सृजनशील शिल्पकाराशी संस्मरणीय संवाद

रविवार, दिनांक ५ जुलै २०२० रोजी सादर झालेल्या वेध कट्टयावर जयदीप आपटे या तरुण शिल्पकाराची भेट झाली. जयदीप यांनी शेअर केलेल्या गुजगोष्टींचे टिपण करुन ते साठवावेसे वाटले, म्हणून हा लेखप्रपंच. जयदीप यांच्यातील मनाला सर्वात अधिक भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या विचारांची खोली आणि सुस्पष्टता. वयाच्या अवघ्या पस्तीशीतील जयदीप यांना जगण्याचे विविध पैलू अत्यंत बारकाईने समजले आहेत.Continue reading “सृजनशील शिल्पकाराशी संस्मरणीय संवाद”

नियती आणि नियंत्रण

Lockdown च्या सुरुवातीच्या काही दिवसातच डॉ नाडकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी सहकुटुंब चांगले सिनेमे पहा असा सल्ला दिला होता. म्हणून त्यांनीच सुचवलेला ‘Forrest Gump’ हा १९९४ सालचा सिनेमा पाहिला. आपल्यातल्या अनेकांनी ‘पान सिंह तोमार’ हा चित्रपट पाहिला असेल. त्यात एका लष्करातल्या जवानाचा ‘आंतरराष्ट्रीय धावपटू ते कुप्रसिध्द डाकू’ असा प्रवास रेखाटला आहे. ह्या उलट ‘ForrestContinue reading “नियती आणि नियंत्रण”

‘वेधचा वेध घेताना’…..

मी इ. ७वीत असताना ठाणे वेधला जायचं निश्चित केलं आणि कळलं, 25 वर्षे पूर्ण झालेलं ठाणे वेध यावर्षीपासून एका वर्षा आड होणार आणि त्याऐवजी ‘mind fest’ची सुरुवात होणार. थोडक्यात, वेध चा वेध घेण्याच्या आधी माझी mind fest बरोबर ओळख झाली. पहिल्या दिवशी जाताना मनात धाकधूक होती, मी इतका वेळ शांत बसून ऐकू शकेन की नाहीContinue reading “‘वेधचा वेध घेताना’…..”

देणं वेधचं

माझी आणि वेधची भेट म्हणजे काही फारशी जुनी नव्हे! मित्र-मैत्रिणींच्या सांगण्यावरून मी ठाणे वेधला दहावीत असताना गेलो. आम्ही पोहोचलो तेव्हा रिकामं वाटणारं ते मैदान, हां हां म्हणतां थोड्याच वेळात गर्दीने तुडुंब भरले. त्यावेळेची theme होती ‘शून्य ते शिखर’ म्हणजेच ‘Flop to Top’ !! वेध मध्ये आलेल्या Faculties चं स्वागत गाण्याने केलं जातं आणि तीन दिवसांच्याContinue reading “देणं वेधचं”

पडद्यामागचा वेध

वेध आणि IPH सोबत जोडला जाऊन आज मला साधारण ११- १२ वर्ष झाली असावीत (इतकी वर्ष झालीत याचं माझं मलाच खरंतर आश्चर्य वाटतंय!) दरवर्षी वेधची तारीख आधीच्या वेधमध्ये जाहिर केली जाते, आणि जिथे त्यावर्षीचं वेध संपतं तिथेच पुढच्या वर्षीची तयारी सुरु होते.. पूर्वी प्रत्येक वेध नंतर एक ‘कॉमन रिव्हू मीटिंग’ असायची, त्यात आपण सगळी कामंContinue reading “पडद्यामागचा वेध”

माझा वेध प्रवास

काही वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण २००२- २०१०च्या दरम्यान मी नाटकांमधून अभिनेता किंवा बॅकस्टेज (पडद्यामागे) काम करायचो. ठाण्यात माझ्या महाविद्यालयाकडून काही एकांकिका स्पर्धा करायचो.. त्या दरम्यान माझी ओळख सचिन गावकर सोबत झाली. तो तेव्हा नाटकाचे नेपथ्य करत असे. २००६ ला महाविद्यालयीन शिक्षण संपलं आणि उमेदीचा काळ सुरु झाला, मग काम शोधणे हा प्रवाससुद्धा सुरु झाला. दरम्यान सचिनContinue reading “माझा वेध प्रवास”

आपोआप दहावी – डॉ. आनंद नाडकर्णी यांची विद्यार्थी-पालकांबरोबरची झूम मिटींग

लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे विविध क्षेत्रांमधील कार्यपध्दती एक तर थंडावल्या आहेत किंवा बदलल्या आहेत. शिक्षणक्षेत्र याला अपवाद नाही. सुमारे महिन्याभरापूर्वी सर्वच ठिकाणच्या शाळा बंद झाल्या. SSC बोर्डाच्या शाळांमधील इयत्ता ९ वी व ११ वीच्या परीक्षा रद्द झाल्या. इयत्ता १० वीचा भूगोलाचा पेपर रद्द झाला. इतर बोर्डांच्या परीक्षांच्या बाबतीतही थोडेबहुत असेच घडले. सर्वांसाठीच हे शैक्षणिक वर्ष कोणत्या नाContinue reading “आपोआप दहावी – डॉ. आनंद नाडकर्णी यांची विद्यार्थी-पालकांबरोबरची झूम मिटींग”

Create your website at WordPress.com
Get started