राजीव तांबे समवेत वेध कट्टयावर हास्यकल्लोळ!

९ व्या वेधकट्टयावर राजीव तांबे बरोबर गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिल्पा चौधरी हिने अतिशय ओघवत्या शब्दांमध्ये राजीव तांबेचा परिचय करून दिला, तर प्रदीप कुलकर्णी यांनी वेध आणि वेधकट्टयाविषयीची माहिती दिली.

मुलाखतीची सूत्रं माझ्या हाती आली आणि मी औपचारिकता बाजूला ठेवून राजीव माझा अनेक वर्षांपासूनचा मित्र असल्यानं अरेतुरेच्या संबोधनानंच गप्पांना सुरुवात केली. साहित्य अकादमीच्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित झालेला, २३ जागतिक भाषांमध्ये पुस्तकं अनुवादित झालेला आणि १०० च्या वर पुस्तकं प्रसिद्ध असलेला हा लेखक सकारात्मक आयुष्य जगणारा आहे. मुलांमध्ये मूल होऊन जगणारा हा मित्र असून कुठलेही उपदेश न करता, अतिशय खेळकर पद्धतीनं तो पालकांची, शिक्षकांची शाळा घेतो.

राजीव तांबे हा गणित, विज्ञान या विषयांना घाबरणारा, शाळा नको वाटणारा, शाळेची पुस्तकं विकून मजा करणारा …हाच मुलगा मोठा होऊन गणित आणि विज्ञान या विषयावर लिहितो आणि एवढ्यावरच थांबत नाही, तर शिक्षकांसाठी, पालकांसाठी, मुलांसाठी कार्यशाळाही घेतो. युनिसेफसारख्या आणि ‘प्रथम’ सारख्या जागतिक स्तरावर काम करणार्‍या संस्थांबरोबर कामही करतो ही किमया कशी घडली याचं उत्तर राजीवनं त्याच्याच खास शैलीत दिलं. शिवाय गणिताच्या बाबतीत ९८१ भागिले ९ या गणितानं कसा धुमाकूळ घातला याच्या गमतीजमती सांगितल्या. इतकंच नाही तर ‘सजीवनिर्जिव’ हा तिसर्‍या वर्गात असलेला पाठ शिकवताना शिक्षकांची जी भंबेरी उडाली ते किस्सेही त्यानं सांगितले.

रोज नियमित लिखाण करणारा राजीव खरं तर एक साधा इलेक्ट्रिशियन! मात्र त्याच्या जिद्दी स्वभावानं त्याला शिक्षणतज्ज्ञ करून सोडलं. सोप्या पद्धतीनं खरं आनंददायी शिक्षण कसं असू शकतं याचे पाठ त्यानं शिक्षक आणि पालक यांना दिले. त्याच्या गंमतशाळेत मुलं रमू लागली. पालक आपल्या मुलांच्या बाबतीत कसे आततायीपणा करतात याचेही अनेक किस्से राजीवनं सांगितले. मुलांच्या मनातले प्रश्न आणि त्यांच्यातली निरागसता त्यानं उलगडली. त्याचबरोबर मुलांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहणारा हा बालसाहित्यिक श्रोत्यांनाही प्रचंडच भावला. कारण दीड तास नॉनस्टॉप वेधकट्ट्यावर हास्याचे कारंजे उडत होते. अखेर तर श्रोत्यांनी पोट धरून हसायला सुरुवात केली.

राजीव तुझी पुढली स्वप्नं काय, असा गंभीर प्रश्न विचारताच राजीवनं मला भूत व्हावंसं वाटतं, हेच माझं स्वप्न असल्याचं सांगितलं. भूत कुठेही जाऊ शकतं, त्याला रांगेची गरज नाही, त्याला स्वतःच्या वजनाची चिंता नाही आणि वाट्टेल ते करता येण्याची मुभा असल्याचं तो म्हणाला. त्याच्या नव्यानं आलेल्या आणि विवेक प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या १० पुस्तकांच्या सेटबद्दल त्यानं कल्पना दिली. ही पुस्तकं शिशूवर्गासाठी असून रंगीत आणि चित्रमय आहेत. काल ५०० रुपयांचा संच सवलतीच्या दरात ४०० रुपयांना मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी मिसेस पळशीकर यांनी कार्यक्रमाच्या लाईव्ह आठवणीदाखल सुरेखशा फोटोफ्रेम्स भेट दिल्या. ज्योतीने नेहमीप्रमाणे अतिशय सुरेख शब्दांत आभार मानले. राजीवला सगुण म्हणावं का निर्गुण हा प्रश्न पडल्याचं ती म्हणाली. राजीव तांबेमधली मीश्किली तिनं दाखवली.

कालच्या कार्यक्रमाला धनू, मंजू, नीतीन रानडे, अरूणा देशपांडे, अप्पा, मधुरा, श्रुतीसह नेहमीप्रमाणेच अनेक रसिक दर्दी श्रोत्यांची उपस्थिती होती. मराठी पाठ्यपुस्तक मंडळाचे माजी संचालक वसंत काळपांडे आवर्जून वेधकट्टयावर उपस्थित होते.
कालचा वेधकट्टा सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत हास्यमैफिलीत रंगून गेला होता. ते हासू चेहर्‍यावर घेऊन सगळ्यांनी पुढल्या महिन्यात भेटू म्हणत निरोप घेतला.
(मॅक्स महाराष्ट्रने वेधकट्टयाचं फेसबुक लाईव्ह केलं, तर सुरेखसे बोलके फोटो वेधची वृंदा आणि गीता यांनी काढले. सुनीलने माझ्यापर्यंत पोहोचवले. या सगळ्यांचेच मनापासून आभार.)

दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

उन्नतीचा प्रवास …….

“वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास” या ‘IPH’ या संस्थेच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमामध्ये एक वेगळा विचार मिळाला.
मन म्हणजे नक्की काय? ते माझ्या शरीरात नेमक कुठे आहे? माझ्या जगण्यामध्ये त्याचं नेमक काय प्रयोजन आहे? हे थोडंफार या तीन दिवसांमध्ये लक्षात आलं.

विचार – भावना – वर्तन यांच्या एकत्रित आविष्कारातून आपल्याला मन जाणवत राहतं. विचार – भावना – वर्तन हे हातात हात घालून जाणाऱ्या एका समभुज त्रिकोणाचे तीन कोन आहेत. यांची समभुजता एका कोनाने जरी बिघडली तरी गडबड होऊ शकते. विचार – भावना – वर्तन या त्रिकोणाच्या पायावर आपलं संपूर्ण अस्तित्व उभं आहे. या तीनही कोनांचा आदिमा कडून प्रगत व प्रगत कडून उन्नत याकडे होणारा विकास आपल्या व्यक्तित्वाचा विकास घडवू शकतो.

आदिम भावना या आपल्या जगण्याच्या संघर्षातून आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या आपल्याला कोणी शिकवाव्या लागत नाहीत. कोणत्या आहेत या आदिम भावना? या आहेत लढा (fight ), पळा (flight ), थिजून जा (freeze ). म्हणजेच आपल्याहून कमी ताकदीचं संकट असेल तर आपण लढून त्याचा सामना करू शकतो, जास्त ताकदवान संकट असेल तर पळून जा पण आपल्या कल्पनेपलीकडील, अतर्क्य संकट असेल तर आपण थिजून जातो. Fight: Anger, Flight: Anxiety, Freeze: Depression या आदिम भावना आपल्या लिम्बिक सिस्टिम मध्ये आहेत. या प्रत्येक जीवा मध्ये असतातच. जसजसा मानवाचा मेंदू विकसित होत गेला तसा नवीन भावनांचा उगम होत गेला. आदिम भावना या स्वकेंद्रित ( I ) आहेत तर प्रगत भावना या मी व माझ्याबरोबरचे इतर (Me to We ) यांना जोडणाऱ्या आहेत. उन्नत भावना या “मी”पणाला विरघळवून टाकणाऱ्या (Oneness ) आहेत. तिथे पोचल्यावर मी व इतर हा भेद रहातच नाही, हे सगळेच एकरूप होऊन जाते. ‘हे विश्वची माझे घर’ अशी भावना यातूनच निर्माण होते. संत वचनांमधून , वेदांतामधून हीच कल्पना मांडलेली आहे.

सध्या सर्व क्षेत्रांमध्ये मानव प्रगती करत आहे, राहणीमान सुधारत आहे आणि जगण्याच्या संघर्षातील आव्हानांवर आपण विजय मिळवलेला आहे. परंतु आता आपल्याला नवीन आव्हानांचा सामना करायचा आहे आणि यासाठी आपल्याला आव्हानांना सामोरे जाण्याची आपली पद्धत बदलायला लागणार आहे. हा बदल कधी घडेल? हा बदल घडेल जेंव्हा आपण आदिम भावनांच्या सवयीतून बाहेर पडू. स्वकेंद्रित विचारांकडून, “मी” पणा सोडून “आम्ही “ कडे जायला हवंय. तेंव्हाच या नवीन आव्हानांचा सामना सहजपणे करणं आपल्याला जमू शकेल. याचा सतत सराव करावा लागेल कारण आदिम भावना या निसर्गदत्त आहेत. आपण पटकन त्या प्रकारे React होऊ शकतो. परंतु एकदा का आपण “मी” कडून “आम्ही” कडे गेलो की मग आपल्याला पुढच्या टप्प्याचा प्रवास चालू करता येईल.

पुढचा टप्पा म्हणजे एकरूपता ….. या संपूर्ण विश्वाची एकतानता….. भया कडून अभया कडे आणि अभया कडून निर्भया कडे ….. द्वैतांकडून अद्वैताचा प्रवास, स्वार्थाकडून सहयोगाकडे आणि सहयोगातून समर्पणाकडे नेणारा प्रवास……

-वैदेही भिडे

माइंड फेस्ट या कार्यक्रमाचा भाग १ AVAHAN IPH या YouTube मालिकेवर प्रसिद्ध झाला आहे, नक्की बघा! https://youtu.be/rKMWqQJsINk

माइंड फेस्ट नव्हे माइंड फीस्ट

            तारीख १३, १४, १५ डिसेंबर २०१९. डिसेंबर महिन्यातला दुसरा शनिवार, रविवार! सालाबाद प्रमाणे, खरं तर या आय. पी. एच च्या “ठाणे वेध” च्या तारखा असायच्या. पण या वर्षीचा वेध काही वेगळंच स्वरूप घेऊन अवतरला होता. दोन दिवसात मिळून सरासरी वीस कर्तृत्ववान व्यक्तींच्या मुलाखतींऐवजी एकटे दस्तुरखुद्द डॉ. आनंद नाडकर्णी तिन्ही दिवस संध्याकाळचे तीन तास निरूपण करणार होते. गेली आठ – दहा वर्षे त्यांनी जो वेदांतांचा अभ्यास केला आणि डॉक्टर म्हणून अनेक वर्षे मानसशास्त्राची, मनोविकारशास्त्राची आणि मनोविकासशास्त्राची प्रॅक्टिस केली, त्या सगळ्यांचा एकत्र परिपाक असलेला डोळसपणे आखलेला “या जगण्याचं करायचं काय?” या मनाची समजूत कशी घालायची?” या विषयावरचा “माइंड फेस्ट” हा कार्यक्रम.

            १३ तारखेला शुक्रवारी संध्याकाळी ट्रॅफिकचा सामना करत जरा उशिराच शिव समर्थ  विद्यामंदिराच्या मैदानावर पोचलो. संपूर्ण भरलेलं प्रेक्षागार, आणि समोर भव्य रंगमंच. होय. व्यासपीठाची मधोमध स्थापना केलेला रंगमंचच तो. फक्त वक्ता आणि प्रेक्षक यांच्या मध्ये पडद्याचा अडसर नाही. डावीकडे साधी गवताची झोपडी. बाहेरच्या कोनाड्यात पणती तेवत असलेली. झोपडीपुढे तुळशी वृंदावन, त्यात सुंदर तुळस. उजव्याबाजूला भव्य अश्वत्थ वृक्ष. त्याच्या शेजारी ज्ञानेश्वरांचा “पैसाचा खांब”. वर छत नाही. मागे स्क्रीनवर निळा जलाशय आणि निरभ्र आकाश. पूर्ण देखावा आणि प्रकाश योजना मनात शांत, सात्विक भाव जागवणारी. जोडीला बासरीचे स्वर आणि उदाधुपाचा वास!!

            डॉ. नाडकर्णींनी विनम्र भावे प्रेक्षकांना वंदन करून शांतीमंत्र आणि ॐकाराने सुरुवात केली, आणि प्रेक्षक मनाच्या उत्सवात केव्हा रंगून गेले, ते त्यांना ही कळले नाही. मेंदू, मन आणि शरीर… विचार, भावना, वर्तन… मानसशास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षे प्रयोग करून शोधून काढलेले सिद्धांत डॉक्टरअत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत होते. बरोबर हीच तत्वे थेट वेदांपासून, उपनिषदांपासून, गीतेपासून, संत साहित्यातील अभंगांपर्यंत; ज्ञानेश्वर आणि विनोबांपर्यंत अनेक जणांनी कशी लिहून ठेवली, याचं अनेक उदाहरणांसह निरुपण करत होते.

            आदिमानवापासून प्रगतमानवापर्यंत आणि प्रगतमानवापासून उन्नतमानवापर्यंत आपला भावनिक आणि बौद्धिक प्रवास कसकसा होत गेला हे मेंदू विज्ञान, मानस शास्त्र, शरीर शास्त्र, जगभरातील विविध धर्मातल तत्वज्ञान आणि अध्यात्मिक ग्रंथ, यांचा आधार घेऊन; जगभरातील थोर, अधिकारी व्यक्तींची वचने उर्धृत करत, त्यांचा अर्थ उलगडून सांगत स्वतः रंगून गेलेल्या डॉ. आनंद यांनी श्रोत्या प्रेक्षकांना रमवल, खिळवून ठेवलं.

            ते फक्त सांगत नव्हते. शिकवत होते. सहभागी करून घेत होते. कित्येक अभ्यासक तरुण तसच वयोवृद्ध प्रेक्षक स्त्री पुरुष आपापल्या वहीत, मोबाईल मध्ये हे सगळं साठवून घेत होते.

            ८० मिनिटांच्या सलग निरूपणानंतर मध्यंतर झालं, तेव्हा सर्वांच्याच मनात त्या भारलेपणातून, त्या निर्मळ आनंदातून बाहेर येऊ नये, असं होतं तर तीन तास झाल्यानंतर शेवटी शांतीमंत्र म्हणताना सगळे स्तब्ध, मूक, नि:शब्द होत असू.

            त्या तीन दिवसात आम्हाला कोण कोण नाही भेटले? मनू:स्मृती मधला मनू, डार्विन, फ्रॉइड, अल्बर्ट एलिस, थोरो, सॉक्रेटीस, ऍरीस्टॉटल, कार्ल युंग हे तर होतेच पण आमच्या परिचयाचे असे महात्मा गांधी, विनोबा भावे, आंबेडकर, कुमार गंधर्व, ब्रायन लारा, सचिन तेंडूलकर, अशी किती तरी उन्नत व्यक्तिमत्वे, त्यांचे उदात्त विचार ऐकायला मिळाले आणि समजावून दिले गेले. शिवाय आपली ज्ञानोबा माऊली, तुकोबा, गाडगे बाबा, बहिणाबाई, अशी यत्चयावत संत मंडळी तर ठायी ठायी भेटली. वारंवार गीतेतले अर्जुन – श्री कृष्ण भेटत होते. आम्ही नेहेमी म्हणत आलो, त्या श्लोकांचे स्तोत्रांचे अर्थ उलगडत होते.

            तिसऱ्यादिवशी तर आमच्या नेहेमीच्या जगण्यातल्या प्रोब्लेम्सकडे कसं बघितलं पाहिजे, याचं सुंदर मार्गदर्शन मिळालं आणि श्रोते धन्य झाले. तिन्ही दिवस अक्षरशः गणितातल्या चढत्या भांजणी प्रमाणे (२,४,८,१६,३२) या मनोमेजवानी (माइंड फीस्ट) ची रंगत वाढत गेली. शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ यांचे सिद्धांत समजावून सांगताना आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर नर्म विनोदी शैलीमध्ये जे भाष्य सूचक शब्दात डॉ. नाडकर्णी करत होते, आणि उपस्थित जाणकार श्रोतृ वर्ग हसून दाद देत होते, हा ही एक समसमासंयोग प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा!

या तीन दिवसांमध्ये हे मनावर ठसलं की आपण,आपलं मन हे सध्या कोणत्या स्थितीत आहे ,आदिम भावनावस्था,प्रगत भावनावस्था, की प्रगल्भ भावनावस्था यावर सतत लक्ष ठेवायचं ,आणि जाणीव पूर्वक शक्यतो ,उन्नत भावावस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करायचा .’मी’ कडून ‘आम्ही’कडे आणि ‘आम्ही’ कडून ‘आपण सर्व’ या भावनेकडे जायचं.आपलं मन जितकं समतोल स्थितीत राहील ,तितकी आपली वाटचाल सुकर होईल. जितके आपण व्यक्तीकडून समष्टीकडे जात राहू,तितके ‘अवघे धरू सुपंथ’ हे साध्य होईल.

तिसऱ्या दिवशी शांतीमंत्र होऊन कार्यक्रम संपला, तेव्हा दोन्ही हात जोडून श्रोतृवृन्दापुढे विनम्रभावे उभ्या राहिलेल्या निरूपणकाराच्या डोळ्यात अश्रू होते आणि रंगून गेलेल्या श्रोत्यांना टाळ्या वाजवण्याचे ही भान नव्हते. काही क्षणानंतर वास्तवाची जाणीव झालेल्या श्रोत्यांनी उभे राहून, मनाची तृप्ती होई पर्यंत, टाळ्यांचा कडकडाट केला.

            जवळपास साडेतीन हजार श्रोत्यांनी तीन दिवस रोज तीन तीन तास कार्यक्रमाचा आनंद घेतला. अक्षरशः पिन ड्रॉप सायलंस म्हणतात तशी शांतता असायची. काही वर्षांपूर्वी आनंद विनायक जातेगावकरांनी संत तुकारामांचे पाच अभंग घेऊन त्यावर सद्यस्थितीवर निरुपण करणारे नाटक लिहिले होते “ज्याचा त्याचा विठोबा” आणि स्टेजवर सलग तीन तास सादर करायचे कसलेले रंगकर्मी- सदाशिव अमरापूरकर. ते नाटक पाहताना असाच तृप्तीचा आनंद प्रेक्षक अनुभवत असत. त्या नंतर कित्येक वर्षात असा तृप्त करणारा निरूपणाचा आनंद अनुभवला नव्हता. आपल्याच पूर्वजांनी लिहून ठेवलेलं लाख मोलाचं तत्वज्ञान आहे, अध्यात्मिक ग्रंथ आहेत. पण सध्या आपण सगळं विसरलो की काय असं वाटत असताना, जेव्हा असे कार्यक्रम घडवून आणले जातात, तेव्हा, अंधारात कुणीतरी लामणदिव्याचा प्रकाश दाखवल्यासारखं वाटतं.

            “सुदृढ मन सर्वांसाठी” चा वसा घेऊन समाजासाठी वाटचाल करणाऱ्या डॉ. आनंद नाडकर्णी यांनी माइंड फेस्टच्या रूपाने मोठा पल्ला गाठलेला आहे. वेध संमेलनाची जशी वेध चळवळ झाली, तसं या माइंड फेस्टचं हे व्हावं अशी शुभेच्छा मी व्यक्त करते.   

-सुनंदा अमरापूरकर

ज्यांना कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित नाही राहता आले आणि जे पुन्हा कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ इच्छितात त्या सर्वांसाठी माइंड फेस्ट आता ‘आवाहन आय. पी. एच.’ या यू ट्यूब वाहिनीवर दर आठवड्याला एक सत्र असा प्रसिद्ध होणार आहे.. पहा त्याची झलक…..
https://youtu.be/IVGcnNwmWUI

वेध कट्टयावर कैफी आझमीचा उलगडला प्रवास!

संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गेलं आणि वेगळ्या वाटेनं जाणार्‍या आयएएस अधिकार्‍यांबद्दल विषय निघाला की त्यात लक्ष्मीकांत देशमुख यांचं नाव अग्रक्रमानं समोर येतं. अधिकारी म्हणून काम करतानाही त्यांचं संवेदनशील मन सतत जागं असल्यानं त्यांच्या कामाकडे बघण्याची त्यांची दृष्टी वेगळी असल्याचं जाणवतं. म्हणूनच दुष्काळी भागातला पाणी प्रश्न असो वा स्त्री-भ्रूणहत्येचा प्रश्न असो, बालमजुरीचा प्रश्न असो वा दहशतवादाचं वातावरण असो, खेळ असो वा चित्रपट असोत, या सगळ्याच विषयांवर लिहिणारे आणि मानवतावाद जपणारे लक्ष्मीकांत देशमुख आपल्यासमोर येतात. खरं तर त्यांची आणखी वेगळी आणि महत्वाची ओळख म्हणजे कुठल्याही प्रश्नावर ठोस भूमिका घेणं आणि ती जाहीरपणे मांडणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.
ते म्हणतात, लेखकानं केवळ लेखन करून थांबायचं नसतं तर आपल्या नैतिक भूमिका आणि मूल्यं यांच्यासाठी प्रत्यक्ष कामही करायचं असतं. त्यांच्या या दृष्टिकोनामुळेच त्यांच्यातला कार्यकर्ताही सतत जागा असतो हे कळतं. त्यांची ३० पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यात कथा, कादंबरी, ललित लेख, अशा अनेक प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना शासनाचे आणि अन्य महत्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत.

साहित्य ही फावल्या वेळाची करमणूक नाही, तर बुद्धी, भावना आणि प्रतिभा यांच्या त्रिवेणीसंगमातून घडवलेलं ते जीवनदर्शन आहे असं म्हणणारे लक्ष्मीकांत देशमुख प्रेमचंदांच्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत. प्रेमचंदांना उथळ, वरवर लिहिणारे लेखक आवडत नसत. गरिबांचे प्रश्न त्यांना महत्वाचे वाटत. नेमकं तेच काम लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपण अधिकारी असताना प्रत्यक्ष कृतीतून केलंय. तसंच आपल्या लिखाणातून देखील केलं आहे. ते म्हणतात, मी भूतकाळात रमणारा लेखक नाही आणि भविष्याचा वेध घेणारा लेखकही नाही, तर मी वर्तमानात जगणारा लेखक आहे.

प्रेमचंद म्हणत, जर लेखकाला उन्हात कष्ट करून दुपारी झाडाखाली विसावलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या रापलेल्या आणि काळवंडलेल्या चेहर्‍याच्या सुरुकुत्यांमधलं सौंदर्य आणि राबराब राबणार्‍या कष्टकरी स्त्रीच्या राठ पडलेल्या हातामधलं सौंदर्य जाणवत नसेल तर तुम्ही लेखक म्हणून घ्यायला पात्र नाहीत. वैयक्तिक अनुभवापेक्षा समाजाचे अनुभव, समाजाचे प्रश्न त्यांना महत्वाचे वाटत असत. आणि नेमकं हेच लक्ष्मीकांत देशमुख यांनीही आपल्या आयुष्याचं ध्येय मानलं.
वेध कट्टयावर लक्ष्मीकांत देशमुख यांचा अधिकारी ते कार्यकर्ता लेखक हा प्रवास थोडक्यात त्यांनी सांगितला. तसंच ते बडोदा इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या काळातल्या त्यांच्या भूमिका, सत्ताधार्‍यांना राजा तू चुकतो आहेस हे स्पष्टपणे सांगणं, नयनतारा सहगलच्या बाबतीत जो निर्णय झाला, त्याचा निषेध नोंदवणं, मराठी भाषेची चळवळ अशा अनेक विषयांवर लक्ष्मीकांत देशमुख बोलले.

त्यानंतर कैफी आझमी यांचं पुस्तक लक्ष्मीकांत देशमुख यांनी का लिहिलं, त्यामागे त्यांची भूमिका काय होती याचा वेध घेणं या कट्टयावर झालं. गरिबी, मूल्यांचा र्‍हास, दहशतवाद, क्रौर्य, सत्तेची दडपशाही, यामुळे सामान्य माणूस हतबल झालेला दिसतो. अशा वेळी त्याला आवाज देत त्याला आत्मभान देता येईल का असा विचार लक्ष्मीकांत देशमुख सातत्यानं करत असतात. त्या अस्वस्थतेतूनच ‘कैफी आझमी’ या पुस्तकाची निर्मिती झाली.

वयाच्या अकराव्या वर्षी कैफी आझमी यांच्या शायरीला कशी सुरुवात झाली, काही कारणांमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी कसं भाग पाडलं आणि तेच कैफी आझमी पुढे कट्टर मार्क्सवादी कसे बनले हा प्रवासही लक्ष्मीकांत देशमुख यांनी उलगडून दाखवला. कैफी आझमींमधला कार्यकर्ता, धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांच्यात असलेला मानवतावाद, ‘गरम हवा’ सारखे त्यांचे चित्रपट, ‘अनुपमा’, ‘हिररांझा’, ‘कागजके फूल’, ‘हकिकत’ सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीतं, त्यांच्या कविता, कैफी आझमी आणि शौकत यांच्यातलं उत्कट प्रेम, ३२ वर्ष पॅरेलेसिस झालेला असतानाही केलेलं सामाजिक काम आणि त्यांना भरभक्कमपणे शौकतनं दिलेली साथ हा सगळा प्रवास खरोखरंच थक्क करणारा होता. कैफी आझमी सारखा शायर, कवी, प्रियकर, पती आणि कार्यकर्ता पुन्हा होणे नाही हेच मनाला जाणवत राहिलं.

वेध कट्ट्या तर्फे आज सुरु असलेल्या मुलाखतीचा ताजा फोटो सुरेख फ्रेम सह आम्हाला स्वागत थोरात या मित्राच्या हस्ते भेट देण्यात आला. आजच्या कार्यक्रमाची कायमस्वरूपी आठवण!

‘एका संमेलनाध्यक्षाची आत्मकथा’ आणि ‘कैफी आझमी’ अशी दोन्हीही पुस्तकं वेध कट्टयावर आज उपलब्ध करण्यात आली होती. मात्र मुलाखतीनंतर सगळीच पुस्तकं संपली आणि स्वाक्षरीसाठी सगळ्यांनीच लक्ष्मीकांत देशमुख यांच्याभोवती गराडा घातला. आजच्या वेध कट्टयावर अंजली लक्ष्मीकांत देशमुख, स्वागत थोरात, विश्वंभर चौधरी, सरिता आवाड, शंकर, चित्रा देशपांडे, अश्विनी देशपांडे, निकिता थोरात, सीमा चव्हाण, अप्पा आसोंडकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज विश्वंभर चौधरी यांनी लक्ष्मीकांत देशमुख यांचा परिचय करून द्यावा असं वेध कट्टयातर्फे सांगण्यात आलं आणि त्यांनी देखील आज इथे तीन देशमुख एकत्र आल्याचं सांगितलं. मुलाखत देणारे लक्ष्मीकांत देशमुख, मुलाखत घेणारी दीपा देशमुख आणि परिचय करून देणारे देखील विश्वंभर चौधरी हे देशमुखच! अगदी अनौपचारिकरीत्या त्यांनी परिचय करून दिला.

दीर्घ मुलाखतीनंतर आभाराचं काम नेहमीप्रमाणे डॉ. ज्योती शिरोडकर हिने समर्थपणे केलं. कार्यक्रम संपला तरी लोकांना जागीच खिळवून ठेवण्याची ताकद तिच्या आभाराच्या शब्दांत असते हे मात्र खरं. (मला इथे आणखी कितीतरी गोष्टी शिकायच्या आहेत हे आज आवर्जून लक्षात आलं.) तिने लक्ष्मीकांत देशमुख हे जागल्याची अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचं सांगितलं. तसंच लक्ष्मीकांत देशमुख यांनी अगदी सुरुवातीच्या काळात केलेली ‘ट्रिंग ट्रिंग वाजतोय टेलिफोन’ ही कविता आपण लहानपणी कशी ऐकली आणि त्या वेळची वडिलांबरोबरची आठवण ज्योतीने सांगितली आणि आज त्याच कवीला, लेखकाला आपण समोर बघतो आहोत याचा आनंद तिच्या गहिरवल्या स्वरातून कळत होता.

कार्यक्रम संपला आणि कैफी आझमी प्रत्येकाच्या मनात रेंगाळत राहिले हे मात्र नक्की. मात्र घरी परत येत असतानाच शबाना आझमीला अपघात झाल्याचं वृत्त कळलं आणि मन अस्वस्थ झालं. तिला लवकर आराम पडो असं मन सारखं म्हणत राहिलं. ( कैफी आझमींप्रमाणेच शबानाच्या रक्तात कार्यकर्तेपण असून आपल्या गावाच्या विकासासाठी ती करत असलेलं काम प्रशंसनीय आहे आणि विशेष म्हणजे त्याचा कुठेही गाजावाजा न करता हे काम अविरतपणे सुरू आहे.)
(आजचा कार्यक्रम मॅक्स महाराष्ट्र वाहिनीने live दाखवला. त्याबद्दल प्रियदर्शिनी आणि टीम यांचे मनापासून आभार.)

-दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

Melting Boxes

When I first set foot on a Mumbai local train station, I thought about the many number of stations there might be in this city. In my stay here, I wanted to board trains from as many stations in the city as possible. In essence, I wanted to experience the whole of this city. I’ve found that when the local government changes, the vibe of the area changes altogether. Kalyan VEDH, yesterday gave me the opportunity to visit a new place. This fact was as exciting to me as knowing what I was going there for.

Sunday’s theme ‘Out of the Box’ is a synonym for VEDH itself. That was what pulled me towards it the first time, a few years ago. Since then, I, a person who was buried in the box has time and again heard many faculty members across themes and VEDHian cities, who have trodden upon out of the box paths. The program on Sunday was but a cherry on the cake, like a summary of years of my observation of ‘out of the box’ people.

After listening to the various interviews, I was reminded of my favorite German song, ‘Die Gedanken sind frei” (Thoughts are Free). A famous folk song that is an integral part of not only the German culture but also the thought process of the countrymen, it was written during the horrors of holocaust. It says that tyrants can imprison people, but not their thoughts.

And should tyrant take me and throw me in prison,
My thoughts will burst free like blossoms in season
Foundations will crumble and structures will tumble
And free men will cry, Die Gedanken sind frei.”

This has always been a powerful and inspirational song for me. I think these lines apply to not just thoughts, but also to the freedom to choose your path. But if that is how free thoughts are, and today, even people are, what keeps us from using the freedom to get ourselves out of the box? I think the answer lies in what the boundaries of the box are made up of, as much as what happens inside the box. The sides are like modern dictators, and there are two: the society that dictates what a “reputed profession” is, heavily influencing carrier choices by managing to curb interests somehow and bitterly criticizing those who still manage to break free. The other dictator is the voice within, that might be of confusion, self-doubt, lack of clarity about the profession and why it is needed and anxiety to venture out of our comfort zone.

I realize I’m walking on a very shaky bridge here. Exercising one’s freedom to choose and out of the box path doesn’t mean one impulsively fulfills whatever wish comes to their mind. The box needs to be filled with a lot of responsibility about the choice and the courage to accept the emotional and practical consequences. If both things, responsibility and acceptance combine, the wall of the box would evaporate and out would emerge a path that eventually, is followed by many.

When I give a picture to this process in my mind’s eye, I don’t see it as a sudden process, as a product of putting in energy at one single time. This is a slow change, bottom up, that is a fine result of years of skill acquisition and hard work, that unknowingly results in the melting of the box. This process of being was beautifully highlighted in one of the VEDH choir songs that day- People who set out on a journey out of their box are met with ridicule. When those in the box look up and see the different and glorious path outside, the ridicule is transformed to awe and appreciation. Now the maker of the path looks back to see how empowering the path has been for many inside the box. The caterpillar doesn’t know it would be a butterfly in the future, it keeps doing what it does, because that is its nature! The metamorphosed butterfly touches many things and lives like our ‘out of the box’ people, again because that is its very nature.

Out of the Box isn’t doing, it is a process of being.

-Ketaki Joshi.

Kalyan VEDH 2020- Out of the Box

Everyone will tell you that we live in boundaries. Not only does is denote the rules we need to abide by, but all the norms, ways of living, manners, work cultures and many things that stay a certain way for years together.

Look at Virus from three idiots. His life was so governed by boundaries that he dictated what his coming generations should opt for as professions, he knew how much time was needed for mundane activities in exact minutes and had defined ways of saving time where he wanted to. In the same movie, Raju was in the schakles of another pattern, governed by religious rituals and driven by them for the better part of the film.

Both the characters are shown to follow fixed patterns of living. One day doesn’t differ from another. If we stretch the metaphor and look at people around us, we can easily see that lives lived in a certain place in a particular country and era don’t differ from one another either. We educate ourselves, train ourselves for some job, make money, have families and are good to go.

These are our boundaries that make a box around us. We think in the box, live in the box and are governed by the box. From that perspective, we’re robots that are taught how to think, how to do, what to get and how to live. There are but a handful who manage to think out of the box- to break the monotony for the betterment of self and the society alike.

Now what does “out of the box” thinking mean? Simply put, it means using existing resources to create something useful that helps the self and the society develop. When the telephone was invented for the first time, the materials that make it were not made on some other planet by some odd creatures. Mr. Alexander Graham-Bell took what existed in the box, thought differently about it and invented this wonder. Today, everyone owns a telephone and its evolved brother: the cell phone or the homo sapien sapien version of it: the smart phone. I only want to tell you here, that some thought, once labelled as ‘out of some box’, propelles a new way of life. When this way of life is adopted by many, it only creates another box greater in dimensions and higher on the graph, containing us in new rules.

In this new box, the once ‘out of the box’ idea works and serves a function for the society for a while. But thoughts have an expiry date too! Think of laws that worked for sometime and received immense support, but are ammended or repealed over time. As a society constantly facing the winds of change, the same box can’t be a good fit anymore. Like we treat expired food as poison, we should treat an expired thought harmful too. Safe to say, the need to break a box comes from the society as much as it comes from within a person. Hence, breaking a box isn’t a one time event, it has to be done every time the new box is created. Of paramount importance while doing this is to enjoy the process of breaking the box, of accepting the discomfort of staying in no man’s land, that is in a boundary less space while the new box is made and to find happiness in the new box as well. This is the very secret to a box breaker’s personality development- the very reason why the dimensions of every new box keeps increasing.

This year’s theme for the sixth Kalyan VEDH and the 98th VEDH of all, is the very topic of the blog- “Out of the Box”. Through the interraction with faculty members who have chosen fields that are out of the box and have created an interesting body of work that has contributed to the society, we wish to highlight not only the meaning and depth of the theme, but also the process behind it.

Team Kalyan VEDH coordially invites you to the event, going to be held on the 5th of January, 2020!

-Devendra Tamhane Coordinator, Kalyan VEDH.

When Injustice Becomes Law, Rebellion becomes Duty

I was busy studying the beautiful stage design at the recently concluded Mind Fest, which was about to start in a couple of minutes, when Palshikar Sir tapped on my shoulder gently. In a voice filled with excitement, seriousness and appreciation all at the same time, softer than his usual style and slowly uttering every word to convey its importance, he told me, “The theme for Latur VEDH this year is just splendid!” “Honorable Rebel”, he said, remembering the correct words. He searched my face with eyes wide with excitement, to see if I shared his emotions and whether I had really got the essence of the theme. It didn’t take even a split second for my head to be swayed back in pure amazement. The train of thought that I anticipated only after Mind Fest was already running.

This theme, was extremely close to my heart. Readers, please don’t fasten your seat belts and expect no story of injustice after this line, for I have, thankfully and much my fluke, experienced no such thing on a huge basis. I, do, just like all of everybody, however, experience inequality and curbing of my freedom, albeit about minor life choices from time to time. I choose to look at this as a product of living in this society. Unfortunately, I have become so used to this pattern of a lack of liberty in certain matters that one doesn’t even notice minor incidences, questions and behaviours that are a proof of the promised but absent liberty. I wish there were some band with a bulb strapped to our hands that would beep everytime someone or something arrests our basic freedoms. Quantifying such abstract yet important constructs would be helpful, certainly. It would awaken everyone, including myself, to the everyday assaults at freedom, that are so routinely that the eye fails to pick it up as a figure screaming out from its background. To come back to why this theme rang a bell in my heart, was simply because I’m a strong believer in the principles of liberty and equality, as I think, everybody ideally should be. But only if the happenings in this world were fueled by my wishes!

Yuval Noah Harari, in his book, ‘Sapiens’ puts forth an extremely interesting observation. Humans, he says, spend their life around concepts that are more imagination than nature. How much do we love our country, a totally man made idea? How much time and energy do we spend on earning money, which, by the laws of nature, doesn’t exist! To carry this point forward and to make it broader and deeper, I think inequality, lack of liberty is the product of the same domain that is not nature. Except this time, it also works against humanity itself, instead of propelling it towards betterment. And in the face of such a ‘pralaya’, there comes a time when those choosing to go against the ingrained, unnatural principles that drive the society have to be celebrated as heroes.

What creative mind thought that offering something to a certain ‘deity’ would give a desired result? What a genius of a hypocrite must be the person, who popularized certain sexual orientations as unnatural, when unnatural was the seed of this very thought? Are we so stone headed, that the professing of constitutional principles for so many decades has been a waste on many of us?  Why is it so easy to wear the dresses of inequality and celebrate it, preach it and pass it on to the next generation like it were a festival? In contrast, why is walking on the paths of equality, liberty, fraternity like lifting the Shiva’s bow?

In a society full of sheep walking in an unmindful heard, there are lions and lionesses, who want to start their own pride, rather, restore the universal, natural pride to normalcy. Paromita Goswami, Dr. Hameed Dabholkar, Disha Pinky Sheikh, Atul and Amrita Gailoge are Ruksana Mulla, Vaishali Ghuge, Archana Bhosale and Archana Man, namely the faculty members of Latur VEDH are such leaders of prides. When they roar rationality at Latur VEDH this year, I wish it touches our ears as powerfully as the Midas touch, only to put us into action that restores the universal, natural normalcy.

-Ketaki Joshi

वेध कट्टा, पुणे – चैतन्य सरदेशपांडे – २१ डिसेंबर २०१९

आज रस्त्यात वाहतूक कमी लागली आणि मी अगदी वेळेच्या आत वेधकट्टयावर जाऊन पोहोचले. काहीच वेळात चैतन्य आणि मंजू प्रवेश करते झाले. आज चैतन्यने पांढरा शर्ट आणि निळी जिन्स, तर मी पांढर्‍या रंगाची साडी नेसायची असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही दोघांनी एकमेकांकडे विजयी मुद्रेनं बघितलं. काहीच वेळात आम्हाला कार्यक्रमासाठी टेरेसवर येण्याची सूचना आली आणि माझ्या पुढे चैतन्य आणि मी त्याच्या मागे असं आम्ही जाऊन पोहोचलो.

दीपक पळशीकर सर चैतन्यला बघताच स्वागत करत, ‘या’ म्हणाले आणि खुर्चीवर बसण्याची विनंती केली. पण चैतन्य ऐकतोय कसला? तो आपला मोबाईल कानाला लावून येरझारा घालत बोलण्यात मग्न होता. त्याला समोरच्या श्रोत्यांचीही शुद्ध राहिली नव्हती. मी पळशीकरसरांना हातानंच खूण करत थांबवलं आणि चैतन्यला आवाज दिला, पण त्याला माझा आवाजही ऐकायला येत नव्हता. मग मी त्याच्या मागे आणि तो माझ्या पुढे – पण मोबाईलवर बोलतच – अशी आमची पळापळ सुरू झाली. अखेर मी प्रेमानं चैतू म्हणणं सोडलं आणि ‘कार्ट्या थांब’ असं जोरात ओरडले, तेव्हा चैतन्य भानावर आला आणि त्यानं मोबाईल बंद केला. मी त्याला ओरडत आणि हाताला धरून खेचत खुर्चीवर नेऊन बसवलं. समोर असलेल्या श्रोत्यांची मी माफी मागितली. चैतन्यनं असं वागायला नको होतं हेही त्याला सांगितलं.

त्यानंतर रीतसर वेध कट्टयाचा कार्यक्रम सुरू झाला. वेधच्या शिल्पानं अगदी नेमक्या शब्दात चैतन्यची ओळख करून दिली. त्यानंतर अर्थातच माझीही करून दिली. ‘वेध कट्टयाची परमनंट सदस्य’ म्हटल्यावर खुशीत येऊन मीच टाळ्या वाजवल्या. कार्यक्रमाची सुत्रं आमच्या हाती सुपूर्त करण्यात आली. (सुरुवातीला चैतन्य लोकांकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर जे बोलत फिरला आणि मी त्याच्यावर कार्ट्या म्हणून जी ओरडले, तो आमच्या एन्ट्रीचा एक भाग होता. म्हणजेच आम्ही मुद्दामच जरा वेगळी नाट्यमय सुरुवात केली होती!)

मी चैतन्यबद्दल बोलायला सुरुवात केली. चैतन्यचे बाबा म्हणजेच माझा मित्र धनू याची आणि माझी मैत्री चैतूच्या जन्माआधीपासूनची म्हणजे आम्ही अकरावीत असल्यापासूनची हे आवर्जून सांगितलं. थोडक्यात मी चैतन्यला त्याच्या जन्मापासून किंवा आधीपासून ओळखते हेच मला सांगायचं होतं.

चैतन्यच्या घरातच नाटकाचं वातावरण असल्यानं तो कळायच्या आधीपासूनच नाटकाकडे वळला. वडिलांच्याच बालनाट्यात त्यानं सुरुवातीला काम केलं. वडिलांबरोबर सतत नाटकाच्या प्रॅक्टिसला जाणं असायचंच. मग शिकत असतानाच कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन शाखेत प्रवेश घेतला. कम्प्युटर क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण करून पदवी देखील मिळवली, मात्र त्याचं मन त्या शिक्षणात रमलंच नव्हतं आणि मग आपल्याला नाटकच करायचंय कोणा एका क्षणी निश्चित झालं.

झी गौरवचं नामांकन चैतन्यच्या ‘माकड’ या नाटकाला मिळालं. तसंच नाट्यगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार या नाटकाला मिळाले. वर्तमानपत्रांनी आणि समीक्षकांनी या नाटकाची वाखाणणी केली. आसपासचं राजकारण, त्याची नको त्या थराला गेलेली पातळी आणि ‘मला काय करायचंय असं म्हणणारा’ सर्वसामान्य माणूस, यात कसा ओढला जातो आणि त्यात त्याची कशी फरफट होते यावर भाष्य करणारं हे नाटक आपण कसं लिहिलं आणि कधी विचारही केलेला नसताना त्यातली प्रमुख भूमिकाही करावी लागली याबद्दल चैतन्य बोलला. त्यानं माकड नाटकातला एक प्रसंगही श्रोत्यांसमोर करून दाखवला.

चैतन्यनं रीतसर नाट्यक्षेत्रातलं शिक्षण घेऊन त्यातलीही पदवी मिळवली. ही पदवी मिळवताना त्याचा संबंध वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी, त्यांच्या भाषेशी, त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या गाण्यांशी आला. त्यातलं बंगाली भाषेतलं एक गाणं चैतन्यनं गावून दाखवलं. हे अनुभव खूप शिकवून गेले असं त्याला वाटत होतं. त्यानं तेंडुलकरपासून अनेक लेखकांचं लिखाण वाचलं होतंच, पण आता त्यानं शेक्सपिअर अभ्यासला. त्याची नाटकंही केली आणि त्यातल्याच ऑथेल्लो या नाटकातलं इंग्रजीमधले डॉयलॉग त्यानं सफाईदारपणे सादर केले.

चैतन्य मालिकांचं संवाद लेखन करतो, तो स्वतः एकांकिका आणि नाटकंही लिहितो. भानू काळेंच्या ‘अंतर्नाद’ या मासिकात त्याची पहिली ‘चिकारा’ ही कथा प्रसिद्ध झाली आणि तिला पहिला पुरस्कार मिळाला. त्या कथेचा सार त्यानं सांगितला. चाळीशीतल्या माणसाची होणारी घुसमट, त्याचं जगणं आणि एका कुत्र्याचं जगणं यातलं साम्य त्यानं या कथेत दाखवलं होतं. “माकड असो का कथा – तुझं लिखाण जरा जड असतं”, असं म्हटल्यावर चैतन्यनं आपण पुण्यात शिकायला आलो तेव्हाच आपल्याला जड जड लिहिलं तरच लोक मानतील असं वाटल्यामुळे आपण तसं लिहायला लागलो असा विनोद केला. कार्टून फिल्म्स, अ‍ॅनिमेटेड फिल्मस, फॅन्टसी, वास्तव या सगळ्यांची एकमेकांत घुसळण होते आणि आपलं लिखाण बाहेर येतं असं चैतन्यला वाटतं. गर्दीमुळे मुंबईची तुंबई कशी झाली आहे आणि ‘ठसका’ ही एक एकांकिका यावरही चैतन्य बोलला. चैतन्य सगळ्यात माध्यमात वावरत असला, तरी शॉर्टफिल्म्स, वेबसिरीज, मालिका, चित्रपट यात सगळ्यांत जास्त नाटक हेच माध्यम आवडतं असं तो म्हणाला.

यानंतर त्याच्या सध्या गाजत असलेल्या ‘गुगलिफाय’ या दीर्घांकावर तो बोलला. गूगलनं आपल्या जगण्यावर कसं आक्रमण केलंय आणि अशा आक्रमण झालेल्या एका मुलीला कुणी तो त्या विळख्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतो यावरचं कथानक यात आहे. आपली मेमरी काम करणं सोडून देतेय, आपण गूगलवर किती अवलंबून झालोय हेही त्यानं सांगितलं. इतकंच नव्हे तर गुगलिफायमधला एक प्रसंगही त्यानं सादर करून दाखवला.

“आपल्यासमोर आपणच स्पर्धेला उभे आहोत आणि आपणच आपली वाट शोधत चालणार आहोत”, असं चैतन्य म्हणाला. आपल्या वडिलांनी आपल्याला कधीही कुठल्याही बाबतीत अडवलं नाही आणि कायमच सपोर्ट केला असं त्यानं आवर्जून सांगितलं. “मला काही अचिव्ह करायचंय, किंवा माझी काही स्वप्नं आहेत याचा मी विचार केला नसून मी प्रक्रियेतला, प्रत्येक क्षणातला आनंद घेत चालणार” असल्याचं चैतन्य म्हणाला. शेवट करताना चैतन्यनं आम्ही लिहिलेल्या ‘कॅनव्हास’ या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केला आणि त्यातल्या पिकासोचा लहानपणचा एक किस्सा सांगितला. पिकासोला पिकासोच व्हायचं होतं, तसंच चैतन्यला चैतन्यच व्हायचं आहे असं तो म्हणाला!

चैतन्यबरोबरच्या गप्पा सगळ्यांनाच भावल्या. यश मिळाल्यावर आपण त्या यशस्वी कलाकाराची यशोगाथा लोकांसमोर मांडतो, पण पुणे वेधकट्टयाचं वैशिष्ट्य असं की प्रक्रियेत आनंद घेणार्‍या, यशापयशाची पर्वा न करणार्‍या एका तरुणाला त्यांनी इथं बोलतं केलं!
कार्यक्रमाच्या शेवटी वेधची डॉ. ज्योती शिरोडकर हिने अतिशय गोड स्वरात आभार मानले. आभार कसे मानावेत याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते ज्योतीकडून घ्यावं. कार्यक्रमाची जी उंची असते, तितकीच उंची ती आभार प्रदर्शन करून गाठते हे विशेष!

आजच्या कार्यक्रमात चैतन्यनं मीरारोडचं पॅसेंजरची प्रतीक्षा करणार्‍या एका रिक्षाचालकाची गोष्ट सांगितली होती. तो रिक्षाचालक जवळच्या ठिकाणी जाणार्‍या पॅसेंजर्संना नाही म्हणायचा आणि असं करता करता नाही हे उत्तर इतकं सहजपणे त्याच्या तोंडून बाहेर पडत गेलं की लांबचा म्हणजे मीरारोडला जाणारा पॅसेंजरही त्यानं नाही म्हणत गमावला. त्या रिक्षावाल्याला जेव्हा आपली चूक लक्षात आली तेव्हा त्याने जवळचे, दूरचे असं न करता जो येईल त्या पॅसेंजरला त्यानंतर रिक्षात घ्यायला सुरूवात केली आणि यातच त्याला मीरा रोडला जाणारे पॅसेंजरही आपोआपच मिळायला लागले. हे सांगताना चैतन्यनं आपणही कमी लांबीच्या भूमिका आल्या की नाकारायचो असं सांगितलं. जॉन अब्राहमचा चित्रपट असलेला ‘फोर्स टू’ हा चित्रपटही त्यानं नाकारला होता. पण रिक्षावाल्याचा अनुभव ऐकताच चैतन्यनं स्वतः फोन करून ती छोटीशी भूमिकाही स्वीकारली. रोजच असे अनुभव आपल्याला शिकवतात असं तो म्हणाला. याचा उल्लेख करून ज्योतीनं उद्या तुलाही तुझ्या करियरमधलं मीरारोडचं पॅसेंजर मिळेल अशा शुभेच्छा नव्हे तर खात्री दिली.

‘चिकारा’ कथा लिहिणारा चैतन्य हा वयाच्या विशीत चाळीशीतल्या माणसाची व्यथा लिहितो, यावरून त्याची संवेदनशीलता किती तीव्र आहे याविषयी तिनं सांगितलं. चैतन्यचं चैतन्य कशात आहे तर त्याच्या शिकण्यातल्या हपापलेपणात आहे, मनाला आवडेल, जिवाला रुचेल ते करण्यातच आहे असं ज्योतीनं म्हटलं. काळाची पावलं ओळखून वेळीच गूगलच्या आहारी गेलेल्या तरुणाईला त्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार्‍या चैतन्यचं तिनं कौतुक केलं.

आज जरा ज्योतीला वेधकट्टयाची नशा अंमळ चढली असावी. कारण दीपा देशमुख म्हणजे लेखनाचा कधीही न थांबणारा, अखंड कोसळणारा धबधबा असं वर्णन तिनं माझ्याबाबतीत केलं. माझं लिखाण, सामाजिक काम याबरोबरच मी चैतूसारख्या किती कार्ट्यांमध्ये दडलेला (मी चैतुला सुरुवातीला रागाने कार्ट्या म्हटलं होतं!) हरहुन्नरीपणा ओळखून त्यांना प्रकाशात आणलं याचा उल्लेख केला. (खरं तर मला डॉक्टरांनी ६ किलो वजन कमी करायला सांगितलंय, पण या ज्योतीमुळे या कार्टीमुळे ते त्याच क्षणी १२ किलोनं वाढलं!)

सरतेशेवती आजचा वेध कट्टा चैतन्यमुळे चैतन्यमय झाल्याचं ज्योतीनं सांगितलं आणि तेच चैतन्यमयी वातावरण मनात घेऊन उपस्थित सर्व आपापल्या घराकडे वळले!
आज कार्यक्रमात चैतन्यचे सुयश, पूजासह अनेक मित्र, निकिता थोरात तिची मैत्रीण प्राची, शंकर, मस्कतहून पुण्यात स्थायिक झालेले विनायक जोशी आणि त्यांच्या पत्नी, मुक्ता मनोहर, सरिता आवाड आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.


-दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

Mind Fe(A)st Diaries- Part III The Conclusion

When you are used to a certain amount of anything, less is always bothersome. It makes you restless and you are lost as to what to do of all this energy now. I was fully anticipating this low after returning from a great Mind Fest weekend today. Call it ‘Monday Blues’ or plain disappointment about life not being so interesting everyday. It was literally like returning from the cold winter- lit Pune to the melting Mumbai.

Last day’s event started with the discussion on the difference between perfection and excellence. This is a subject extremely close to my heart because of my personal trajectory. My maternal grandfather, a person I absolutely love and adore has always been insistent about things being a certain way, the newspapers have to be folded correctly, the beds have to made in a way that no creases should be created on it in the first place. Little things in our mundane lives have to all be performed in a certain manner. He made it a point to imbibe that same quality in both his daughters and grandchildren. All of us thought it was his demand for perfection; for we would have to suffer his disappointing gaze and expression every time we didn’t do anything as per his standards. Initially, he was the ‘Haanikarak Baapu’ from Dangal and we observed neatness only to escape ‘that’ look We openly make fun of and imitate this very specific look of disappointment. At this point, Abba has a hearty laugh and says, “But aren’t you better off because of these habits?” None of us can help but agree. In my teenage I realized the importance of neatness and even though it was boring, I didn’t compromise on it. Today, when I have come away from home and have created a space for myself in another city, I observe the same neatness to every last nook, corner and thing in my house. But the process, unknowingly has become meditative. I see the beauty in symmetry, folding clothes with edges on one another is nothing short of meditation. I can literally be lost in cleaning and arranging without any inclination of the time I spend in it. It is, in all justice, a true journey from the Limbic system to the neocortex, where I find immense meaning in orderliness, believe it or not.

Another huge shift from perfection to excellence for me was academically. HSC was the time when everyone focused on marks. Securing a place in Fergusson College for me was on the one hand so precious and my confidence about it on the other hand was so not high that I, for the first time ever in my life focused on fetching marks, on ‘perfecting’answers. Anyone whose got many marks at any point would realize its a very different game, that has potential to make people drown in it. Last year, I had to pay the huge cost of leaving home to learn what I wanted to. I was clear I hadn’t made this emotional investment for mere numbers. I wanted to learn. This naturally had me focused on bettering my skills and the demand for perfection evaporated. I am nowhere near excellence and the word can’t even be thought about, yet. But I would like to be grateful about the minimum fulfillment of a criteria of freeing myself from the shackles of perfection here.

The most relatable thing during the sessions yesterday was the bit about ‘Affluenza’. I find that not only is the incidence of this condition high and increasing day by day, but those who don’t have it are instead believed to be living in bubbles, have to suffer isolation and believed to lack substance as people on the whole!

The four pointers about the appropriate domains for spending money like education, health, etc, are helpful not only for those higher on the materialistic end of the spectrum, but for the overly misers alike. As Sir pointed out, spending a lot of money on the beautification of the outer self is always much less useful than spending time on honing the inner self. Exactly a couple of years ago, I and my partner in intellectual discussions, dear Srujan, were talking about people who have an “aura”. We observed, there are certain people who stand out, not merely because they are intelligent, smart, funny or educated; but because they are learned. We conceptualized them as having an “aura”. People having the most beautiful physical features can lack an aura, while the plainest of faces can demand a certain respect owing to their aura. People with this aura can be spotted in a crowd of hundreds and one look at them is enough to hints at what Sir calls ‘earned, mastered ease’ in their specific domain. This is what inner beauty means to me today. Beauty is simplicity with an aura.

I cannot help but marvel at the amount of work that must have gone into simplifying the simplified. Too many metaphors have already been given by scholars and yet, we nurture within ourselves, a need for more simplification with more metaphors, especially from today’s day and age.

The biggest irony of this entire process is that the level of simplification required by a concept of knowledge is inversely proportionate to the complexity of application required in life. This realization, right since I was listening to the event with rapt attention, has given seed to nervousness in my mind.

Mind Fe(A)st was a breath of fresh air, the sweet summer after a long winter. To give a ‘Game of Thrones’ analogy as we part, Winter has Come long ago for all of us. It is going nowhere unless summer rises from within every single one of us. The mind celebrated a true festival for the past three days. Now begins the herculean task of letting this Mind Fest seep slowly and build to become a Life fest!

-Ketaki Joshi.

Mind Fe(A)st Diaries- Part II

It appears that as the Fest is progressing and strengthening my experiences, words are proving progressively incapable of capturing their essence. But traditionally, all part ones were always followed by successors. Hence, this bold attempt at part two.

It was an experience absorbed by all the senses together, or I’d rather say, an experience that was designed and given so purely that it was only natural all the senses would absorb it. There were times when the sheer force of reality that was put forth was so much that I felt myself, in the true sense of the phrase, ‘taken aback’. At times when the words on the big projector screen made my eyes well- up. Have you ever been so overwhelmed by the beauty of knowledge that it brings tears of awe to your eyes? That happened many times, to many of us I’m sure. Sir’s voice, filled only with his sincere intention of imparting knowledge in all of the audience still sits in my ears, I hope, forever. The whole of me was absorbed, engaged in the experience.

The master of everything, the mammoth of a realization for me was the picture “The pale blue dot”. Looking at the earth as a dot in a beam of light put things into perspective for me. We take things, people, ourselves, cultures, economies, a little too seriously, considering we’re mere particles in the Brahman, such a very super tiny part of the space that, in doing all justice to the word, is the absolute ‘everything’. Being caught up in my relative notion of ‘everything’ seemed so selfish, naive and a product of being human after all. The phrase ‘putting one in their place’ is often used negatively. Today, I want to take the creative liberty of using it neutrally, that is to say, “matter” of factly (pun intended). I understood what a negligible space we all occupy in the vastness of the Brahman, and yet, we spend all our time on earth buying spaces or creating a space of our own as in an identity. Why bother if all the earth is ours and no geometrical point on the earth is ours at the same time? Why not bother if none of this is ours and all of this is ours at the same time? This is the very irony of things that made me aware of the balance between caring enough to be involved in doing and not to the point of being attached to its products.

Equality of opportunity, equality of looking at all human beings beyond their religion, race, gender, orientation are such important concepts. They are necessary for the smooth functioning of the society. But if we look at it from another perspective, how could we discriminate between any being on any basis if we’re all made of the same particles? If the same elements exist in all of us, a tiny part of the absolute whole? As crucial as these constructs of equality are, I realized how relative they all are. There is only one equality, the natural, absolute equality of being-the equality that takes us towards unity. All the others, equality of gender, race, caste or even the recent efforts of conservation of biodiversity are corrections of natural anomy, correction of the man made concept of inequality.

Even as a teenager I never believed in the typical notion of an afterlife, in that, I chose not to believe in it, it didn’t ring a bell for me the way any absolute truth should. I remember making a fairly bold statement in my positive psychology lecture one day. “If looked at from the lens of a mathematical perspective that says you will be put in such a body in your next life as your deeds in this life deserve, seems to be a theory derived at, by mundane minds who want to be the servants of their actions rather than unattached masters of it, and not a theory as in the carrier of knowledge, as is told to be.” This sentence received a fair amount of squirming in class for it felt like I had critiqued something. One who listened to Sir’s discussion about relative truths yesterday would understand that it was only half the case. I was, as the other truth goes, only asking for a more enduring explanation, asking for the absolute truth. And I believe I got that at the second day of the fest yesterday.

Another thing that struck me was the beauty with which each of the thinkers had woven the teachings of the Upanishads and Vedanta with words and metaphors with utmost sensitivity and grace. One of my dearest friends, Srujan did an experiment that I was envious about. He read six bestseller books from different genres simultaneously. He told me about how overwhelmed he was with so much to process. A few lines on the screen, just from one scholar’s pen gave me a similar feeling. Again, how can just a few lines carry so much meaning and hold so much applicability?

The word applicability brings me back to the anticipation of what the finale of the fest holds instore. I’m excited and equally nervous about being able to comprehend the words. I conclude this part, observing I feel a restless need to make Sir’s words tangible and capture them in a bag or better in Dumbledore’s pensive, wishing time would stop as the winter evening paints the sky with hues and blacks- just unrealistically wishing for the experience to not end.

-Ketaki Joshi

Create your website at WordPress.com
Get started