीच रेखाचित्रे यांचा सुंदर संगम होत, त्या वर्षीच्या ग्लोबल वेध गीताची पहिली इमेज तयार झाली. (ती इमेज येथे शेअर करत आहे)
    मग पुढे काही दिवसानंतर (अचानकपणे), सरांच्या गौतम बुद्धांवरील सुरू असलेल्या अभ्यासातून सहज तयार झालेल्या काही ओळी आल्या. पहिली कविता आली, दुसरी आली, दहावी आली व असं करता करता 'बुद्धांसोबत क्षणोक्षणी' या विषयावरील पुढे सलग-सतत, चक्क १०२ कविता आल्या! गहन, गंभीर म्हणून पुढे वाचू असं म्हणत वाचायचे राहून गेलेल्या बुद्ध या विषयावर, सरांकडून विनोबांच्या गीताई स्वरूपातील, सोप्या शब्दात लिहून आलेल्या ओळी खूप काही उलगडून सांगू लागल्या. पुढे या बुद्ध-शिकवण कवितांसोबत सर जेव्हा टिपणे लिहू लागले तेव्हा तर त्या पद्य ओळी जास्तच छान पद्धतीने समजू लागल्या. या कवितांच्या सोबत मग सरांकडून पाली भाषेतील काही मूळ शब्द व त्यांचे अर्थ मला समजले. 
    हा माझा अनुभव मी लिहीत असताना, आजपर्यंत सरांच्या ३००+ पेक्षा जास्त कविता गेल्या एका वर्षात प्रकाशित झाल्या आहेत! सरांच्या कवितांसोबत अनुभवायला मिळालेला हा माझा आगळावेगळा वैयक्तिक प्रवास अगदी अविश्वसनीय वाटावा असाच. सरांच्या कविता कशा, केव्हा व किती प्रकारच्या झाल्या आणि इतक्या थोडक्या वेळात सरांना त्या लिहिणं हे कसं बरं शक्य व्हायचं!! अशा माझ्या अनेक प्रश्नांचा, काव्यस्फूर्तिच्या कारणांचे, उत्तर व उगम न कळलेलाच बरा... सरांच्या या अनमोल साहित्य निर्मितीचा, आश्चर्यचकित होत असाच निखळ आनंद घेत रहाण्यात, खरंतर भरभरून आनंद आहे, हे मनाला पटलं.
    आता "बुद्धांसोबत क्षणोक्षणी" या मालिकेतील सरांच्या कवितांची छापील आवृत्ती (त्यांच्या वैविध्यपूर्ण टिपणांसोबत) कधी व कोणत्या रूपात येते आहे ह्याची अगदी मनापासून वाट पहातोय.
    लॉकडाऊनकाळापासून लिहायला सुरुवात झालेल्या नाडकर्णी सरांच्या कवितांच्या प्रवासातील, तुम्हा सर्वांसोबतचा मी पण एक सहप्रवासी-वाचक व साक्षीदार. या कवितांच्या वाचनासोबतच्या आनंदात, सरांनी मला अनुभवायला दिलेल्या कवितांचे दृश्य-रूप करण्याच्या जिवंत क्षणांबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी व ऋणी राहीन. 
नाडकर्णी सर त्यांच्या नवनवीन विचारांसोबत, त्यांच्या कवितांतून आपणा सर्वांना असंच आश्चर्यचकित करत रहातील या घट्ट आशेवर मी.....
तुमच्यातील त्यांचा एक वाचक, 
-अतुल कस्तुरे

Borrowed Bricks and Lending Hands

A solitary boy stood at the chawl terrace. No, he was a man technically, but with such a palpable air of innocence that calling him a thirty- something ‘boy’ felt more apt. I smiled at him, not the tentative smile I reserve for strangers, but a warm one. It seemed right, afterall. He averted his gaze swiftly. He registered my smiling face, but dedidely looked ahead, ignoring me. He looked wary.

