पडद्यामागचा वेध

वेध आणि IPH सोबत जोडला जाऊन आज मला साधारण ११- १२ वर्ष झाली असावीत (इतकी वर्ष झालीत याचं माझं मलाच खरंतर आश्चर्य वाटतंय!) दरवर्षी वेधची तारीख आधीच्या वेधमध्ये जाहिर केली जाते, आणि जिथे त्यावर्षीचं वेध संपतं तिथेच पुढच्या वर्षीची तयारी सुरु होते..

पूर्वी प्रत्येक वेध नंतर एक ‘कॉमन रिव्हू मीटिंग’ असायची, त्यात आपण सगळी कामं काय आणि कशा पद्धतीने केली त्याबद्दल बोलणं व्हायचं आणि कुठे कुठे आपल्याला शिकायला मिळालं यावर सुद्धा चर्चा व्हायची. तांत्रिक दृष्ट्या आम्ही कुठे कमी पडतोय न पेक्षा आपल्याला आणखी काय शिकायला हवंय हे कळत गेलं. त्यातून पुढच्या कोणत्या गोष्टी कशाप्रकारे हाताळता येतील यावर विचार व्हायचा. त्या सगळ्याची शिदोरी घेऊन आम्ही पुढच्या कामाला लागायचो.

जस जसे आम्ही वेधची सत्रं चित्रित करु लागलो, तस तसे आम्ही त्याचे वेळो वेळी संकलन करत राहिलो, त्याच्या DVD बनवून त्या विक्रीसाठी उपलब्ध करुन देऊ लागलो, या सर्वात आम्ही आवाहन मध्ये अनेक प्रयोग करु लागलो, त्यामुळे अनेक विषय हाताळू लागलो, अनेक गोष्टी शिकू लागलो….

उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी आम्ही OCD या आजाराविषयी लघुपट केले होते. OCD म्हणजे ‘Obsessive Compulsive Disorder’, मराठीत ‘मंत्रचळेपण’, थोडक्यात, एकच गोष्ट वारंवार करत राहणे. त्या आजाराबद्दल ची माहिती IPH मधून मिळाली. त्याची मग कथा तयार केली गेली, कलाकार निवडले गेले, अर्थात आमचे नाटकातले मित्र त्यासाठी मदतीला आले. कॅमेराचे तंत्र समजू लागलं, आवाजाचं तंत्र आणि मग पुढे संकलन आणि अखेरीस लघुपट तयार!
अशी सगळी प्रोसेस आम्ही जवळून अनुभवली. तो आमचा पहिला प्रयत्न, या माध्यमाशी जोडला जाण्याचा. हा वीडियो YouTube वर उपलब्ध अहे, ज्याची लिंक लेखाच्या शेवटी जोडत आहे.
त्यानंतर काही वर्षात अम्ही Bipolar Disorder वरील माहितीपट तयार केला. या माहितीपटाचीही प्रोसेस सारखीच. त्याची संपूर्ण निर्मिती IPH संस्थेतूनच केली गेली, म्हणजे कलाकार सुद्धा IPH मधलेच डॉक्टर आणि समुपदेशक होते.
मग ‘रोज नवा दिवस’ हा मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रावर बनवलेला माहितीपट. मुक्तांगणची व्यसनमुक्ती क्षेत्रातील तीस वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याच्या प्रवासावर आम्ही हा माहितीपट केला. याचं दिग्दर्शन सचिन गावकर याने केलं आणि संकलन दिनेश पुजारी या आमच्या मित्राने केलं. हा माहितीपट आम्हाला चित्रभाषेच्या आणखी जवळ घेऊन गेला.

त्याचा वेध शी संबंध काय?
थोडं उलगडून सांगतो….

आज वेध मधील अनेक सत्रांमध्ये PPT अगदी सहज वापरलं जातं. ज्याचा पुन्हा आपण ते सत्र एडिट करताना वापर केला जातो. या PPT जेव्हा पासून वापरल्या जाऊ लागल्या आहेत तेव्हा पासून वेध च्या सत्रांच स्वरूप ही बदलत गेलं., आता ती सत्र audio visual होवू लागली. सत्रच्या सुरुवातीला पूर्वी निवेदनातून पाहुण्यांची ओळख केली जात असे, आता ती ध्वनिचित्रफीतीच्या माध्यमातून केली जाते. ज्यामुळे स्टेज वर असलेल्या वक्त्यला सत्रावर लक्ष केंद्रीत करता येत. ही ध्वनिचित्रफीत पूर्णत: आवाहन मध्येच तयार केली जाऊ लागली, आज ही होते.

वेध सत्रामध्ये दाखवले जाणारे PPT

बरेचदा अनेकांना असा प्रश्न पडतो, की हे audio visual कशासाठी? त्याने काय फरक पडतो? त्याचा खरंच उपयोग होतो का?

Google आणि Wikipedia च्या माध्यमातून आज लोक लगेच त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवू शकतात, परंतु ती केवळ वाचता येते. चित्रफितीच्या माध्यमातून त्याच महितीला सादर केल्यामुळे त्याचा एक वेगळा परिणाम दिसून येतो आणि अनायसे त्याचा उपयोग त्या सत्राला होतो.

आपण जन्माला येतो तेव्हा अक्षरं शिकून येत नही. म्हणजे आपण सर्वप्रथम दृश्य पाहतो, अक्षरं सुद्धा कळण्यापूर्वी त्याचं चित्र आधी येतं, आणि मग त्याची ओळख. किंवा दृश्य जास्त ताकदीनिशी अपल्या मनात छापली जातात आणि दीर्घकाळ टिकून राहतात.

