“बुध्दांसह क्षणोक्षणी” या डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या कवितांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी आमच्या वेध चळवळीतील आमचे पालक श्री. दीपक पळशीकर सर यांच्यामुळे लाभली.हे पुस्तक डॉ. नाडकर्णींच्या बौध्द तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची टिपणे आहेत.
स्टेजवर पुणे वेधच्या डॉ. ज्योती शिरोडकर होत्या, मनोविकासतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी होते, वैदिक आणि बौध्द इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर होते, प्रख्यात मनोविकासतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे होते
मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे देखणे पुस्तक प्रत्येक सुबुध्द वाचकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे आहे. या कार्यक्रमाचे सुंदर समालोचन प्रस्तुत करणारा हा ब्लॉग जरूर वाचा!
Tag Archives: PUNE VEDH
संवेदना फाऊंडेशन आणि वेध
२००४ च्या फेब्रुवारी महिन्यात आमची संवेदना फाऊंडेशन एपिलेप्सी सपोर्ट ग्रुपची पहिली मीटिंग झाली. एखादी संस्था सुरु करण्यापूर्वी तुम्हाला त्यासाठी एक नजर असणे आवश्यक असते. त्यामुळे ही संस्था सुरु करायचे जेव्हा मनात होते, तेव्हा काही महिने आधी मी ठाण्याला आय. पी. एच. येथे धाव घेतली. अर्थातच, डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांना भेटायला. माझ्या मनात एपिलेप्सी विषयीची चळवळ उभी करण्याचेContinue reading “संवेदना फाऊंडेशन आणि वेध”
बदल पेरणारी मणसं
जवळजवळ ४० वर्ष झाली,पुणे मराठी ग्रंथालयातून वाचायला आणलेले काशीबाई कानिटकरांनी शब्दबद्ध केलेले आनंदीबाई जोशी यांचे चरित्र वाचले होते. त्यानंतर श्री .ज . जोशींचे ‘आनंदी –गोपाळ’ वाचनात आले आणि आता काही महिन्यापूर्वी प्रदर्शित ‘आनंदी गोपाळ ‘हा चित्रपट पहिला. त्यातील एक दृश्य आता आठ्वते आहे: आनंदीबाईंचा पदवी प्रदान समारंभ. गोपाळराव तेथे येतात आणि अत्यंत भावनाविवश होत म्हणतातContinue reading “बदल पेरणारी मणसं”