“Who is he?”, I asked my roommates, entering my new home for the year wearily. “He’s Ninaad.” (name changed) “He works at the psychiatric clinic next door”, answered one of them. “The doctor has told us he has autism”, added the second in a hushed tone, as if imparting a secret. That earned a speaking tilt of my chin. It explained why he did not return my smile. “Its a form of maddness, isn’t it? You would know, since you are studying Psychology”. I was shaken out of my reviere by that question.

“It is not a madness”, I said, somewhat offended. “It is a condition that primarily impairs social functioning.” “Whatever does that mean?”, screeched another roommate. I began asking them a volley of questions, “Have you ever seen him interract with any of the patients willingly?” “Never!”, came the answer. “How long has he been working here?”, “A couple of years maybe”. “And has he ever been comfortable talking to any of you?” That earned wide eyes and insightful looks from all four of them. “You know how Disha here (name changed) knows the whole of Dadar because she likes socializing so much? And how Sakshi (name changed) is quite a social being, but not all the time? Or how I prefer solitude, but I can function in social situations if needed? Do you see the range of how each of us thrives on different levels of social engagement? Well, Ninaad is somewhere on the farthest corner of one extreme. His lack of want for social engagement is present to a point where it creates problems in his life, and for those around him, too. “He is also a bit odd otherwise, you know”, one of them couldn’t help adding. “The other day he wouldn’t let me sit on a stool because it was his. Now that’s childish!” I smiled kindly. “That’s another part of autism–rigidity in behaviour. Set patterns, routines, demands that things must be a certain way. These persons can also be sensitive to certain sensory input. You know how it feels to scratch a black board with your nails?” “Uugghh!! I can’t bear the feeling”, replied a voice agitated with memory. “That is exactly how these persons might feel about noises, textures, smells that all of us tolerate easily, and even relish.” “How can we help Ninaad?”, one of them asked with an adorably sincere frown on her brow. Smoothening her brow gently with my fingers, I said, “Just respect the limits his brain, and his body have set for him; Maybe help him navigate through situations when it becomes too much. That is all we can do in our capacity, I guess.”

The realization that a boy with autism was successfully employed in someone’s care, filled my heart with proxy gratitude. Over the span of next ten months, I came to observe Ninaad closely. He would stand at the chawl terrace when the crowd of patients subsided, and find himself a secluded corner when the crowd swelled. All of his superiors were always inclusive of him, respecting his needs and accomodating his concerns. A similar picture on a much larger scale can be seen at ‘Tridal’, a rehabilitation project for persons with schizophrenia, by the Institute for Psychological Health, Thane. (For more about Tridal, visit here.)

After painstakingly reading uptill here, you might wonder why this story of someone, who became a dear friend, finds a place in a blog dedicated to vocational discussions. Humour me just a bit more.

VEDH has inspired many to choose a vocation that is in line with their deepest desires and aptitude. It has compelled us to pour quality in our work. It has taught us to sow something that the entire society would reap.

All our careers could be fulfilling, but they might not be exceptional in a strictly conventional sense. Living as we do, working as we work, careers are not designed in isolation. We keep on borrowing bricks from our loved ones, colleagues, mentors as we go, and build steps and flights of stairs with our own sweat and blood in the process. It is simple to understand; As the charming Joey from F.R.I.E.N.D.S would put it, “It is all about giving, receiving, having and sharing.”

For Ninaad, the compassion and understanding of his colleagues was a brick he needed to borrow. For someone else, it could be sound advice or a few words of support. For an expectant mother, or a caregiver, it could be shared work load.

A utopian picture would be: borrow when needed, and lend without being asked for it. Fashion your own career, as you unknowing fashion others’. How wonderful would it look- steps of different heights and widths, some neat and some unruly, built in a fraternal spirit that goes beyond measurements!

-Ketaki Joshi, Thane.