पडद्यामागची तयारी….

उदाहरणार्थ ‘शिस्त आणि नियोजन’ या ठाणे वेध मधील एक सत्र म्हणजे सुबोध भावे आणि महेश लिमये यांचं सत्र, हे दोघेही सिनेक्षेत्रतील दिग्गज. त्यावेळी सिबोध भवन्चा बालगंधर्व सिनेमा release झाला होता आणि त्याच छायाचित्राण हे महेश लिमये यांनी केलं होतं. अशा प्रकारच्या मित्रांना जर audio visual ची जोड मिळाली तर काय गम्मत करता येते त्याची झलक तुम्ही त्या सत्रमध्ये बघू शकता.

दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर विकी रॉय या नावाजलेल्या छायाचित्रकाराच, त्याच्या सत्रांमध्ये जर त्याने काढलेले फोटो अपल्यासमोर आलेच नसते तर? तर ते केवळ माहितीपर सत्र झालं असतं. तेच जेव्हा त्याच्या फोटोसह पाहता आलं तेव्हा त्याला एक वेगळीच उंची मिळाली.

आज महाराष्ट्रात होत असलेल्या जवळ जवळ सर्वच वेध सत्रांमध्ये PPT किंवा video दाखवले जातात आणि ते तितक्याच जाणतेपणाने पहिले जातात ज्यामुळे त्या सत्रांचा आणि सत्रांमध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांचा परिणाम दीर्घकाळ राहतो.

दृश्यांचा परिणाम किती आणि कसा होतो याची प्रचिती नुकतीच आली त्याला कारण ठरलं ते म्हणजे नुकताच आम्ही आवाहन माध्यम विभागाद्वारे आणि ‘पॉल हॅम्लिन फाऊंडेशन’ च्या संयुक्त विद्यमाने स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक अजाराविषयी जागृती करणारे तीन लघुचित्रपट म्हणजेच ‘शॉर्ट फिल्म्स’ तयार केल्या आहेत.

त्या सर्व शॉर्ट फिल्म्स आज खूप लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्याचे परिणाम ही समोर येऊ लगले. या चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत आजाराची माहिती पोहोचली हे तर झालंच, पण लोक खुलेपणाने ते स्वीकारू लागले, ते इतरांपर्यंत पोहोचवू लागले. ह्या फिल्म्स बनवणे हा आवाहनच्या एकंदरीत कामगिरीचा एक मैलाचा दगड म्हणता येइल.

हे सगळं वाचायला जितकं सोपं वाटतं, तितकं सहज नक्कीच नाही, कारण या सगळ्यात टीम वर्क लागतं. प्रत्येक सत्रातील PPT किंवा Video त्या सत्राच्या कोणत्या वेळेत, कोणत्या प्रश्नाला किंवा कोणत्या संदर्भाला दाखवला गेला पाहिजे हा एक वेगळा टास्क असतो. त्यासाठी आम्ही वेगळी तयारी करुन ठेवतो. ती म्हणजे सत्रापूर्वी त्या सत्राची एक प्रश्नावली तयार करुन घेतो. त्या सत्राच्या दरम्यान कोणत्या प्रश्नाला कोणती स्लाइड दाखवायची आहे त्याची माहिती करुन घेतो आणि योग्य वेळी त्या दाखवतो.

वेध दरम्यान या पडद्यामागच्या कामांची एक वेगळीच मजा असते. नेहमीची कामं जरी असली तरी त्यांचं थोडसं का होईना टेंन्शन असतंच पण एकदा का सत्र सुरु झालं की ते जणुकाही अपोआप घडत जातं असं वाटतं.

हे सगळं करण्यासाठी धैर्य अर्थातच वेधमुळे आणि वेध मध्ये आलेल्या अनेक पाहुण्यांच्या अनुभवांमुळे अम्हाला मिळत.

जाता जाता तेवढं YouTube वर जाऊन आपल्या AVAHAN (आवाहन) चॅनेलला subscribe नक्की करा. सोयीसाठी लिंक लेखाच्या शेवटी देत आहे. आम्ही केलेले काही चित्रपट, वेध ची अनेक सत्रं, तसेच मानसिक आरोग्यासंबंधित अनेक videos आपल्याला पाहता येतील, तेव्हा नक्की या चॅनेलला भेट द्या!

शैलेश मदगे,
आवाहन माध्यम विभाग व वेध कार्यकर्ता

Email: shaileshmedge0@gmail.com
AVAHAN Email: avahaniph@gmail.com

संदर्भासाठी लिंक:

OCD या मानसिक आजाराविषयी केलेल्या लघुपटासाठी: https://www.youtube.com/watch?v=aLxzXB-v4cQ&list=PLc6RbyUBWjXwQtlioF5BZMbFiax3-WkBD

Bipolar Disorder या मानसिक आजाराविषयी केलेल्या लघुपटासाठी: https://www.youtube.com/watch?v=R-3oXZxr2kM&list=PLc6RbyUBWjXz12U1N_a5GYTP8CmlrxK4o

रोज नवा दिवस’ हा मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रावर बनवलेल्या माहितीपटासाठी: https://www.youtube.com/watch?v=R-3oXZxr2kM&list=PLc6RbyUBWjXz12U1N_a5GYTP8CmlrxK4o

लघुचित्रपटांसाठी:
पायवाट: https://www.youtube.com/watch?v=6eNht_wnwwU
सावल्या: https://www.youtube.com/watch?v=qkjpBfeYrq8
घालमेल: https://www.youtube.com/watch?v=yT02xqORYYs

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: