ग्लोबल वेध गीत आणि पहिलं रेकॉर्डिंग एक दुग्धशर्करा योग

एखादी गोष्ट पहिल्यांदा करतानाचंं , अनुभवतानाचं feeling खरंच काय वेगळं असतं नाही ? त्यानंतर आपण वारंवार त्याच गोष्टीचा अनुभव जरी घेत राहिलो, तरीही पहिल्या अनुभवाची मजा काही औरच असते ! कारण बरेचदा त्यामध्ये आपल्याला perfection यावं यासाठी आपण टाकलेलं ते पहिलं पाऊल असतं आणि त्यामुळेच कदाचित त्यासाठी केलेले प्रयत्न देखील खूप डोळस असतात ( माझा तरी तसा अनुभव आहे ) . शिवाय त्यात यश – अपयश काहीही आलं तरीही ते खूप सशक्तपणे आपण स्वीकारतो कारण त्यातला अनुभवच आपल्याला बरंच काही शिकवून गेलेला असतो. असंच काहीसं ग्लोबल वेधच्या निमित्ताने माझ्या बाबतीत झालं आणि मला मिळाली स्टुडिओ मध्ये गाणे रेकॉर्ड करण्याची पहिली संधी !

पल्लवी गोडबोले

गेली तीन-चार वर्षं तरी मी पुणे वेधच्या काॅयरचा एक भाग आहे. दरवर्षी डॉ. नाडकर्णी त्या वर्षीच्या सूत्राला अनुरूप असणारं एक अप्रतिम Composition ( काव्य आणि संगीत ) आम्हाला पाठवतात. मग त्याला शोभेल असं Music Arrangement, Chorus , Lead ह्या सगळ्याची मांडणी करून त्याची जवळपास एक ते दीड महिना प्रॅक्टिस केल्यानंतर ते गाणं सादरीकरणासाठी सज्ज होतं. ही सगळी process काही अंशी माझ्या अंगवळणी पडली होती, आणि तसंच ह्या वर्षी पण करायचं असं खरं तर मी गृहीत धरून चालले होते पण म्हणतात ना, ‘God had other plans’ तसंच झालं. Covid -19 Pandemic मुळे संपूर्ण देशात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. जसा जसा लाॅकडाऊन चा कालावधी वाढू लागला न, तसं तसं ‘ आता ह्या वर्षीचं वेध कसं होईल ? मला गाता येईल का ? असे असंख्य प्रश्न मला पडू लागले. पण एक दिवस पळशीकर सरांचा मला फोन आला आणि माझ्या सगळ्या शंकांचं निरसन झालं . ज्या वेधला मी ११ शहरांच्या भौगोलिक सीमांमध्ये बद्ध असलेलं बघितलं होतं तोच वेध आता ग्लोबल झाल्याचं मला समजलं आणि त्यासाठी एक गाणं स्टूडीओ मध्ये जाऊन रेकॉर्ड करायचं असल्याचंही कळलं! ते ऐकून माझी excitement शिगेला पोहोचली . ‘काय गाणं असेल ? त्याची चाल कशी असेल?’ ह्या सगळ्या गोष्टींचं विचारचक्र माझ्या मनात चालू असतानाच मला अजून एक सरप्राईज मिळालं. पळशीकर सरांनी मला गाण्याचे शब्द पाठवले आणि खाली मेसेज लिहिला ‘हे गाण्याचे शब्द आहेत आणि डाॅक्टरांनी सांगितलं आहे की ह्या गीताला चाल काय द्यायची ह्याचा विचारही तू करायचा आहेस.’ अगदी प्रांजळपणे सांगायचं तर ते वाचल्यावर खरं तर माझी चांगलीच पंचाईत झाली होती कारण त्याआधी मला संगीत देण्याचा काहीही अनुभव नव्हता’ किंबहुना ‘ते काही आपल्याला जमणार नाही ‘ अशी अढी मी मनात बाळगून होते. पण इथे मात्र मला कोणतीही सबब द्यायची नव्हती.
मग काय , शेवटी आपण हा प्रयत्न करून तरी बघूया असं ठरवलं आणि कामाला सुरुवात केली .

