कवितेचा वेध घेणारी सोनेरी संध्याकाळ

आजवर IPH आणि वेध ने मिळून मला (आणि इतर अनेकांना) कितीतरी सुंदर दिवस दिलेत. कॅलेंडरमध्ये जशा निळ्या आणि लाल तारखा असतात, तशा वेध किंवा वेध संबंधित इतर कार्यक्रम असतात त्या तारखा मला नेहमी सोनेरी वाटतात. त्याआधी आणि नंतरचे कितीतरी दिवस त्याच एका दिवसाचे विचार मनात घोळत असतात आणि इतके दिवस पुरेल इतकी ऊर्जा त्या दिवसातूनContinue reading “कवितेचा वेध घेणारी सोनेरी संध्याकाळ”

ऑनलाईन वेध कट्ट्याची छोटीशी समृध्द गोष्ट

उमलत्या वयातील मुलांसाठी “जीवन की पाठशाला” असणारी “वेध” ही व्यवसाय प्रबोधन परिषद महाराष्ट्रातील दहा शहरांत आयोजित होत असते. हजारो मुले, त्यांचे पालक यांच्या जीवनात चैतन्याचे दीप उजळणारी ही परिषद डॉ. आनंद नाडकर्णी या मनोविकासमहर्षींनी मोठ्या निगुतीने गेली ३० वर्षे फुलविली आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी वेध संयोजकांचे समुह निर्माण झाले. दोन वेधच्या दरम्यान आपापल्या पातळीवर मनोविकासात्मकContinue reading “ऑनलाईन वेध कट्ट्याची छोटीशी समृध्द गोष्ट”

अनुभवू सिध्दार्थ

मोठ्या मायेने संगोपन केलेल्या छोट्याशा रोपट्यावर एखादे सुंदर फुल उमलले की जो आनंद होतो, तो आनंद आजच्या वेध कट्ट्यात सहभागी असलेल्या सर्वांना झाला असणार. “गुणवंत की गुणवान” या कट्ट्यात सहभागी झालेल्या बदलापूर वेधच्या आभाने आज सिध्दार्थ सावंतची मुलाखत घेतली. एखाद्या रंगत जाणाऱ्या मैफिलीसारखी ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. अवघ्या सतरा-अठरा वर्षांच्या या दोन गुणी मुलांनीContinue reading “अनुभवू सिध्दार्थ”

झरीचे भगीरथ – कांतराव देशमुख झरीकर

रविवार, १९ जुलै २०२०. आज मी चक्क परभणीजवळच्या झरी गावात जाऊन आलो. चांगलं अठरा-वीस हजाराची लोकसंख्या असलेलं मोठं कृषकनगर आहे हो. प्रत्यक्ष नाही गेलो, तिथल्या कांताराव देशमुखांना ऑनलाईन वेध कट्ट्यावर भेटलो. त्यांच्या बोलण्यातून झरी गावाचं आणि त्या प्रदेशातील इतर अनेक गावांचं जे दर्शन घडलं ते मोठं मनोहारी आहे, शेअर केलंच पाहिजे असं. कांतराव साधारण पासष्टीचेContinue reading “झरीचे भगीरथ – कांतराव देशमुख झरीकर”

वेध कट्टा, पुणे – चैतन्य सरदेशपांडे – २१ डिसेंबर २०१९

आज रस्त्यात वाहतूक कमी लागली आणि मी अगदी वेळेच्या आत वेधकट्टयावर जाऊन पोहोचले. काहीच वेळात चैतन्य आणि मंजू प्रवेश करते झाले. आज चैतन्यने पांढरा शर्ट आणि निळी जिन्स, तर मी पांढर्‍या रंगाची साडी नेसायची असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही दोघांनी एकमेकांकडे विजयी मुद्रेनं बघितलं. काहीच वेळात आम्हाला कार्यक्रमासाठी टेरेसवर येण्याची सूचना आली आणि माझ्या पुढेContinue reading “वेध कट्टा, पुणे – चैतन्य सरदेशपांडे – २१ डिसेंबर २०१९”

वेध कट्टा आणि तरुणाई ने केलेली स्वरांची बरसात

‘वेध’ हा डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकाराने सुरु झालेला उपक्रम गेली अनेक वर्षं महाराष्ट्रातल्या १० जिल्ह्यांमध्ये सुरू असून पुण्यातही गेली १० वर्षं सातत्यानं संपन्न होतो आहे. वर्षभरानंतर होणार्‍या भेटीपेक्षा सातत्यानं सगळ्यांशी जोडलेलं राहावं, परस्परांत संवाद व्हावा या हेतूनं वेध कट्टयाची पुण्यात सुरूवात झाली. प्रत्येक महिन्यात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. पहिल्या कट्टयापासूनच हा संवाद रंगतContinue reading “वेध कट्टा आणि तरुणाई ने केलेली स्वरांची बरसात”

Design a site like this with WordPress.com
Get started