Design a site like this with WordPress.com
Get started

रंग माझा वेगळा

वेधच्या या वर्षीच्या सूत्रासाठी शेवटचा घटक ‘uniqueness’ हा सगळ्यात महत्वाचा! गेली दोन वर्ष आपण पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत त्या पुणे वेधचे या वर्षाचे सूत्र आहे “रंग माझा वेगळा”. यावर्षी आपल्या भेटीला येणार आहेत प्राजक्ता वढावकर, रुचिरा सावंत, चिंतामणी हसबनीस, डॉ. शरद बावीस्कर व निपुण धर्माधिकारी, ही unique मंडळी.

बुद्धांसोबत क्षणोक्षणी…

मनाने मनात मनाला पाहावे
भाव विचारांचे रंग न्याहाळावे
म्हणू नये कोणा हवेसे नकोसे,
खेळ मात्र त्यांचे अवलोकावे
तुझी पंचेंद्रिये सतत सोबती
उत्तेजना बाह्य हो त्यांचा सोबती
ध्वनी-स्पर्श-स्वाद, दृष्टी आणि गंध
मर्म प्रत्येकाचे ओळखावे
पुढती हे येती अन्य आणि जग
अनुभव तयांना अ-मग्न पहावे
प्रवास पळांचा जळावे फळावे
ढग वादळांच्या पल्याड अंबर
रात-दिवसाचा अनंत हा खेळ
कधी वीज वाजे कधी सप्तरंग
आकाशासाठी हे फक्‍त येणे-जाणे
तसे पहावे रे चित्ताच्या नभास
ना ते कुणाचेही, अंग-रंग घेई
दिसे तैसे नसे निळे किंवा काळे
न लगे तसाच थांग चैतन्याचा

मनबुध्दाच्या मयुरनृत्याची मैफल

“बुध्दांसह क्षणोक्षणी” या डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या कवितांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी आमच्या वेध चळवळीतील आमचे पालक श्री. दीपक पळशीकर सर यांच्यामुळे लाभली.हे पुस्तक डॉ. नाडकर्णींच्या बौध्द तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची टिपणे आहेत.
स्टेजवर पुणे वेधच्या डॉ. ज्योती शिरोडकर होत्या, मनोविकासतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी होते, वैदिक आणि बौध्द इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर होते, प्रख्यात मनोविकासतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे होते
मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे देखणे पुस्तक प्रत्येक सुबुध्द वाचकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे आहे. या कार्यक्रमाचे सुंदर समालोचन प्रस्तुत करणारा हा ब्लॉग जरूर वाचा!

छंदबद्ध

राष्ट्रीय वेध मध्ये हसऱ्या चेहऱ्याच्या, बोलक्या डोळ्यांच्या आर्निका परांजपेशी ओळख झाली आणि छंद आणि वृत्तांच्या रंगीत जगाची दारं उघडली गेली. तसं शाळेत शिकलेल्या कवितांमधून छंद भेटले होतेच पण त्यांच्याशी मैत्री मात्र झाली नाही. मात्र तिच्या मुलाखतीतून आणि बांधणीच्या कविता ह्या You Tube channel ने हा वृतांचा नवा छंद दिला आणि मग तिच्या विषयी लिहिताना छंदबद्ध कविता का लिहू नये असं वाटून गेलं, आणि मग छंदोरचना हे माधव ज्युलियनांचं पुस्तक आणि बांधणीच्या कविता अशा समांतर ट्रॅक वरून गाडी निघाली!

“राहुल जाधव – मुक्तांगणच्या स्वप्नाची सार्थकपूर्ती”

मातीची मशागत केली जाते, नंतर पेरणी, सिंचन, रोपांची वाढ, त्यांची काळजी – अशा मोठ्या प्रक्रियेनंतर पिकांत दाणा भरतो, शेत बहरते. मात्र हे बहरलेले शेत शेतकऱ्याच्या डोळ्यांनी मातीत पहिला हात घालण्याआधीच पाहिलेले असते. सारे कष्ट त्याच्यासाठी केवळ त्याच स्वप्नाचा पाठलाग असतात. डॉ. अनिता (सुनंदा) आणि अनिल अवचटांनी असेच एक स्वप्न मुक्तांगणच्या रुपात पाहिले होते, पुलं आणिContinue reading ““राहुल जाधव – मुक्तांगणच्या स्वप्नाची सार्थकपूर्ती””

सुभाषिनी अर्निका – भाषेविषयी ऐसपैस गप्पा

“राष्ट्रीय वेध” मालिकेतील दुसरे पुष्प – अर्निका परांजपे यांची मुलाखत शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी Avahan IPH च्या युट्युब चॅनेलवर प्रसारीत झाली. मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ठाण्यातील Avahan च्या स्टुडिओतुन लंडनमधील अर्निकाशी गप्पा मारल्या. तंत्रज्ञानाच्या सुविधांमुळे भौगोलिक अंतर क्षणात मिटवून टाकता येते, अन्यथा या गप्पांसाठी बराच वेळ, पैसे आणि कार्बन खर्च झाला असता. वेधमधीलContinue reading “सुभाषिनी अर्निका – भाषेविषयी ऐसपैस गप्पा”

कवितेचा वेध घेणारी सोनेरी संध्याकाळ

आजवर IPH आणि वेध ने मिळून मला (आणि इतर अनेकांना) कितीतरी सुंदर दिवस दिलेत. कॅलेंडरमध्ये जशा निळ्या आणि लाल तारखा असतात, तशा वेध किंवा वेध संबंधित इतर कार्यक्रम असतात त्या तारखा मला नेहमी सोनेरी वाटतात. त्याआधी आणि नंतरचे कितीतरी दिवस त्याच एका दिवसाचे विचार मनात घोळत असतात आणि इतके दिवस पुरेल इतकी ऊर्जा त्या दिवसातूनContinue reading “कवितेचा वेध घेणारी सोनेरी संध्याकाळ”

Little by Little

Choosing a career is rather a complicated business. It is certainly not as plain and simple as looking at one’s marks and deciding what stream to opt for. There is aptitude, interest, intellectual ability, and personality to be considered. Now place these four variables in a context-the personal, economic, and socio- political context that anContinue reading “Little by Little”

लॉकडाऊनमधील कविता !

“अव्यक्ताचा आरसा”-कसोटीच्या काळातील भावनांची सोबत, हा एक अखंड उर्जा देणारा डॉ. आनंद नाडकर्णी यांचा कवितासंग्रह. सरांच्या जिवंत लेखणीतून साकारलेल्या या कवितांचे दिनांक ५ मार्च,२०२१ ला ऑडिओ-बुक, इ-बुक व हार्ड-बाऊंड बुक अशा ३ वेगवेगळ्या रुपात, एकाच वेळेस पहिल्यांदाच प्रकाशन झाले. लॉकडाउनच्या काळात अंत:स्फूर्तिने, उस्फुर्तपणे जन्मलेल्या या सरांच्या कविता, अशाप्रकारे एका देखण्या पुस्तकाच्या रुपात प्रकाशित झाल्या. सरांच्याContinue reading “लॉकडाऊनमधील कविता !”

Borrowed Bricks and Lending Hands

A solitary boy stood at the chawl terrace. No, he was a man technically, but with such a palpable air of innocence that calling him a thirty- something ‘boy’ felt more apt. I smiled at him, not the tentative smile I reserve for strangers, but a warm one. It seemed right, afterall. He averted hisContinue reading “Borrowed Bricks and Lending Hands”