कोरोनाच्या ह्या कठीण काळात मनोधैर्य वाढविणारं आणि सर्व दूर पसरलेलं निराशेचं मळभ बाजूला सारून , सकारात्मकतेचा प्रकाश देणारे‌ त्या गीताचे भाव आहेत . परंतू त्याला शोभेल अशी चाल काही होईना.‌ अथक प्रयत्नानंतर शेवटी धडपडत का होईना मी एका चालीपर्यंत पोहोचले. साधारण ‘ओवी’ ह्या पारंपारिक गीत प्रकाराच्या जवळपास जाणारी ती चाल होती. पण ‘चालीचा सांगाडा तसाच ठेवून त्यातला ओवीचा conventional पणा कमी कर’, असं suggestion मला डॉक्टरांनी दिलं. खरं तर ते सांगत होते ते कळत होतं, पटतंही होतं ‌ पण वळत काही केल्या नव्हतं! शेवटी डॉक्टरांनीच मला ह्यातून मार्ग दाखवला. त्यांनी मला सांगितलं, ‘जसं एखाद्या सिरीयल चं टायटल साँग असतं तसाच ह्या गाण्याचा विचार कर, त्याला rhythm हवा, पटकन सगळ्यांच्या तोंडात बसेल असं, पण त्याचा भावार्थ प्रभावी पणे पोहोचू दे.’ हे ऐकून मात्र मला काय करायला हवं हे उलगडलं आणि आम्हाला जाणवत असणारी उणीव ‘दिमडी ‘ ह्या वाद्याने भरून काढली . दिमडीच्या एंट्रीने त्या संपूर्ण गाण्याचा चेहरा-मोहराच बदलून गेला आणि गाणं music arrangement सहित तयार झालं. मग पुढचे काही दिवस त्या गाण्याच्या प्रत्येक भागावर, म्हणजे त्यातल्या हरकती, शब्दोच्चार, ताल, लय, म्युसिक पिसेस… ह्या सगळ्यावर फक्त मीच नाही तर माझ्या बरोबरीने तबल्यावर साथ करणारा हर्षल ववले, हार्मोनियम ची साथ करणारे शंतनु पानसे, दिमडी वाजवणारा‌ मल्हार कमलापूर, पळशीकर सर, बापट सर, ह्या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि गाणं रेकाॅर्डिंगला सामोरं जायला तयार झालं .

ठरलेल्या दिवशी आम्ही स्टूडिओ मध्ये पोहोचलो. तिथलं वातावरण हे मी आजपर्यंत जिथ- जिथे गायली आहे त्यापेक्षा खूप वेगळं होतं. कुठलंही स्टेज नाही, प्रेक्षक नाहीत, कोरस नाही. शिवाय, मी एरवी बाकी कार्यक्रमांमधून गात असलेली गाणी ही कोणत्यातरी इतर गायकांनी गायलेली असतात, त्यामुळे मला रेफर करण्यासाठी काहीतरी मटेरियल असतं. पण इथे मात्र त्या क्षणी ते गाणं कसं गायलं जाणार आहे हे फक्त मलाच माहीत होतं. त्या सगळ्याचं दडपण माझ्या चेहऱ्यावर दिसू लागलं होतं. तिथे असणारा प्रत्येक जण मला comfortable करण्याचा प्रयत्न करत होता. पण मला मात्र गाणं नीट झाल्याशिवाय हुश्श होणार नव्हतं. दोन-तीन प्रॅक्टिस नंतर मी माईक वर जाऊन गायला लागले. पण कधी आवाजाचा थ्रो, कधी शब्दोच्चार, असं काही न काही गडबडल्याने गाणं पुन्हा-पुन्हा रेकॉर्ड करावं लागत होतं. आणि मग मात्र माझी चांगलीच घाबरगुंडी उडाली. माझा नरव्हसनेस पळशीकर सरांच्या लक्षात आला आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली, सर म्हणले, ‘पल्लवी, There is always a first time . हे गाणं तुला जमेल ह्या बद्दल आम्हाला कोणालाही शंका नाही. बिनधास्त गा’ त्या वाक्याने मला एनर्जी मिळाली आणि त्यानंतरचा टेक ओके झाला. रेकॉर्डिंग नंतर काहीच दिवसात पुन्हा एकदा पळशीकर सरांचा फोन आला, ‘तुझ्यासाठी गुड न्यूज आहे, आपल्या ग्लोबल वेधचं गाणं डाॅक्टरांनी अजय-अतुल यांना पाठवलंय आणि त्यांनी तुझं आणि आपल्या वाद्य वृंदाचं खूप कौतुक केलं आहे ‘. ही पावती मिळाल्यानंतर मला खरं समाधान मिळालं.

वेध ने मला फक्त प्रेरणा आणि स्फूर्तीच दिलेली नाही तर एक कलाकार म्हणून करावेसे वाटणारे जे प्रयोग असतात त्यासाठी मोकळीक, Platform आणि त्याबरोबर प्रोत्साहन सुद्धा दिलं आहे. माझ्या आयुष्यातले बरेचसे ‘Firsts ‘ म्हणजे मोठ्या स्टेजवरचा सोलो परफॉर्मन्स, Music composition, माझ्या गुरुंसोबत (सौ. प्राची गोडबोले जोगळेकर) स्टेज शेअर करण्याचा experience (वेध कट्टा ), पहिलं स्टुडीओ रेकॉर्डिंग आणि आत्ताच दिलेली पहिला ब्लाॅग लिहीण्याची संधी. प्रत्येक वेध मला नविन संधी, उत्साह, दिग्गजांना भेटण्याचा अनुभव, अशा अमूल्य भेटी देऊन गेलं आहे. त्या सगळ्यांसाठी वेध परिवारातील प्रत्येकाला खूप खूप Thank You !

पल्लवी गोडबोले

ग्लोबल वेध गीत… नक्की ऐका! https://youtu.be/k234YyQS9R4

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: