ओळख वेधशी

Vocational Education Direction Harmony, VEDH. वेध? कशाचा? कोणी घेतला? कसा घेतला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळू शकतात! कुठे? तर वेध मध्ये! पण मुळात वेध म्हणजे काय? “IPH, ठाणे” चे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी तीस वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला. वेध हा काही ‘Casual Talk Show’ नव्हे तर सर्वच वयोगटातील व्यक्तींना वेगळा दृष्टिकोन देणारा, स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्याचा, मागोवा घेण्याचा, in short ‘वेध’ घेण्याचा उपक्रम!

साधारणपणे तीन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा वेध उपक्रमाचा अनुभव‌ घेतला होता. जेव्हा आम्ही वेध साठी जायला निघालो तेव्हा मनात खूप प्रश्न होते आणि खरं सांगायचं तर गैरसमज सुद्धा होते. मला वाटलं होतं वेधला जाऊन काय करायचं तर भाषण ऐकायचं, उपदेश ऐकायचे… थोडक्यात काय तर खूप कंटाळा येणार! पण नाही, मी चुकीचा विचार करत होते आणि ती गोष्ट मला प्रत्येक क्षणी जाणवत होती. वेध या कार्यक्रमाची सुरुवात एका छान गीताने होते आणि विशेष म्हणजे हे गीत वेध च्या त्या दिवशीच्या सत्राशी आणि वक्त्यांशी संबंधित असते, जे खुद्द नाडकर्णी सर लिखित असते. आणि मग या गीतानंतर आपण सज्ज होतो वक्त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी…

वेध मध्ये बोलावण्यात आलेले वक्ते हे काही प्रसिद्ध नट-नट्या किंवा प्रचंड ‘fan following’ असलेले लोक नसले तरी ते स्वत:च्या क्षेत्रात अव्वल स्थानावर असतात, प्रामाणिक प्रयत्न करुन, मेहनतीने ते यशस्वी होतात. अगदी उदाहरणादाखल सांगायचं तर धाडसी “सुचेता कडेठाणकर”, सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व “शारदा बापट”, सामाजिक बांधिलकी जपणारे IAS OFFICER “अजित जोशी”, काश्मीर परिसरात उत्पादित होणाऱ्या घटकांचा वापर करून, तिकडेच स्थायिक पण बेरोजगार लोकांना, शाहिद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा म्हणून रोजगार उपलब्ध करून देणारे “सारंग गोसावी” (ASIM FOUNDATION, Pune), इत्यादी.

वेध मध्ये येणाऱ्या प्रत्येक वक्त्याचे काही ना काही वेगळेपण असते. त्यांना स्वतःची वेगळी दिशा, वेगळी वाट गवसलेली असते. किंबहुना त्यांनी ती स्वप्रयत्नांनी शोधलेली असते. याच वाटेवरून पुढे जाताना आलेले प्रसंग मग ते आनंदाचे, दुःखाचे‌ किंवा खडतरतेचे… आपल्या सोबत ते share करतात. प्रत्येकाच्या अनुभवातून अनेक वेगळ्या गोष्टी समजतात. आणि आपण भारावून जाऊन ऐकत असतो…

अशा या बहुगुणी, बहुरंगी व्यक्तिमत्त्वांची नाडकर्णी सरांनी घेतलेली अभ्यासपूर्ण मुलाखत ऐकायला मिळणे म्हणजे पर्वणीच! अशा मुलाखतींची जेव्हा सर सांगता करतात तेव्हा त्यांचा मुलाखतीआधीचा, मुलाखतीसाठीचा अभ्यास, व्यापक दृष्टिकोन आपल्याला जाणवतो आणि सहाजिकच आपल्या ज्ञानात सुद्धा भर पडते!
असा हा वेध उपक्रम खरंच बरंच काही शिकवतो. अजून काही लिहीण्यापेक्षा एवढंच लिहीते,…. “वेध उपक्रमाचा छोटासा का होईना पण एक भाग होण्याची संधी मिळाली तर त्या संधीचा लाभ जरूर घ्या!!!”

-स्वरांगी सुभाष ताम्हनकर,
कार्यकर्ती,
बदलापूर वेध

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: