आपली संस्था म्हणजे आय्. पी. एच्. अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ स्थापना झाली तेव्हा जागतिकीकरण नावाचा शब्द नव्याने येऊ घातला होता. कॉम्प्युटर म्हणजे माहिती साठवण्याचे खोलींएवढे अवाढव्य यंत्र अशी समजूत होती. टेलिव्हिजन रंगीत झाला होता पण शहरातल्या काही मोजक्या घरांचा अपवाद वगळता ‘स्टार टिव्ही’ ने म्हणजेच सॅटेलाईट चॅनल्स् नी आपले बस्तान बसवले नव्हते. आज आपण इंटरनेट आणि सोशल मिडीया खिशात घेऊन फिरतोय् त्यापेक्षा फक्त सव्वीस वर्षे पाठीमागे जायचं…फक्त?… अनेक युगे मागे गेल्यासारखे वाटेल आपल्याला. म्हणजेच माहितीची देवाण-घेवाण खूप मर्यादित होती. ‘लोकल’ हेच जणू ग्लोबल होते.
ह्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याची व्याख्या अशी केली जायची ते आता पाहू. आपली संस्था जिथे सुरू झाली ते ठाणे शहर तर महाराष्ट्रामध्ये ‘वेड्यांच्या हॉस्पिटल’चे शहर म्हणूनच ओळखले जायचे. मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनच मुळी ह्यातून ध्वनीत व्हायचा. पण मानसिक आरोग्याचा पाया आहे मनोविकास (Development). त्यासाठी लागणारी वैयक्तीक, सामुहीक मदत-सल्ला-प्रशिक्षण हा खरा मानसिक आरोग्याचा गाभा. दैनंदिन आयुष्यामध्ये येणार्या बाह्य परिस्थितीमधून तसेच स्वतःच्या मनातून उत्पन्न होणारा तणाव असह्य झाला की येते मानसिक विकलता (Distress). ह्या टप्यावरही गरज असते आधाराची आणि मार्गदर्शनाची. खरे तर कोणत्याही समाजामध्ये ह्या दोन पातळ्यांवर सशक्त मदत मिळाली तर मनोविकृती (Disorder) ह्या तिसर्या पातळीला कमीत कमी लोक पोहोचतील.
आपल्या देशातील मानसिक आरोग्याची प्रचलीत व्यवस्था मात्र नेमकी उलटी मांडणी करते. सगळ्यात महत्व मनोविकृतीला म्हणजे Disorder ह्या गटाला. इतर पातळ्या तर व्याख्येतच बसत नाहीत. बरं ह्या मानसिक आजारांवरच्या उपचारांची पद्धत कशी तर त्यांना समाजापासून दूर काढून फक्त गोळ्याऔषधांचे उपचार करण्याची. त्यातला कुटुंबाचा सहभाग, समाजाची जागृती ह्या गोष्टींना महत्व शून्य! आय्. पी. एच्. संस्थेचे वैचारीक महत्व हे की प्रचलीत व्यवस्थेला आव्हान देणारी चौकट पहिल्या दिवसापासूनच स्वीकारली गेली. विकास (Development) आणि विकलता (Distress) ह्यावर भर देणारे कार्यक्रम, उपक्रम, प्रकल्प, आणि सेवा. विकृती अर्थात् आजाराच्या उपचारांमध्ये कुटुंबाच्या सहभागाने पुनर्वसनावर भर. मग आजार स्किझोफ्रेनियाचा असो की व्यसनधीतेचा. विकासाच्या वाटांवर मार्गदर्शन करणारे उपक्रम सुरु झाले ते विविध वयोगटातील विद्यार्थी, पालक, शिक्षक ह्यांच्यासाठी. संस्थेच्या उपक्रम केंद्रामधल्या प्रत्येक सेवेबरोबर सुरु झाला लोकांपर्यंत पोहोचण्याचा एकेक प्रकल्प. १९९० साली ‘व्यवसाय मार्गदर्शन चाचण्या’ अस्तित्वात असतात हेच बहुसंख्य लोकांना ठाऊक न्हवते. आमच्या केंद्रामध्ये अशी सेवा सुरु झाली. पण तिचे महत्व कळायचे कसे?… चला आपण सुरु करुया एक व्यवसाय प्रबोधन परिषद. विद्यार्थी-पालक-शिक्षकांना माहिती देऊ करीयरच्या वाटांबद्दल.
आर्टस्, सायन्स, कॉमर्स ह्या शाखांमधल्या पर्यायाबद्दल… नाव काय बरं देऊया… वेधअर्थात् ‘Vocation Education : Direction and Harmony‘ इंग्रजी आणि मराठीतले बारसे झाले. शांताराम राऊत सरांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बोधचिन्ह कलाकारांनी वेधचा सुबक ‘लोगो’ तयार केला. १९९१ साली वेधचे पहिले अधिवेशन भरले ठाण्याच्या शिवसमर्थ शाळेच्या शिवदौलत सभागृहामध्ये. त्यावेळी अर्थातच् भर होता विविध व्यवसायांची माहिती देणारी संवादसत्रे करण्यावर. एकाच वेळी वेगवेगळ्या वर्गांमध्ये छोटी सत्रे होत. सुरुवातीचे आणि सांगतेचे सत्र मात्र एकत्र होई. पहिल्या दोन वर्षातच प्रतिक्रिया आल्या की “असे करु नका.” मत बनवायचे तर विविध मते ऐकायला हवीत. एका वेळी समांतर सत्रे असली तर सर्वांनाच सारखी माहिती मिळत नाही. त्यामुळे संवादाचा बाज कायम ठेवून एकत्रच कार्यक्रम होऊ लागला. हा उपक्रम लोकप्रिय करायला मी आणि सहकारी शाळाशाळांमधून फिरायचो. वर्गावर्गातून तीच ती रेकॉर्ड दिवसाला वीस-तीस वेळा वाजवायचो.
होताहोता सहा वर्षानंतर प्रथम ह्या परिषदेला दिड हजार विद्यार्थी पालक जमा झाले. आता उपक्रम बाळसे धरु लागला होता. पुढच्या वर्षापासून आम्ही प्रत्येक वर्षीच्या परिषदेचे सूत्र निश्चित करायला सुरुवात केली. आता खर्या अर्थाने ‘Event Designing’ सुरु झाले. अर्थपूर्ण संवाद हे माध्यम. पाहुण्यांबरोबरच्या विविध सत्रांची मालिका तयार व्हावी आणि त्यातून सूत्राचे अनेक पैलू बाहेर यावेत असा हा प्रयत्न होता…
२०१५ च्या ठाण्याच्या वेध परिषदेचे सूत्र होते ‘बाह्यरंग ते अंतरंग’ अर्थात् Cover to the Core. त्याआधीच्या वर्षीचे सुत्र होते ‘इच्छा तेथे पूर्ती’ अर्थात् ‘Intention to Completion’. आम्ही नेहमी इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये सूत्र देतो… ‘घागर ते सागर’ ह्या सूत्राचे रुपांतर होते ‘From Dream to Team’. सूत्राप्रमाणे पाहुणे… पाहुण्यांप्रमाणे संवादाची आखणी… प्रत्येक सत्राला सुत्रामध्ये गुंफणे असा आशयपट रचायचा. त्याचे दृश्यरुपही प्रभावी हवे. वेध परिषदेचा सेट नेहमी टीव्ही शो सारखा असतो. नेहमीच्या चर्चा-परिसंवादांसारखा नसतो. त्यातले Mikes सुद्धा TV Show सारखे. प्रकाशयोजनाही तशीच. कारण आज अशा प्रतिमेबरोबर मने पटकन जोडली जातात आणि हा इफेक्ट देणे प्रचंड खर्चिक नसते. वेधच्या व्यासपीठावर संगीत असते. खास रचून संगीतबद्ध केलेली गाणी असतात. ती ही असतात त्य-त्या सूत्राच्या भोवताली गुंफलेली. नजरेनेच लोकांना कळले पाहिजे की हा रटाळ भाषण-परिसंवाद-व्याख्यानाचा कार्यक्रम नाही. तरीही वेधचा सेट साधा असतो.
ठाण्याच्या एका वेधचे सूत्र होते ‘Work Life Balance : जगण्याचा ताल आणि तोल.’ रंगमंचाचा अर्धा भाग घराचा सेट होता तर अर्धा भाग होता ऑफीसचा…हळूहळू हजारोच्या संख्येने लोक येऊ लागले तसे प्रचंड मोठे स्क्रीन्स आले. तीन कॅमेरांचा सेट-अप आला. प्रत्येक परिषदेनंतर नेमाने प्रकाशित होणारा DVD चा दृक् श्राव्य पॅक विक्रीला आला. आता ह्या सगळ्या संवादसत्रांची प्रतिष्ठापना यू-ट्यूबवरही होत आहे…. स्क्रीन्स् आल्यामुळे आशयाला आकार देण्यासाठी आता जवळजवळ सत्तर टक्के सत्र आम्ही visually आखतो. फोटोग्राफस्, पीपीटी, फिल्मस् ह्यांचा वापर करतो. फक्त शब्दाने अवधान धरुन ठेवण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. शब्दाला दृश्याची जोड हवीच. वेध परिषदेचा फोकस प्रथम माहिती देण्यावर होता. माहितीचे दरवाजे जसे खुले होत गेले तसा भर दिला जाऊ लागला दृष्टिकोनावर. तो टप्पाही मागे पडला. आता गरज वाटू लागली सशक्त जीवनमूल्ये विद्यार्थी-पालकांपर्यंत पोहोचवण्याची. खर्या अर्थाने मानसिक विकासाची उर्जा जागृत करण्याची… म्हणून प्रत्येक सत्रावर आम्ही मेहनत घेतो. येणारे पाहुणे ज्या क्षेत्रातील असतील त्याचा अभ्यास करतो. त्या पाहुण्यांच्या जीवनप्रवासाबद्दलचे संसर्भ मिळवतो. त्यांना भेटतो. चर्चा करतो. प्रश्न तयार करतो. ते वक्त्यांना पाठवून दृश्य भाग तयार करतो. ठाण्याच्या वेधमध्ये चौदा सत्रे असतात. इतर सात शहरांमधले वेध असतात प्रत्येकी पाच सत्रांचे म्हणजे दर वर्षाला मी आता ४९ मुलाखती घेतो… २०१६ मध्ये दोन शहरे वाढल्याने ही संख्याही दहाने वाढेल. ह्यामध्ये काही वक्ते एका शहरातून दुसरीकडे रिपीट होतात असे धरले तरी सरासरी पस्तीस नव्या व्यक्तींबरोबर मी दरवर्षी संवाद साधतो. म्हणजेच आजवरच्या ६३ वेधमधून मी एकूण पाचशेच्या वर मुलाखतसत्रे घेतली आहेत. सर्व शहरांमधल्या वेधच्या व्यासपीठावर जरी मी सूत्रसंचालन करताना दिसत असलो तरी प्रत्येक शहरामध्ये ही परिषद संपन्न करणारी निःस्वार्थ कार्यकर्त्यांची मोठी फळी सतत कार्यरत असते. त्यामुळेच ठाण्याबरोबर आता नगर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, लातूर, कल्याण, परभणी अशा शहरांमध्ये वेधची चळवळ पसरली आहे. ठाण्याचा वेध असतो तीन दिवस, अठरा तास, चौदा सत्रांचा… उपस्थितीही साडेतीन-चार हजाराच्या घरात. ठाणे शहरात तर आता वेधला ‘ठाण्याचे सवाई गंधर्व’ असे म्हटले आहे. ह्या परिषदेमधून मिळणारी सकारात्मक उर्जा घेऊन हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले भविष्य घडवले आहे. त्यातले अनेक जण आज वेधला स्वकमाईतून देणगी देऊ लागले आहेत. काही जण तर विद्यार्थी म्हणून वेधला आले आणि आता ‘young achievers’ म्हणून वक्ते झाले असेही घडले अहे… वक्ता म्हणूनही जी व्यक्ती वेधशी जोडली जाते ती कायमची ह्यापरिवाराची होऊन जाते. सकारात्मक उर्जा घेऊन हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले भविष्य घडवले आहे. त्यातले अनेक जण आज वेधला स्वकमाईतून देणगी देऊ लागले आहेत. काही जण तर विद्यार्थी म्हणून वेधला आले आणि आता ‘young achievers’ म्हणून वक्ते झाले असेही घडले अहे… वक्ता म्हणूनही जी व्यक्ती वेधशी जोडली जाते ती कायमची ह्यापरिवाराची होऊन जाते.
वैचारीक कार्यक्रमांना लोक येत नाहीत अशी सार्वत्रिक तक्रार ऐकू येत असताना एक नव्हे तर दहा शहरांमध्ये हजारो माणसे ह्या बिना करमणुकीच्या आणि बिनाराजकीय-बिनाअध्यात्मिक कार्यक्रमासाठी जमतात हे दृश्यही आशादायक म्हणायला हवे.
त्या वेळी मी औरंगाबादमध्ये होते. अंजली चित्रपटगृहात एका चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘देवराई’! अभिनेता अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार, तुषार दळवी आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या अभिनयानं नटलेला ‘देवराई’ हा चित्रपट मला खूप आवडला. तोपर्यंत स्किझोफ्रेनिया हा विकार काय असतो ते ठाऊकच नव्हतं. कितीतरी दिवस मन सुन्न झालं होतं. या चित्रपटाचे मार्गदर्शक, सल्लागार डॉ. आनंद नाडकर्णी हे मानसोपचारतज्ज्ञ होते. तिथूनच या माणसाशी माझी ओळख होत गेली. डॉ. आनंद नाडकर्णींची ओळख म्हणजे ते एक प्रथितयश मानासोपचारतज्ज्ञ, विख्यात लेखक, प्रभावी समुपदेशक, संवेदनशील कवी, दृष्टे नाटककार, कुशल संगीतकार आणि गायक, सामाजिक कार्यकर्ता, कुशल व्यवस्थापक, ओजस्वी वक्ता आणि प्रशिक्षक आणि अर्थातच ही यादी अशीच वाढत जाणारी!
त्यानंतर पुढल्या
प्रवासात डॉक्टरांची अनेक पुस्तकं वेळोवेळी भेटत राहिली. त्या पुस्तकांमधून माणूस
म्हणून डॉक्टरही कळत चालले होते. त्यांचं अनेकविध रंगांनी बहरलेलं आयुष्य आणि काम कळत
चाललं होतं. त्यानंतर एकदा मुंबईत असताना आयपीएचचा वर्धापन दिनानिमित्त एक
कार्यक्रम होता. आत्तापर्यंत अनुभवलेले रूक्ष, कोरडे, औपचारिक
गोष्टींनी ठासून भरलेले आणि कंटाळवाणे कार्यक्रम तोपर्यंत मी अनेक बघितले होते. या
कार्यक्रमानं माझ्या त्या पहिल्या अनुभवांना तडा देण्याचं काम केलं होतं.
व्यासपीठावरचा डॉक्टरांचा वावर अत्यंत कमी होता. सुरेखशा साडीतला सुरेखसा आयपीएचचा
स्त्रीवर्ग आयपीएचबद्दल मनापासून बोलत होता, त्यांचे अनुभव सांगत होता. मी या कार्यक्रमात रंगून गेले
आणि तेव्हाच ठरवलं यापुढे आयपीएचचे कुठलेही कार्यक्रम शक्य तो मिस करायचे नाहीत.
त्यानंतर डॉ. अभय बंग यांच्या निर्माण उपक्रमात काम करत असताना पुन्हा एकदा डॉ.
आनंद नाडकर्णी तरुणांशी संवाद साधताना भेटले आणि मग मला ते सतत भेटतच गेले. कोणा
एका क्षणी पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वेध – मस्ती की पाठशाला या
आयपीएचच्याच एका कार्यक्रमात अनिल अवचट आणि अच्युत गोडबोले उदघाटक होते. त्यांना बोलतं करण्यासाठी डॉ. आनंद
नाडकर्णी व्यासपीठावर होते. समोरचा माणूस कितीही दिग्गज असो,
मोठा असो किंवा अगदी सर्वसामान्य, साधा तरूण असो त्यांना बोलतं करावं ते डॉक्टरांनीच असं
मनोमन त्या वेळी वाटून गेलं. कार्यक्रम अतिशय रंगला होता. मी डॉक्टरांची चाहती
झाले होते.
पुढे ‘मनात’ या मानसशास्त्रावरच्या पुस्तकावर काम करत असताना डॉ. अल्बर्ट एलिसचा अभ्यास करता आला आणि त्याची विवेकनिष्ठ वर्तनवादी उपचारपद्धती (आरईबीटी) समजली. डॉक्टरांनी यावर अभ्यासक्रम तयार केला असून त्याचा अनेकांनी लाभ घेतल्याचंही समजलं आणि मीही आरईबीटी करायला हवं असं वाटायला लागलं. मनातल्या तीव्र इच्छेनं मला हा कोर्स पूर्ण करता आला. पुण्याहून प्रत्येक शनिवार-रविवार पहाटे सहाच्या शिवनेरीनं ठाण्यात पोहोचायचं असा मग तो कार्यक्रमच होऊन गेला. तिथे गेल्यावर तर दोन दिवस कसे भुर्रकन उडून जात ते कळतच नसे. महाराष्ट्रातून ठिकठिकाणांहून हा कोर्स करण्यासाठी सर्व वयोगटातले स्त्री-पुरुष येत. सकाळी नऊ वाजता नाश्ता करून हॉलमध्ये स्थानापन्न झालं की त्यानंतरचा सायंकाळी पाच-साडेपाचपर्यंतचा वेळ स्वतःला डॉक्टरांच्या आणि डॉ. शुभा थत्तेंच्या स्वाधीन करायचं असाच तो काळ होता. डॉ. शुभा थत्ते यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रसन्न की त्यांच्याकडे बघून आपल्या आयुष्यातून नैराश्यानं आपोआप काढता पाय घ्यावा असं! त्या सकाळी हॉलमध्ये येत, तेव्हा त्या आपल्या त्या दिवशीच्या ड्रेसवर मॅचिंग कानातले घालत. फार किमती, मौल्यवान नसलेले ते कानातले, इतके सुरेख असत की त्यांच्यातली सौंदर्यदृष्टी बघून ‘वा, क्या बात है’ अशीच प्रतिक्रिया मनात उमटत असे. शुभा थत्ते यांनी मला ‘वय कुठलंही असो, नीटनेटकं कसं राहावं, साध्या राहण्यातही कसं सौंदर्य असू शकतं, आपल्या चेहर्यावरचं हास्य आजूबाजूचं वातावरण कसं प्रफुल्लित करतं’ हे शिकवलं.
डावीकडून : डॉ. शुभा थत्ते आणि दीपा देशमुख
तासा-दीडतासानंतर
कुठल्याही व्यक्तीचं बोलणं ऐकायचं म्हणजे जांभया यायला लागतात,
एका जागी बसून राहणं कंटाळवाणं वाटायला लागतं. पण इथं
आरईबीटीच्या सत्रात मात्र जादूची कांडी या दोघांनी बहुदा फिरवली असावी. एकामागून
एक सत्रं पुढे सरकत राहायची आणि मन त्यात गुंतून पडायचं. मेंदूमधली किचकट रचना असो,
वा मानवी शरीरातल्या बाकी गोष्टी यातलं विज्ञान सहजपणे
शिकवत डॉक्टर समोरच्याला आपल्या बरोबर सैर करायला घेऊन जायचे. त्यांच्या
बोलण्यातून तो विषय तर समजायचाच, पण
त्याचबरोबर तो किती रोचक आहे याचं भान डॉक्टरांनीच पहिल्यांदा करून दिलं. गाणी,
गप्पा, गोष्टी,
चर्चा अशा सगळ्यांमधून दिवस कसा संपायचा आणि आपण हसत खेळत
कसं शिकलो हे आठवून मन अचंबित व्हायचं. त्यामुळे कितीही अडचणी आल्या,
मुसळधार पाऊस आला तरी ओढ लागल्याप्रमाणे एकही सत्र न बुडवता
हा कोर्स पूर्ण करता आला.
आरईबीटी या
कोर्समुळे मनातलं द्वंद्व संपलं. कोर्स करण्याआधीची मी आणि नंतरची मी यातला बदल
मलाच जाणवत होता. आधी अनेक प्रसंगांनी, आजूबाजूच्या
परिस्थितीनं, आसपासच्या
माणसांच्या वागण्यानं मी व्यथीत होत असायची. माझ्या छातीतली धडधड विनाकारण वाढायची,
माझं डोकं प्रचंड दुखायचं. मात्र यावरचे उपाय माझ्या हातात
नव्हते आणि औषध-गोळ्यांनी तात्पुरतं बरं वाटायचं. माझ्याबाबतीतच नव्हे,
तर निर्माणमुळे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई
यांच्यामुळे महाराष्ट्रातले अनेक युवा माझ्या संपर्कात आले होते, त्यांच्याशी एक नातं जुळलं होतं. ही सगळी मंडळी त्यांच्या
जगण्यात वाट्याला आलेले प्रेमप्रसंग, प्रेमभंग,
वैयक्तिक कटकटी मला सांगत. काही वेळा त्यांना सल्ला हवा
असायचा. काहीजण नैराश्याकडे वाटचाल करत असायची. अशा वेळी मला प्रश्न पडायचा,
की मी त्यांना साथ देतेय, माझा खांदा त्यांच्या सुखदुःखात डोकं ठेवायला देतेय,
पण हे किती प्रमाणात करायला हवंय. मी कुठे चुकत तर नाही ना?
या प्रश्नांची उत्तरं देखील मला आरईबीटी करताना सहजपणे
मिळाली. माझ्यासाठी आणि इतरांसाठी मी कसा विचार करायला हवा,
कुठपर्यंत जायला हवं हे डॉक्टरांनी मी न विचारताही मला
सांगितलं. माझी सुखदुःखं माझ्या हातात आहे, माझं आनंदी राहणं माझ्या हातात आहे या एका विचारानं मी खूप
निश्चिंत झाले. शांत झाले. माझ्या सहवासातल्या, मी ओळखत असलेल्या, ओळखत
नसलेल्या अनेकांमधले मी गुणच लक्षात घ्यावेत आणि अवगुण/दोष कटाक्षानं दूर करावेत
हेही मी शिकले. प्रत्येकातले गुण लक्षात ठेऊन त्यांच्यातल्या दोषांना मी मोठं करायचं नाही या
विचारांमुळे ही सगळी
मंडळी माझ्याजवळ कायमची
जवळ राहिली.
या वेळी मी
डॉक्टरांना खूप जवळून बघत होते. दिवसभराचा तो सहवास त्यांचं निरीक्षण करण्यातही
नकळत जात होता. सतत उत्साही, प्रसन्न,
हसतमुख असलेला माणूस! त्या वेळी पायावर शस्त्रक्रिया झालेली
नसल्यानं डॉक्टरांचं वाढलेलं वजन आणि सुजलेला पाय या दोन्ही गोष्टींनी त्यांच्यावर
अनेक मर्यादा येत. पण त्या मर्यादांचा बाऊ न करता डॉक्टर दिवसभर कसे उत्साही राहू
शकतात याचं मला आश्चर्य वाटायचं. ते आमचेच होऊन जात. बरं विद्वत्तेचा कुठेही आव
चेहर्यावर नसायचा आणि आपण फार मोठं शिकवून उपकार करतोय असंही काही जाणवायचं नाही.
आमच्यातलेच एक होऊन हसतखेळत ते आम्हाला शिकवायचे. दिवसभराची वेळ संपली की मात्र
एकही मिनिट न रेंगाळता ते तिथून कधी निघून जायचे कोणालाही कळायचं नाही.
या काळातच मी ‘तुमचे
आमचे सुपरहिरो’ या मालिकेत त्यांच्यावर पुस्तक लिहायला घेतलं होतं. आमच्या कोर्सचं
वेळापत्रक संपलं की संध्याकाळी ते मला गाडीत बसण्यापूर्वी फोन करत आणि ‘दीपा,
चल आपण निघूया’ असं विचारत. मी धावतच माझ्या वर्गमित्र-मैत्रिणींच्या
गराड्यातून निघून त्यांच्याबरोबर पुढला प्रवास करण्यासाठी सज्ज होत असे.
मुखपृष्ठ: ‘तुमचे आमचे सुपरहिरो’
आम्ही त्यांच्या घरी
जात असू. पाचच मिनिटांत डॉक्टर फ्रेश होऊन माझ्यासमोर येऊन बसत. मग मी विचारलेल्या
अनेक गोष्टींवर ते बोलत राहत. आम्ही रात्रीच्या अकरा-साडेअकरा वाजेपर्यंत बोलत
राहायचो. मध्ये डॉ. सविता आपटे (डॉक्टरांच्या सुविद्य पत्नी) यांच्या आग्रहामुळे बोलणं जरा वेळ आटोपतं घेऊन आम्ही जेवण करायचो आणि पुन्हा बोलणं सुरू. डॉ. आनंद
नाडकर्णी यांच्यावर पुस्तक लिहिताना त्यांची सगळीच पुस्तकं पुन्हा नव्यानं वाचून
झाली. या माणसामधली विद्वत्ता जेवढी भावली, त्यापेक्षाही त्याच्यामधला माणूस मला अधिक भावला. ‘बोले तैसा चाले’ या पंक्तीचा
प्रत्यय मला या माणसाला भेटून आला. यथावकाश मी त्यांच्यावर
लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं,
त्याच्या अनेक आवृत्याही निघाल्या. हे पुस्तक अगदी
खेड्याखेड्यापर्यंत जाऊन पोहोचलं. त्याचबरोबर माझा आरईबीटी कोर्सही पूर्ण झाला.
यानंतर मात्र मी आयपीएचशी – विशेषतः ‘वेध’ परिवाराशी जोडली गेले ती कायमची! वेधचे दोन दिवस म्हणजे भरभरून घेणं, मनात ते रुजवणं आणि समृद्ध होणं असा माझा प्रवास सुरू झाला. पुणे वेधचे संचालक दीपक पळशीकर यांची भेट झाली. दीपक पळशीकरांबरोबरच पुण्यातली वेधची डॉ. ज्योती शिरोडकरसह अख्खी टीम, इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर शहरांत संपन्न होणार्या वेधच्या नियोजन करणार्या सर्वच व्यक्तींबरोबर एक नातं निर्माण झालं. दीपक पळशीकर पती-पत्नी तर पहिल्याच भेटीत ते समोरच्याला आपलंसं करतात. त्यांच्यातली सहजता, स्नेह तुम्हाला बांधून ठेवतो. दीपक पळशीकर यांचे पुण्यात दातार क्लासेस आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेगळी तळमळ असणारं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारं पळशीकर दांपत्य मला जवळून बघायला मिळालं. मी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनाही या दरम्यान भेटले आणि शिक्षकवर्गालाही! तसंच या निमित्तानं नाशिकच्या लढाऊ वृत्तीच्या वेध संयोजक वंदना अत्रे असोत, कल्याणचे देवेंद्र असोत, वा परभणीचं नायक कुटुंब, पेणचे सदानंद धारप असोत, की लातूरचा धनंजय कुलकर्णी या सगळ्यांशीच माझं नातं जुळलं. प्रत्येक वर्षीच्या वेधसाठी माझं मन धाव घेऊ लागलं.
वेध उपक्रम काय आहे,
याविषयी मी जास्त बोलणार नाही. पण वेध उपक्रमाची सुरुवात
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकारातून झाली. प्रत्येक शहरात (१० शहरांमध्ये!) वेध
उपक्रम ‘विद्यार्थ्यांसाठी
करियर मार्गदर्शन करायचं, तिथंपासून
जीवनकी पाठशाला’ असा वेधचा प्रवास होत गेला. पूर्वी या उपक्रमात फक्त विद्यार्थी सहभागी असायचे, आता विद्यार्थी, पालक,
शिक्षक आणि कुठल्याही वयोगटाचा व्यक्ती यात सामील होऊ लागल्या. वेध उपक्रमाला
सगळीकडेच उदंड प्रतिसाद मिळताना मी बघत होते. वेध सुरू करताना डॉक्टरांच्या नजरेनं
प्रत्येक शहरासाठी सुयोग्य माणसांची निवड केली. वेधचं एक विस्तारित कुटुंब यातून
आकार घेत राहिलं.
वेध अनुभवताना
डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि त्यांची टीम यांच्यातली अफाट ऊर्जा अनुभवायला मिळते. ही
सगळीच माणसं कधी थकलेली, चिडलेली,
कावलेली, वैतागलेली
बघायला मिळत नाहीत. प्रत्येक वेधची एक थीम असते आणि त्या थीमवर आधारित एक गाणं
त्या त्या वेधसाठी, त्या त्या शहरात
रचलं जातं, संगीतबद्ध केलं जातं
आणि समुहाद्वारे गायलंही जातं. या गीताची रचना, संगीत डॉक्टर आनंद नाडकर्णी स्वतः करतात. त्यासाठी ते कुठून
वेळ काढतात कोण जाणे!
कसे होतसे वादळ शहाणे,
चला घेऊ या त्याचा शोध,
भान दिशेचे जाण स्वतःची लपला यातच सुंदर बोध
वेधमध्ये डॉक्टरांचं
एक नवं रूप बघायला मिळालं. शेकडो/हजारो मुलांना, युवांना,
पालकांना, प्रौढांना,
कार्यकर्त्यांना, रुग्णांना
दिलासा देणारा, त्यांच्या समस्यांवर
हळुवार फुंकर घालणारा, त्यांचा दिशादर्शक
होणारा, त्यांना जगण्याची
मूल्यं आणि खर्या यशाची व्याख्या सांगणारा माणूस म्हणजे एकच नाव – डॉ. आनंद
नाडकर्णी!
या वेध उपक्रमात
पहिल्या दिवशी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते वेधचं उदघाटन
होतं आणि डॉक्टरांनी घेतलेली त्यांची मुलाखत रंगते. दुसर्या दिवशी
दिवसभर अनेक भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असते! दुसर्या दिवशी देशभरातून वेगळ्या वाटेनं प्रवास करणार्या
व्यक्ती वेधसाठी निमंत्रित केल्या जातात. त्यांना डॉक्टर बोलतं करतात आणि
सभागृहातला श्रोता त्या अनुभवांनी नुसता स्तिमित होत नाही तर त्याच्या मरगळ आलेल्या
जगण्यात ही आलेली
मंडळी ताजेतवानेपण भरून जातात. स्वच्या पलीकडलं जग काय असतं,
एक वेड संपूर्ण आयुष्य कसं झपाटून टाकू शकतं, या वेडातून हाती काय गवसतं हे सगळं वेध तुम्हाला दाखवतं हे
मात्र खरं!
डावीकडून : अभिनेता जितेंद्र जोशी आणि डॉ .आनंद नाडकर्णी
वेधमध्ये मला अनेकजण
भेटले. त्यात जंगलं निर्माण करणारा जादाव पायेंग हा अवलिया भेटला. इतक्या निर्मळ
मनाचा हा माणूस, की आजच्या घडीला अशी
माणसं असतात यावर विश्वासच बसू नये! एक माणूस काय जादू करू शकतो,
पर्यावरणाचं रक्षण कसं करू शकतो आणि एक अख्खं जंगल कसं
उभारू शकतो हे या माणसाच्या प्रवासातून समजलं. वाट सोपी नसली तरी ती अशक्यही नाही
हे या माणसानं दाखवलं. याच ठिकाणी मला अभिनेता जितेंद्र जोशी
वेगळ्या रुपात भेटला. अभिनेत्यापलीकडे असलेला जितेंद्र
जोशी मी वेधच्या व्यासपीठावर अनुभवला. त्याच्यातला संवेदनशील कवी,
त्याची समाजाप्रती असलेली बांधिलकी मी अनुभवत होते. त्याचा संघर्षमय
प्रवास जाणून घेताना आदरानं मन भरून गेलं. सुचेता कडेठाणकरसारखी गोबीचं वाळवंट
चालत केवळ ५५ दिवसांत पार करून विक्रम नोंदवणारी मुलगी मी जवळून बघितली. असे
जागतिक विक्रम करूनही वागण्यात कुठेही अहंकार नाही, तितकाच साधेपणा आणि इतकंच नाही तर वेधशी कायमचं नातं जोडून
एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखी त्यात विरघळून जाणारी सुचेता खूप भावली.
जिंकायची भावना क्षणभंगूर असते, स्पर्धा,
जिंकणं हे निरर्थक आहे असं सहजपणे सांगणारी सुचेता अतिशय
संयमी आणि हसतमुखपणे आपल्याला सामोरी येते.
उजवीकडून: सुचेता कडेठाणकर आणि मुलाखतकार डॉ .आनंद नाडकर्णी
वेधच्या उपक्रमात
मला भेटला सुनिल खांडबहाले हा तरूण! प्रतिकूल परिस्थितीतून त्यानं तंत्रज्ञान कसं
आत्मसात केलं आणि जगाच्या इतिहासात आपली ओळख कशी निर्माण केली हे या निमित्तानं
मला बघता आलं. डॉक्टर आणि आयआयटीतून इंजिनिअर झालेला अभिषेक सेन हा उद्योजक तरूणही
याच वेळी भेटला. तंत्रज्ञानाचा आरोग्याशी संबंध कसा जोडता येईल आणि आरोग्य सुविधा
ग्रामीण पातळीपर्यंत कशा नेता येतील या ध्येयानं
झपाटलेला आणि त्यासाठी आरोग्याशी संबंधित उपकरणं बनवणं, ते किफायतशीर दरात गावापर्यंत पोहोचवणं ही त्यांची कामं
बघून त्याच्याविषयी अभिमान वाटला. काश्मीरची भीती न बाळगता,
तिथे जाऊन धडकणारा आणि तिथल्या लोकांशी नातं जोडणारा,
त्यांना शिकवणारा, त्यांना
रोजगार उपलब्ध करून देणारा, त्यांना
भारताचं खरं दर्शन करून देणारा सारंग गोसावी देखील मला इथे भेटला. एक वेगळा
काश्मीर सारंगनं माझ्या डोळ्यांसमोर उभा केला. पुण्याचा अधिक कदम हा बॉर्डरलेस
फाऊंडेशनच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरच्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करताना बघून
अचंबित व्हायला झालं.
सारंग गोसावी
इथेच सीए झालेला
अभिजीत थोरातही भेटला. अभिजीत आणि सारंग यांना मी आधीपासून ओळखत असले तरी
अभिजीतमधल्या रत्नाला पैलू पाडत त्याला खुलवणारे डॉक्टर इथे असल्यानं त्याच्यातले
अनेक सुप्त पैलू मला वेधच्या व्यासपीठामुळेच उलगडले. सीए म्हणजे काय हे ठाऊक
नसलेला एका खेड्यातला मुलगा आयुष्यातली वेडीवाकडी वळणं पार करत पुण्यातला एक नामांकित सीए
कसा बनतो आणि आपला खडतर प्रवास न विसरता आपल्यासारख्यांच्या मदतीसाठी कसा उभा
राहतो हे मला त्याच्या ‘नादान परिंदे फाऊंडेशन’च्या माध्यमातून दिसलं आणि इतक्या लहान वयात त्याच्यात
आलेल्या त्या भानापुढे मीही नतमस्तक झाले.
उजवीकडून: अभिजीत थोरात, डॉ .आनंद नाडकर्णी आणि दीपा देशमुख
‘हमारी मुठ्ठी मे आकाश सारा’ म्हणणारी शारदा बापट ही डॉक्टर तरुणीही मला वेधच्या
निमित्तानं भेटली. एका आयुष्यात एक स्त्री काय काय करू शकते ते ती हसतमुखानं सांगत
होती. कुठल्याही अडचणींचा बाऊ ती करत नव्हती. आधी ही तरूणी कला शाखेतली पदवी
मिळवते काय, त्यानंतर कायद्याचं
शिक्षण घेते काय, त्यानंतर विज्ञानाची पार्श्वभूमी नसताना अचानक डॉक्टर
बनते काय, संगणकातली तज्ज्ञता
मिळवते काय, पायलट होते काय आणि
शाश्वत शेतीचे प्रयोग करते काय आणि त्याच वेळी पियानोवादनही करते काय,
सगळंच विलक्षण! इथे हत्तीशी संवाद साधणारा आनंद शिंदे हा
तरूण भेटला. हत्तीमधली संवेदनशीलता, त्याचं
मृदू कोमल मन आनंदमुळे कळलं. आनंदला राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक मानाचे पुरस्कार
मिळाले असले तरी त्याला मात्र हत्तीचा मित्र म्हणवून घेण्यातच धन्यता वाटते हे
विशेष! आनंद शिंदेनंतर भेटला इथं तो तुषार कुलकर्णी! हा जिराफांचा मित्र!
जिराफांवर अभ्यास करणारा, त्यांचं
संवर्धन करण्यासाठी झटणारा, त्यांच्यातल्या
गुणांना ओळखणारा, त्यांचं बारकोडिंग
करणारा तुषार म्हणजे एक अजबच रसायन आहे.
‘बुकलेट गाय’ या नावानं ओळखला जाणारा सीए झालेला अमृत देशमुख नावाचा एक
तरूण एके दिवशी आपली मोठ्या कंपनीतली सहा आकडी पगाराची नोकरी सोडतो आणि
पुस्तकांच्या जगात प्रवेश करतो. पुस्तकांचं वेड त्याला गप्प बसू देत नाही आणि तो
जगालाही हे वेड लावण्याच्या मागे लागतो त्याची गोष्टही वेधच्या व्यासपीठानंच मला
ऐकवली. अमृत प्रमाणेच खेड्यापाड्यांमधल्या मुलांमध्ये ‘ग्यान की लायब्ररी’ असा उपक्रम सुरू करून वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी
प्रयत्नशील असलेला आणि त्याबरोबरच अनेक प्रकल्प राबवणारा प्रदीप लोखंडे हाही तरूण
वेधच्या व्यासपीठावरून संवाद करता झाला. आज त्याला ‘पोस्टकार्ड मॅन ऑफ इंडिया’ म्हणतात. पोस्टकार्डचा कल्पकतेनं उपयोग करणारा एक आगळा
माणूस म्हणून प्रदीपकडे बघावं लागेल.
बीई मेकॅनिकल विषय घेऊन इंजिनियर झालेला अमित गोडसे याच्या आयुष्यात अचानक एके दिवशी मधमाशा आल्या आणि त्यांना संपवण्याच्या मागे लागलेला समाजही त्याला दिसला. मधमाशांचं संवर्धन करणं हेच त्याच्या जगण्याचं ध्येय कसं बनलं याची कहाणी अमितनं वेधच्या व्यासपीठावरूनच मला ऐकवली. विज्ञान प्रत्येकाच्या जगण्याचा भाग बनवण्याच्या ध्यासानं झपाटलेला संजय पुजारी आणि कल्याणेहोळ या गावाला विज्ञान गाव बनवणारा खानदेशातला जयदीप पाटील हे दोघंही मला इथं भेटले. आपलं जगणं अर्थपूर्ण करत असतानाच इतरांच्याही आयुष्यातला अंधार दूर करत त्यांना डोळस बनवण्याचं काम हाती घेतलेले हे अनोखे तरूण. विज्ञान किती सोपं असतं आणि ते आपल्या जगण्याचा भागही कसं असतं हे सांगणारे हे दोन तरूण आहेत. संजय पुजारीला तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलामांकडून राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं गेलं, तर जयदीपला विज्ञान सेवक या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मात्र या पुरस्कारांनी दोघांच्या वागण्यात जगण्यात कुठलाही बदल झाला नाही. ते आपलं विज्ञान प्रसाराचं काम अव्याहतपणे करतच आहेत.
आजच्या चंगळवादी
झालेल्या जगात, भौतिक गोष्टींच्या
आहारी जाणार्या जगात नेहा सेठ नावाची एक हरियाणा राज्यातली इंजिनिअर झालेली तरूणी
एके दिवशी कबीराची वाणी ऐकते आणि कबीराचं ‘ मन लागो यार फकिरी मे’ हे भजन तिच्या आयुष्याचा भाग कसं बनतं
हे बघून मी तर स्तिमित झाले. कबीरमय होण्यासाठी तिचा संघर्ष बघून थक्क झाले. ‘अपनी धुन मे मगन रहो
तो, सुखदुखसे क्या लेना
देना’ ही डॉक्टरांनी
लिहिलेली गीतरचना नेहाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडणारी वाटते. लीलावतीज डॉटर
म्हणून ओळखली जाणारी शास्त्रज्ञ असलेली प्रियदर्शिनी कर्वे ही एक यशस्वी उद्योजिका आहे,
जैवतंत्रज्ञानापासून इंधननिर्मिती करणारी,
धूरविरहित चुलीची निर्मिती करणारी ती एक संशोधक आहे. तिचा
प्रवास देखील चकित करणारा असा आहे.
वयाच्या २५ व्या
वर्षी मराठवाड्यातल्या बीडजवळच्या गेवराई गावातला संतोष गर्जे यानं उजाड माळरानावर
सहारा अनाथालय उभारून शेकडो मुलांना पालकत्व दिलं. त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध
करून दिली. त्यांचं जगणं अर्थपूर्ण बनवलं. हा संतोषही एका वेगळ्या वाटेनं चालणारा
प्रवासी होता आणि आहे.
वेधच्या
व्यासपीठावरून अनेक असाधारण माणसांशी ओळख झाली. त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे टेंपल
मॅन ऑफ इंडिया या नावानं ओळखली जाणारी के. के. महंमद! हिंदूस्थानवर १७ वेळा स्वारी
करणारा गझनीचा महंमद एकीकडे, तर
त्याच वेळी भारतातल्या २०० हिंदू देवालयांचं पुनरुज्जीवन करणारा हा केरळमधला के.
के. महंमद दुसरीकडे! डाकूंनी वेढलेल्या चंबळच्या खोर्यात अतिशय निर्भिडपणे काम
करणारा हा माणूस, एकीकडे संस्कृतचा
अभ्यासक आहे, तर त्याच वेळी तो
जातीधर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य शोधणारा आहे हे बघून
शंभरवेळा त्यांच्यासाठी मनात कृतज्ञतेची भावना भरून आली. एका सत्रात मला एपिलेप्सी
सपोर्ट ग्रुपची यशोदा वाकणकर, स्किझोफ्रेनिया
सपोर्ट ग्रुपसाठी काम करणारी अस्मिता मोकाशी आणि डायबेटिस सपोर्ट ग्रुपची
समुदपदेशक विद्या गोखले या तरूणी भेटल्या. आपल्या विकारांशी झुंजत त्यांनी
आपल्यासारख्या इतरांना आधार देण्याचं मोठं काम हाती घेतलं आहे.
काम करत असताना
शारीरिक अपंगत्व आलेलं असतानाही ताठ मानेनं जिद्दीनं उभे राहणारे उत्तर
प्रदेशातल्या मेरठचे कर्नल दत्ता मला वेधच्याच व्यासपीठावर भेटले. ब्लड रनर या
नावानं ते ओळखले जातात. ‘दुःखानं आक्रमण केलं तरी मी त्याला सहजपणे परत जायला लावेन’ असं सांगणारे कर्नल
दत्ता आपल्याला ‘रूक जाना नही,
तू कही हारके’ या त्यांच्या आवडत्या गाण्याची आठवण करून देत होते.
चांगला धट्टाकट्टा
असलेला एक तरुण, त्याच्या आयुष्यात एके दिवशी अंध
व्यक्तींचा प्रवेश होतो आणि त्याचं जगणंच कसं बदलून जातं हे ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’चा किताब मिळालेल्या स्वागत थोरातनं मला दाखवलं. शेकडो,
हजारो अंधाचे डोळे बनून त्यांना जग किती सुंदर आहे हे
दाखवणारा स्वागत कसं जगावं याचा जणू पाठच देतो.
डावीकडून : ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ स्वागत थोरात, मुलाखतकार डॉ .आनंद नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकर
कोणीतरी कोणासाठी आयुष्य वेचावे
जीवनाच्या वाटेवरी सुख पेरीत जावे
स्वागतच्याच या कवितेच्या
ओळी मला अंतर्मुख करून गेल्या. माझीही दृष्टी आणखीनच विकसित करून गेल्या.
वेधच्याच
व्यासपीठावर भुपेंद्र त्रिपाठी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला,
पण पॅरेलेसिस, कॅन्सर
आणि अंधत्व यांनी आक्रमण केलेला तरूण भेटला. या सगळ्या शत्रूंना पिटाळून लावत,
त्यांच्याशी दोन हात करत आज तो अहमदाबाद इथे रिझर्व
बँकेच्या मॅनेजरपदी विराजमान असलेला पाहून डोळे भरून आले. चिकाटी काय असते,
झगडणं काय असतं हे भुपेंद्रची वाटचाल सांगत होती. आज इतक्या
अडथळयांची शर्यत पार करत चालणारा भुपेंद्र आयुष्याकडे बघताना फुलं आणि काटे दोहोंनाही स्वीकारतो आणि त्या
निर्मिकापुढे नतमस्तक होतो हे बघून मीही त्याच्यापुढे मनोमन झुकले.
वेधमध्ये हे आणि असे
अनेक अनवट वाटेवरचे वाटसरू भेटले. त्यांच्या जगण्यातून वेळोवेळी अफाट ऊर्जा मिळत
राहते. कायम सकारात्मक राहा हा संदेश नकळत मनात रुजला जातो. संघर्षाला,
प्रतिकूल परिस्थितीला, समस्यांना घाबरू नका, तर त्यांचा सामना करा हेही वेधनं मनावर बिंबवलं. इतकंच नाही
तर वेधनं एक वैश्विक कुटुंबही दिलं. जाती-धर्माच्या भिंती पार करून मानवता धर्माची
रुजवणूक करणारी माणसं दिली. जगण्याच्या ठरावीक चौकटी मोडून एक मोकळं आकाश निर्माण
करून दिलं. त्यामुळे वेधशी हितगुज करताना, मनाचा वेध घेता आला आणि ‘वेध माझा, मी
वेधची’ असं जाणवलं! थँक्यू वेध!
जवळ-जवळ अडीच दशक वृत्तपत्रातील नोकरीचे रोमांचकारी, व्यस्त आयुष्य जगता-जगता अचानक त्याला ब्रेक लागला. अवचित समोर आलेल्या आजाराच्या आव्हानामुळे नोकरीचा निरोप घेण्याची वेळ आली तेंव्हा एकच प्रश्न कुरतडत होता. नोकरीमधील माझे काम आजवर मला समाजाशी जोडून राहण्याची संधी देत होते, त्याचे काय? भोवतालचा समाज, आणि त्यातील बहुरंगी माणसे व त्यांच्या जगण्याच्या तऱ्हा मला कायम चकित करीत असतात. जगण्याच्या प्रवाहात अधिक खोल उतरत त्यामागची कारणे जाणून घेण्यास आणि त्यातून लिहिण्यास प्रवृत्त करीत असतात. मी पत्रकारितेच्या व्यवसायाकडे वळण्याचे ते एक प्रमुख कारण होते. आता तो माझ्या आनंदाचा धागाच हातातून निसटून जातोय असे काहीसे दिसू लागले तेंव्हा आलेली अस्वस्थता हाताळणे सोपे नव्हते. जरा स्वस्थ झाले तेंव्हा जाणवले, माझ्याच नकळत एक दुसरी खिडकी हलकेच उघडत होती. ‘वेध’ नावाची. आणि त्याचे निमित्त होते ठाणे वेध मध्ये झालेली एक मुलाखत. २००८ साली ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्यामध्ये ज्या दोन स्त्रियांनी (त्यातील एक सूनु मार्टिस) आपले पती गमावले त्या दोघींची मुलाखत. ज्या जीवघेण्या जखमेची वेदना अजून ओली होती, ती सोसणे अतिशय अवघड होते अशा एका वेदनेचा पदर दोन-तीन हजार श्रोत्यांपुढे उलगडणे सोपे नव्हते. दुःखाचा आवेग आवरणे त्या स्त्रियांसाठी जेवढे अवघड होते तेवढेच ते श्रोत्यांसाठी सुद्धा जणू आव्हान होते. नाडकर्णी सर ज्या तऱ्हेने ती मुलाखत त्या दोघींच्या वैयक्तिक दुःखाकडून त्यांना अनुभवाला येत असलेल्या व्यापक विधायकतेकडे वळवत होते तो अनुभव निव्वळ अचंबित करणारा होता. हेलावून टाकणारा होता. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर देणारा होता. माणसांशी, समाजाशी जोडून घेण्याचे एक निमित्त देत होता. त्या वेध मध्ये ज्यांना ऐकायला मिळाले ती सगळीच माणसे काही प्रसिद्धीच्या वलयात वावरणारी वगैरे नव्हती. काही अगदी साधीशी पण कमालीची आंतरिक ताकद असणारी. काही झपाटून काम करणारी पण प्रसिद्धीचा एखादा कवडसा अंगावर येताच संकोचून जाणारी. आपल्या कामाचे कोणतेच श्रेय न मागणारी. त्या एका अनुभवानंतर ‘वेध’ नावाची गोष्ट आयुष्यात महत्वाची होऊ लागली. जाणवले, माणसांना भेटण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि ही माणसे पुन्हा वेगळ्या रुपात समाजापुढे नेण्याची हि संधी आहे . समाजाशी जोडून घेण्याचे एक वेगळे निमित्त मग मिळाले..
आणि हेही जाणवू लागले, ‘वेध’ चा हा एकदा डोळ्यावर चढलेला चष्मा आता उतरणे मुश्कील. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती पूर्वी लेखनाचा विषय म्हणून डोक्यात रेंगाळत असे आता त्याच्या बरोबरीने मनात येऊ लागले ते ‘वेध’चे विचार. कोणत्या सूत्रात गुंफता येईल या व्यक्तीच्या कामातील वेगळेपण? त्यातील निर्धार आणि समर्पण आणि असे बरेच काही त्याच तीव्रतेने जाईल ना लोकांपर्यंत? असे प्रश्न घेत वेगवेगळी माणसे आणि त्यांचा ध्यास याचा शोध ‘वेध’च्या निमित्ताने घेत राहणे हे ‘वेध’ संयोजनातील माझे अतिशय आवडते काम. शोधासाठी लागणारे धागे कुठून तरी हाताशी येत असतात. वृत्तपत्रातील एखादी बातमी, अवचित हाती लागलेली यु ट्यूबची लिंक, एखादे पुस्तक किंवा मित्र मंडळीशी झालेल्या गप्पा. या शोधात कोणताही विषय वर्ज्य नाही. कचरा? चालेल, पाणी? नक्कीच हवे, शेती? ती तर महत्वाचीच आणि अवकाश विज्ञान सुद्धा हवेच. त्यामुळे शोधाला दहा दिशा मोकळ्या. हा शोध कधी कधी इतका अनिवार असतो की त्यात वास्तवाचे भान हरपण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘वेध’साठी आपल्या गावात पाहुण्याला बोलवायचे पण तो अगदी सात समुद्र पार असला तरी? बोलावूया की, काय बिघडले… असे वाटण्याचे क्षण खूप असतात. हळूहळू त्यातील आव्हाने दिसू लागतात आणि मग पाय कधीतरी दाणकन जमिनीवर आदळतात..! पण अशा वेळा दुर्मिळ. एरवी आटापिटा करून त्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचे वेड स्वस्थ बसू देत नाही. दोन वर्षापूर्वीच्या नाशिक ‘वेध’मध्ये अंकित कावात्रा नावाच्या युवकाला निमंत्रित करण्याची इच्छा होती. यु ट्यूबवरील एका लिंकमधून भेट झाली होती त्याची. आपल्या महानगरांमधून लग्न समारंभ आणि अशा निमित्ताने होणाऱ्या जेवणावळी/पार्ट्या यामधून वाया जाणारे अन्न आणि दोन वेळेला पुरेसे अन्न न मिळाल्याने उपाशी, कुपोषित राहणारी अनेक लहान मुले यांच्या दरम्यान पूल होऊन काम करणारी त्याची संस्था. त्याच्याविषयी वाचले आणि वाटले बोलवायलाच हवे अंकितला…! मग त्याच्या संस्थेला फोन, मेल, फेसबुक वर पोस्ट… सगळे झाले, आमंत्रण पोचले. येण्याचे आश्वासन मिळाले पण त्यात भरवसा नव्हता. खूप खटपटीनंतर शेवटी खुद्द अंकित जेंव्हा फोनवर भेटला तेंव्हा त्याचे पहिले वाक्य होते, “वंदनाजी, मेरे ऑफिसमे सबके काम के बारेमे important notes लिखनेके लिये एक बोर्ड लगाया है, उसपर सबसे उपर मेरे लिये एक नोट लिखी है. वो है, अंकित, Please do accept Nashik invitation and meet Vandanaji. so I am coming..”. आनंदाने हर्षभरित होण्याचा क्षण होता तो आमच्या टीमसाठी… असे अनेक क्षण आणि अनुभव ही वेध ची देणगी…! अर्थात सगळेच अनुभव असे नसतातच, कसे असतील? पण गेल्या दहा वर्षात काम करतांना एक गोष्ट शिकायला मिळाली आहे, एखाद्या व्यक्तीकडून ‘वेध’च्या आमंत्रणाचा स्वीकार किंवा नकार किंवा त्याबद्दलची स्तब्ध मुग्धता हे सगळे आपल्याला खूप काही शिकवत असते. अधिक प्रयत्न करण्यासाठी बळ देते… नवा वेध, नवा शोध हा मंत्र घेऊन… अशा अनुभवाविषयी पुढे केव्हातरी आणखी…
वंदना अत्रे,
नाशिक वेध.
नाशिक वेध २०१९, २९ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे… जरूर या!...
सुहृद: एक कलांगण बदलापूरमध्ये राहणाऱ्या उत्साही, कलासक्त
आणि आपल्या routine च्या बाहेर वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्या मैत्रिणींचा गट.
आपापले नोकरी, व्यवसाय, संसार ह्यात स्थिर होण्याच्या टप्प्यावर ह्या मैत्रिणी
एकत्र आल्या ते निमित्त होतं, ‘ऋतुगंधा’ ह्या रंगमंचीय कार्यक्रमाचं. ऋतुगंधाचे
विविध ठिकाणी प्रयोग सादर करत असतानाच मनात आलं, घडत्या वयातल्या मुलामुलींसाठी
काही उपक्रम करता येतील का, जे बदलापूरसारख्या छोट्या शहरात मुलांना मिळत नाहीत. digital युगात जन्मलेल्या पिढीला
भावनिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून अनेक
नाविन्यपूर्ण कल्पनांची बीजं रोवली गेली. आणि
जन्माला आल्या छंद आनंद ही कार्यशाळा, ऐकू आनंदे ही व्याख्यानमाला, अंतरंग
हा स्वविकासाचा उपक्रम, बालवाचक कट्टा असे कितीतरी…
ह्या आणि अशा अनेक कल्पनांचं बीजारोपण होत असताना ‘वेध’ हा आमच्या उद्दिष्टांना सर्वार्थाने पूरक असणारा किंबहुना एक वेगळी उंची देणारा आणि पालक, मुलं आणि एकंदरीत समाजाला विचारांनी श्रीमंत करणारा वेध हा उपक्रम बदलापूरमध्ये व्हावा ही कल्पना मनात आली. एव्हाना आणखी अनेक समविचारी मित्रमंडळी सुहृद्शी जोडली जात होती आणि सगळ्यांच्याच मनात वेध बदलापुरात आणायची इच्छा बळावत होती. एके दिवशी डॉ. नाडकर्णी यांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. डॉक्टरांनी त्यासंबंधीचं ट्रेनिंग घेणे, इतर शहरात जाऊन वेध attend करून प्रत्यक्ष अनुभव घेणे ह्या सगळ्या प्रक्रिया समजावल्यानंतर आमचा उत्साह दुणावला. त्यानंतर ठाण्यात झालेलं वेध संमेलन attend केलं ज्यात इतर शहरांमधल्या वेध कार्यकर्त्यांना भेटायची, वेधबद्द्द्ल आणखी जाणून घेण्याची संधी मिळाली. आम्ही आमच्या मित्रमंडळींसोबत ह्या सगळ्याची चर्चा केली तेव्हा सगळ्यांनीच वेध ची कल्पना उचलून धरली. वेध साठी आणखी नवी मंडळी आमच्या कंपूमध्ये सहभागी झाली. त्यामध्ये अर्थातच आमची मुलं, आमचे जोडीदार, इतर अनेक मित्रमैत्रिणी आणि बदलापुरातली प्रतिष्ठित मंडळी आहेत.
जुलै महिन्यात झालेल्या पहिल्या ट्रेनिंगला आमच्या टीमपैकी आम्ही
आठजण उपस्थित होतो. दोन दिवस अक्षरशः वेधमय झालो होतो. डॉक्टर स्वतः दोन दिवस
पूर्णवेळ आमच्याशी संवाद साधत होते, वेधच्या वाटेने नेत त्या वाटेवरचे खाचखळगे,
तिथल्या आनंदाच्या, समाधानाच्या जागा त्यांच्या खास शैलीत आम्हाला दाखवत होते. वेध
हा ज्ञानरंजन करणारा, आजच्या काळात हरवत चाललेल्या पण खूप आवश्यक असलेल्या मुल्यसंस्कारांची
पखरण करणारा, महाराष्ट्रातच नव्हे तर यु – ट्यूबच्या माध्यमातून जगभरात पोहोचलेला
अनोखा उपक्रम. आपल्या स्वप्नाचा पाठलाग करत आपले ध्येय साध्य केलेले young
achievers ना डॉक्टर बोलत करत त्यांचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांसमोर माडतात. स्वतःचा
आणि इतरांचा विनाअट स्वीकार, उत्तमाच्या ध्यासाबरोबरच विनम्रता, कृतज्ञता ह्या
मुल्यांची जपणूक, जीवनाशी मैत्रीपूर्ण सामना अशा उच्च संस्कारांची पोतडी समोर
बसलेल्या कोवळ्या मनांना दरवर्षी अधिकाधिक समृद्ध करत राहते.
वेधची ही पार्श्वभूमी सांगितल्यानंतर डॉक्टरांनी वेध हा
event म्हणून कसा प्रभावीपणे साकारला जावा ह्याचे बारकावे आमच्यासमोर मांडले.
त्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच पूर्ण कार्यक्रम ‘पाहता’ आला पाहिजे, हे भान दिलं.
अगदी प्रवेशद्वारापासून ते backstage ला पाहुण्यांची व्यवस्था आणि session च्या
प्रश्नावलीपासून कुठला स्वयंसेवक कुठे उभा आहे ह्याचे mapping इतक्या बारीक
गोष्टीवर काम करण्याची दृष्टी डॉक्टरांनी आम्हाला दिली. वेध च्या आयोजनाच्या
दृष्टीने teams कशा तयार कराव्यात, जवाबदार्या कशा वाटून घ्याव्यात, त्याचे follow
ups कसे घ्यावेत, जमाखर्चाच गणित कसं मांडावं, आयत्या वेळी येणाऱ्या अडचणींसाठी
कसे backup plans तयार असावेत, हे पद्धतशीरपणे शिकायला मिळालं. तांत्रिक भाग कसा
नेटकेपणाने हाताळावा हेही विशेष सत्रांमधून आवाहनच्या सचिनदादा आणि त्यांच्या teamकडून
शिकायला मिळालं. वेध चा हा कार्यक्रम त्या दिवसापुरता न राहता इंटरनेटवर कायमसाठी
असणार आहे, त्यामुळे तो प्रेक्षणीय आणि तितकाच प्रभावी होण्यासाठी स्टेजचं नेपथ्य,
त्याचा अवकाश(space), रंगसंगती ह्या सगळ्याचं नियोजन करण्याविषयी सविस्तरपणे
सांगितलं.
आणखी एक interesting session होत group activity चं.
त्यामध्ये प्रत्यक्ष theme वर काम करायचं होतं. faculties कशा निवडाव्यात,
सत्रांची सुसंगती राखत हारात फुल ओवताना जी सौंदर्यदृष्टी वापरू त्या कल्पकतेने एका
सूत्रात गुंफण कशी करावी ह्याचं प्रात्यक्षिक अनुभवायला मिळालं.
एकंदरीत दोन दिवसात वेधकडे जाण्याची एक स्थिर दिशा आम्हा सगळ्यांना मिळाली. वेधमध्ये मांडलेल्या प्रत्येक sessionगणिक प्रेक्षक म्हणून आपण सारेच समृद्ध होत असतो. पण हे सगळं परिश्रमपूर्वक घडवून आणतानाची प्रक्रिया तितकीच निखळ आनंदाची आणि समाधानाची असते हे सरांच्या परिपूर्ण मार्गदर्शनाने खोलवर रुजवलं आणि त्यातूनच प्रेरणा घेत आम्ही बदलापूरकर वेध नावाच्या आनंदयात्रेसाठी सज्ज आहोत!
The postmodern man, on the threshold of embarking on a revolution of Artificial Intelligence and Creative Robotics, is still facing challenges posed by the most primitive set of emotions, Anger-Anxiety-Depression, and Guilt. With strides in the field of Neuropsychopharmacology and the development of Cognitive Behaviour Therapies…..this man and his culture are still looking with hope towards the wisdom emanating from the past, may it be Yoga, Vipassana, Mindfulness, Art of Living or Inner Engineering.
What is so endearing about these pages of the past? What is it that makes this scriptural wisdom relevant in the globalized, gadget-dependent world? Why are even some of our most ‘Scientific’ brains delving deep into this ancestral treasure?….And of course how can this society benefit from these pearls from the past in this OZONE depleting environment?
This interesting phase in Human Evolution, where unabashed consumerism is growing in stature every day and individualism is reaching new peaks of self-centric intoxication, there is also a quest to transcend mundane materialism and seek a fresh meaning in life.
With multidisciplinary and multiracial teams getting together to study unsolved scientific and cultural riddles on one side….Fanatic streams of thought in nearly all corners of the world are trying to hold this globe for ransom. It’s a strange co-existence of liberal thought and restrictive, sectarian dogmatic thinking co-existing at the same time.
Or is it that THIS is an eternal conflict that man has faced throughout his journey, and that’s the very reason why past wisdom still finds a place in a world that has changed outwardly beyond recognition if a sage from the Upanishadic times visits the globe today.
As a student and activist in the field of Mental Health for a period of almost four decades now, I find myself at a remarkable crossroad…..Trying to understand torn minds amidst apparently bountiful consumer goods, people still having existential problems and in contrast, people with a treasure of pleasures, still unsatisfied and even complaining about getting a raw deal from life.
As a mental health professional, I have been dealing with individuals and families in distress with Psychopharmacological molecules, liberal dosages of REBT (Rational Emotive Behavioural Therapy) and also giving them genuine support. At times I have crossed my limits of being a ‘Clinical Psychiatrist’ and walked an extra mile with many of my clients. Yet, I felt I need to extend my understanding of Life……Life, existence, death . …..Meaning of Life and of death, the relationship with the self……And with others!
Here I decided to go back to the basic treasures from wherein arises the stream of ancient Indian wisdom – Vedanta.!!
The Vedanta philosophy and its origin had been an eluding puzzle for me for over two decades….. My attention turned to the Bhagavat Gita, after I started receiving queries on it by some of my participant executives at Corporate Seminars on the theme of ‘Stress Management’.
The study then became a habit of sorts…..unsettling my emphasis…..First, the Gita…..Then its creative presentations in my mother tongue, viz. the Dnyaneshwari (by Sant Dnyaneshwar), Gatha (by Sant Tukaram) and some other scriptures. With my interest in History, I also closely studied the works of Swami Vivekananda, Lokmanya Tilak, and Mahatma Gandhi. I am deeply touched by how these visionary leaders in their times fell back upon this pool of wisdom for their altruistic goals……Then came the modern commentators of Vedanta, most prominently amongst them Vinoba (Bhave), the spiritual heir of Gandhiji and a profound Rishi whose insights have become the illuminating lights on my daily life. Closely followed by Osho, whose lucid style still encapsulates my attention. When I started studying Vedanta, this luminous trail was enlightened by others like Eknath Easwaran, Nisargadatta Maharaj, Mr. M (a Muslim scholar of Vedanta), scholars from the Ramakrishna order, Gandhian writer, Mrunalini Desai, and many others. Each of them, while explaining the major Upanishads, banked on the wisdom of people like Adi Shankaracharya, Ramakrishna Paramhansa, Ramana Maharshi, J Krishnamurti, and others.
I wanted to link insights in Cognitive Psychology with Vedanta and explore how Vedanta was going beyond cognition….Recent strides in Neurosciences related to imaging techniques added to my excitement. What was still lacking was the presence of a GURU…..an enlightened teacher.
Since the last four years, I have had the good fortune to learn from two special teachers of Vedanta, Neema Majmudar and Surya Tahora. Neema is an economist by training and Surya has a doctorate in pharmacology. Neema was working with the UN and Surya is a faculty at the S. P. Jain Institute of Management. Both have done their study of Vedanta with Swami Dayananda Saraswati, who is the peer of Swami Chinmayananda Saraswati and who founded the Vedanta University near Coimbatore in the South and who has an Ashram at Hrishikesh. Both my teachers are extremely articulate as well as empathic. With a globalized world view, they add their understanding of the modern world to the delivery of Vedic knowledge.
I always require a culminating goal point to all my studious journeys. Three decades of our organization, IPH (Institute for Psychological Health) coming up in March 2020, is one such occasion. Why not share the process of my journey with all, on this occasion and also perform a ‘Dnyanyadnya’ by raising some funds for our institute? Almost fifteen years back I had done a similar experiment for our work and helped realize the dream of our institute in its own, owned space. So I have made a plan.
On December 13th, 14th, 15th, 2019, evening 6 p.m. – 9.30 p.m., 180 minutes per day, 540 minutes on three evenings, I will share with all, my journey around the theme ‘Vedanta Ethos and the Enlightened Personality.’
My serious limitation at this point is my emphasis on the Cognitive approach. To me, all study is about Thinking and Attitudes. That’s my conditioning……Being Empathic is something that I have tried to sharpen over the years. Therefore, the doctrine of ‘BHAKTI’ is not new to me. Altruistic behavior is something that comes naturally to me quite a number of times, as material gain has hardly ever been a priority in my life…..But I am still away from any illuminating spiritual experience that goes beyond cognition. However, there are many times during a day when I do experience the dissolution of my ‘Human MEness’ and the awareness of only a Flow of Being. I just experience it, acknowledge it and leave it.
The advantage of this limitation is that I can relate to all the sorrows and disappointments of my day-to-day practical life in a ‘common’ way. Sometimes it is more useful to share your journey midway than after reaching the destination….. You are still there with miseries around and within you, awaiting transcendence!!
So, here is what it’s going to be…
Audiovisual communication…..A Monologue draped as a dialogue…..For all these 540 minutes, on three evenings, at the end of this year.
Want to join in? Reserve your place and help our cause of ‘Mental Health for All’
-Dr. Anand Nadkarni.
Details:
Date: December 13th, 14th, 15th, 2019 Time: 6.00 p.m. to 9.30 p.m. Venue: Shiv Samarth Vidyalay, Opp. Gadkari Rangayatan, Near Talao Pali, Thane- West Donation Contribution: ₹500 per person for all three evenings. (Your further voluntary contributions to our cause are welcome at the venue) Seating Arrangement: Limited
‘वेध’ हा डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकाराने सुरु झालेला उपक्रम गेली अनेक वर्षं महाराष्ट्रातल्या १० जिल्ह्यांमध्ये सुरू असून पुण्यातही गेली १० वर्षं सातत्यानं संपन्न होतो आहे. वर्षभरानंतर होणार्या भेटीपेक्षा सातत्यानं सगळ्यांशी जोडलेलं राहावं, परस्परांत संवाद व्हावा या हेतूनं वेध कट्टयाची पुण्यात सुरूवात झाली. प्रत्येक महिन्यात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. पहिल्या कट्टयापासूनच हा संवाद रंगत गेला. कालच्या वेध कट्टयात पावसाळी वातावरण असल्यामुळे पावसाळी कविता, गाणी, किस्से ऐकण्यासाठी वेध कट्टयावर अनेक रसिक वेळेत येऊन पोहोचले होते. ब्रह्मे सभागृह सहा वाजता पूर्ण भरून गेलं होतं. व्यासपीठावर तरूण मंडळी लगबग करताना दिसली. कार्यक्रम सुरू झाला. पल्लवी आणि प्राची गोडबोले या दोघी बहिणी (खर तर या बहिणी नाहीत! आडनाव भगिनी!), हर्षद आणि हर्षल हे त्यांना हार्मोनियम आणि तबला/ढोलकी यांची साथ देणारे दोघं तरूण आणि निवेदन करणारे शिल्पा चौधरी आणि प्रदीप कुलकर्णी असे सहा जण व्यासपीठावर होते. प्राची ही कम्प्युटर इंजिनिअर असूनही तिची शास्त्रीय आणि सुगम संगीतातली गाण्याची तयारी लाजबाब! कालचं गाणं लोकांना खुश करण्यासाठी, स्पर्धेत पळापळ करून यश पटकवण्यासाठीचं नव्हतं. हे गाणं आनंदासाठी होतं आणि म्हणूनच कार्यक्रम रंगतच गेला. मल्हार असो, मिया मल्हार असो रागांनी आपलं वातावरण तयार केलं होतं. बोले रे पपिहरा, ये रे घना, ऋतू हिरवा ऋतू बरवा सह अनेक रचना….केवळ अप्रतिम! त्यातच शिल्पा आणि प्रदीप यांनी मधून मधून केलेली इतर कवितांची पेरणी आणि किस्से हे देखील तितकीच रंगत वाढवणारे होते. यात दासू वैद्यची फेसबुकी पावसाची कविता आणि गुरू ठाकूरच्या कवितेतला पाऊस अंतर्मुख करून गेला. मध्यंतरात वेध कट्टयावर गरमागरम भजी, चटणी आणि वाफाळलेला चहा असा फक्कडसा बेत रसिकांसाठी होता. लोकांनी आस्वाद घेतला मात्र कार्यक्रम वेळेत सुरू व्हावा यासाठी बरोबर १५ मिनिटांत आपापल्या जागा पटकावल्या. मध्यंतरांनंतरही कार्यक्रमाची उंची वाढतच गेली. पल्लवीनं गायलेली विदूषक चित्रपटातली आनंद मोडक यांनी संगीतबध्द केलेली ‘श्रावणातलं ऊन मला झेपेना’ ही लावणी आणि प्राचीनं गायलेलं सलिल चौधरींनी संगीतबद्ध केलेलं शैलेंदचं गीत ‘ओ, सजना बरखा बहार आयी’ या गाण्यांनी वन्स मोअर मिळवला. खरं तर प्रत्येक गाण्यानंतर वाजणार्या टाळ्या वन्समोअरचीच मागणी करणार्या होत्या. पण कार्यक्रम वेळेत सुरू करणं आणि वेळेत संपवणं याबाबतीत वेध कट्टा टीम काटेकोर असल्यानं त्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. शेवटची ठुमरी (भैरवीतली) मनाला चटका लावून गेली. कार्यक्रम कसा संपला कळलंच नाही. कार्यक्रमात वेध कट्टयामागची भूमिका आणि सप्टेंबरमध्ये साजरा होणारा वेधचा १०० वा कार्यक्रम याविषयी डॉ. ज्योती शिरोडकर हिनं लोकांशी संवाद साधला. हिचं वैशिष्ट्य असं की, कार्यक्रम संपल्यानंतर खरं तर लोक पटकन निघायला बघतात. पण ज्योती जेव्हा तिच्या मधाळ आवाजात बोलायला सुरू करते, तेव्हा लोक जागेवरून उठत नाहीत. कालही हाच अनुभव आला. पावसाविषयी, कालच्या कार्यक्रमाविषयी तिनं जे भाष्य केलं, केवळ लाजवाब! हास्याचा पाऊस, दुःखाचा पाऊस, विरहाचा पाऊस, आनंदाचा पाऊस……जिवात्म्याशी घडलेला संवाद…..क्या बात है! या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की ही चारही मुलं जाहीर कार्यक्रमात पहिल्यांदा व्यासपीठावर आली होती (अर्थातच, उद्या त्यांना प्रचंड यश मिळणार यात शंकाच नाही!) तसंच पल्लवी, प्राची, हर्षद, हर्षल ही चौघंही वेधचे संयोजक दीपक पळशीकर यांचे विद्यार्थी आहेत. निवेदन करणारी शिल्पा, आभार व्यक्त करणारी डॉ. ज्योती शिरोडकर या देखील पळशीकर सरांच्या विद्यार्थिनी! असे गुरू लाभल्यावर माणूस समृद्ध तर होणारच आणि त्याच वाटेवरून चालणार याची साक्ष ही मंडळी देत होती! देशाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी पुण्याला म्हटलं जातं ते उगाच नाही. एकाच दिवशी इथं वेगवेगळ्या भागात एक से एक अनेक कार्यक्रम होत असतात, ज्यांना जिथे जमेल तिथे रसिक जाऊन पोहोचतात. वैयक्तिक आमंत्रणाची गरज भासते, ना आग्रहाची! तरुणाई पासून ते ७५ पार केलेले रसिकही जेव्हा तैय्यार होऊन येतात आणि दाद देतात तेव्हा खरंच पुण्यात राहत असल्याचा अभिमान वाटतो. आपल्या सर्वांगीण विकासासाठी, रोजच्या ताणतणावांतून मुक्त होण्यासाठी, आपल्या आनंदासाठी, आपल्या समाधानासाठी, वेध कट्टा आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे. आता वेध – पुढल्या वेधचे!
दीपा देशमुख, पुणे
कालच्या वेध कट्टा चे व्हिडिओ बघण्यासाठी खालील link वर click करा:
Palshikar sir stopped his science class before time.
Huge bundles of some yellow colored pamphlets were brought in and kept on the
desk. “Hmm, this is new”, I thought. For all we could see, Sir was extremely
excited to tell us about something. It was a complete novelty of experience
from usually seeing him as a hard- working teacher with ultimate equilibrium. All our naïve selves were happy we wouldn’t
have to sit through some more physics.
Sir started with a question that wasn’t new to us SSC
aspirants. “Tell me, what are your professional ambitions?”, he asked in his
gentle voice, filled with genuine curiosity. Personally, this question wasn’t
one I liked to answer. Not that I didn’t have an answer in mind. I was
extremely sure of my goals. I wanted an education in the humanities.
Previously, when I had answered questions about my aspirations, most people didn’t
react encouragingly. I was met with remarks like, “Why are you taking up arts
when you’re intelligent?” Like the two are mutually exclusive! While I sat
there, worried as to how my answer would be received that day, a few of us had
already answered. Then, something I dreaded happened. Sir pointed his hand in
my direction. “Yes, you tell me…”, he said whilst lifting his eyebrows very
encouragingly. “My deepest desire is to become a writer”, I said hesitantly. A
very supportive Palshikar Sir instantly started telling me about his impressive
library. My ambitions had never received such genuine support from anyone but
my parents; let alone from a science teacher!
That was the day I was introduced to the revolutionary
movement that VEDH is. Growing up, I have always loved biographies, interviews
and the like. This love, along with the description of the work of that year’s
faculty members compelled me to attend the conclave. This was in the year 2013.
Ever since, I’ve been attending Pune VEDH regularly. After
giving it a pragmatic thought, I sincerely think that VEDH has taught me more
than my school has.
There is a different theme to VEDH every year. People
treading different paths grace the stage and inspire us students. Many a time,
our aspirations differ from those of the faculty members. Here, it is the ‘how’
of their work that is more educative than the ‘what’ of it. Over the past six
years, VEDH has given me a lot to think about and incorporate in my life. I
invite you all to walk through the remainder of this blog as I share my
learnings.
Fulfilling career goals isn’t a mechanical event. It
is a process of metamorphosis, of continuous learning. When one loves their
field of study, they feel involved. It creates a strong sense of meaning, a
deeper, more authentic happiness. It feels like one is fulfilling their life’s
purpose and there is nothing else they would be doing but this. Imagine, what a
luxury this state might be! Here, the work is the reward in itself; one doesn’t
have to wait to reach the goal. This kind of happiness, identified by a sense
of involvement and meaning is called ‘Preyas’ in Indian philosophical
literature. It is supplementary to the more temporary happiness that one
experiences after material gains and short- lived satisfactions. This kind of
happiness is called ‘Shreyas’. VEDH has inspired me to aim for involvement in everything
I do.
While one is on the path to goal fulfillment, one hopes
he achieves the goal. Hope is not a passive prayer, but an active state of
initiative, monitoring progress and being flexible in the way to achieve the
goal. An American psychologist, Snyder, conceptualized hope as having two
components: ‘willpower’ and ‘way- power’. Willpower refers to a strong desire
to reach the destination, while way power refers to an active journey towards
the goal. For this journey, one also needs to have a rational understanding of
the resources one has. They could be economic, social, emotional or in any
form; as long as they contribute to one’s cause. He needs to enhance what is
and cultivate what isn’t. I see the personification of this concept of hope in
the faculty at VEDH. Seeing them, I try to imbibe this virtue in myself. It
helps in such a way that I feel centered. Neither am I too calculative to sit
in front of a white board like Sherlock Holmes; nor in a state of inaction like
Jon Snow before battle.
As cliched as it sounds, the journey towards our goal
is not going to be a bed of roses. All the challenges along the way will have
to be met resiliently. We will have to bounce back from failures, learn from
them and land on our feet as gracefully as gymnasts. This bit is a hard nut for
me to crack, but I’m trying.
Many difficult
decisions need to be made along the way, too. Decision making is only a one- time
event; bearing their consequences is a long one that requires immense patience
and courage. All these virtues, I’m still trying to cultivate in good measures.
Apart from all the above qualities, what impresses me
the most is being a good citizen. The faculty members have always contributed to
the society. They’ve all dreamt of a better world and are working for it. I
think it is such work that defines spirituality. It truly unites you with
something greater and beyond yourself.
Today, I am pursuing my masters in counselling psychology from SNDT, Churchgate. In my family, I was the one to take up an education different from everyone else. I was the non- conformist. Shamefully so, that raised many eyebrows. In VEDH and specifically Palshikar Sir, I found an environment that accepts and encourages me, thus, nourishing my being. In the world of VEDH, I was still the conformist amongst people who had done inspiringly varied work. I am grateful VEDH found me when it did. It has widened my world in so many ways. I hold pride in the fact that my academic decisions, along with many life choices, are being shaped by VEDH. I look forward to many more years of learning
वेध ची सुरुवात १९९१ साली ठाणे शहरात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून झाली. इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ या संस्थेचा वेध हा flagship प्रोजेक्ट!
“सुदृढ मन सर्वांसाठी”या संकल्पनेला जीवननिष्ठा मानून विविध उपक्रमांची आखणी व कार्यवाही करणारे आय.पी. एच. चे संस्थापक डॉ आनंद नाडकर्णी यांचे द्रष्टेपण आज वेध या उपक्रमाची “ सामाजिक चळवळ” झाल्याचे पाहून ठळकपणे अधोरेखित होते. तीन दशकांच्या वाटचालीत वेधचे स्वरूप माहिती ते दृष्टीकोन, जीवन मूल्य ते जीवन की पाठशाला ( Life Skill Conclave ) असे बदलत गेले.
१९९१ साली सुरु झालेला वेध आता शतकाकडे वाटचाल करत आहे. वेध सुरु होऊन ३० वर्ष झाली. २०१४ मधे पुण्यात ५० वा वेध झाला आणि आता २०२० मधे १०० वा वेध आयोजित करण्याचे भाग्यसुद्धा पुणे वेध ला लाभत आहे. वेध सुरु झाल्यानंतर जवळपास २५ वर्षानंतर ५० वा वेध झाला आणि आता ६ वर्षातच १०० वा वेध होत आहे . ही वाढ भूमिती श्रेढी ने exponential growth झाली हे फलित मोठ्या प्रमाणात समाजाला जोडले जाण्यात आहे.आज ठाणे ,नगर ,औरंगाबाद , पुणे ,नाशिक ,लातूर , कल्याण , परभणी व पेण अशा ९ शहरांना वेध ने जोडले आहे.
या सर्व वेध मधून डॉ नाडकर्णी यांनी “प्रत्यक्ष संवाद’ (Live interaction) या माध्यमातून जवळ जवळ ७०० संवादकांचे कर्तृत्व सुमारे तीन लाख प्रेक्षकांच्या पुढे उलगडलेले आहे .माझ्या मते हा एक जागतिक विक्रमच होय ! यातील काही मुलाखती आता avahaniph या यू ट्यूब चॅनल वर तुम्ही बघू शकाल.
वेध ची जादू समाज माध्यमांद्वारे जगभरातील मराठी माणसांपर्यंत नेण्यासाठी ‘ वेध- गुजगोष्टी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तरुणाई पुढे आशावादाचा अंकुर रुजावा , समाजातील वेगवान बदलांवर स्वार होताना लय व गती बिघडू न देता विवेकनिष्ठा , लोकशाही मूल्य , सर्वधर्मसमभाव जपण्याची मनोभूमिका तयार करणे ,नेतृत्व गुण निर्माण करणे , चांगलं जगण्याचे पर्याय त्यांच्या पुढे आणणे हे वेध चे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत नेणे हा हेतू या ब्लॉगचा आहे .
हा ब्लॉग वेध बरोबर निगडीत असणारे संवादक ,विद्यार्थी ,पालक ,शिक्षक ,वेधचे आयोजक व इतर कार्यकर्ते यांच्या लिखाणातून सादर करण्यात येणार आहेत.आजपासून सुरु होणाऱ्या या ब्लॉगद्वारे करियर करणाऱ्या सर्वांनाच वेगवेगळे दृष्टीकोन, करियरमधे कोणती कौशल्य आत्मसाद करावी , जीवनाकडे बघताना चांगले पर्याय कसे निवडावे याचेही भान मिळेल.
सप्टेंबर २०२० मधे १०० वा वेध आहे तो पर्यंत १०० ब्लॉग आपल्या पुढे सादर करणार आहोत . आपण हे ब्लॉग निश्चित वाचावे आणि इतरांना देखील वाचावयास सांगावे.