वेध सोबत वाढताना

मी दुसरी तिसरीत असताना माझे आईबाबा वेध साठी ठाण्याला गेले होते. मलाही त्यांच्याबरोबर जायचं होतं, पण आई म्हणाली तू थोडी मोठी झालीस की तुला नेईन, तेव्हा तुला सगळं छान समजेल. मला तेव्हा थोडं वाईट वाटलं, आणि आपल्याला आत्ता कळणार नाही असं आई म्हणत्ये म्हणजे आता कळलंच पाहिजे हे प्रकरण आहे तरी काय? मग चौथीत गेल्यानंतर आईने मला वेधला न्यायचं ठरवलं खरं, पण आता मला वाटायला लागलं, तिथल्या मुलाखती गंभीर, कंटाळवाण्या तर नसतील ना?
पण मी तिथे गेल्यानंतर मला सगळं खूपच आवडलं. सगळ्या मुलाखती नीट समजल्या असं नाही, पण हे काहीतरी फार भारी आहे हे मात्र लक्षात यायला लागलं! मग दरवर्षी मी डिसेंबरची आतुरतेने वाट पहायला लागले.

प्रत्येक वेधचं एक विचारसूत्र असतं. त्या सूत्राभोवती सगळी सत्र फिरतात. कुठल्याच सत्रात गंभीर चर्चा नसते. श्रोत्यांना शिकवण्याचा आविर्भाव नसतो. सत्र म्हणजे गप्पाच असतात! गप्पांमधून ते सूत्र उलगडत जातं, आपल्याला मूल्य मिळत असतात, शिकवण मिळत असते, प्रेरणा मिळत असते. वेध मधून शिकणं ही process, sugar coated pills सारखी असते. एरवी जी मूल्य आपल्यामध्ये फार कंटाळवाण्या पद्धतीने रुजवायचा प्रयत्न सुरू असतो, ती मूल्य आपल्याला वेधमध्ये मिळतात आणि तीही interesting पद्धतीने!

वेध मध्ये येणाऱ्या faculties पण ‘off beat’ असतात. आपण ज्या गोष्टींचा career म्हणून विचारही केलेला नसतो, जी क्षेत्र आपल्याला ठाऊक नसतात, त्या वाटांनी ही सगळी मंडळी प्रवास करून स्वतःची ओळख तयार करतात.
सुश्रुत मुंजेंची मुलाखत ऐकल्यावर समजलं की साफसफाईचीसुद्धा company असू शकते.
‘Ecological land management’ असं ही काही असतं हे मानसी करंदीकर आणि केतकी घाटे ह्यांची मुलाखत ऐकल्यावर कळलं.

आणखी एक गोष्ट जाणवली की ही सगळीच मंडळी लहानपणी “academically brilliant” होती अशातला भाग नाही. किंवा extraordinary background मधून येतात असंही नाही. तेसुद्धा एकेकाळी आपल्या सगळ्यांसारखेच होते. फक्त एखाद्या गोष्टीचं वेड, passion आणि कामाप्रती असलेली श्रद्धा ह्यामुळे ते सगळ्यांपेक्षा वेगळे ठरतात. स्टेज वर बसलेली माणसं आज यशस्वी म्ह्णून ओळखली जात असली तरी त्यांच्या यशामागे अनेक अपयशाची मालिका होती. ही सगळी माणसं काहीतरी मोठं यश मिळावं म्हणून हे करत नाहीयेत, आपल्या instincts ना follow करतायत, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करतायत. कर्तृत्व आणि शहाणपण हे काही वयावर ठरत नाही, ते काहीतरी करण्याच्या ऊर्मीतून येतं. आणि आस्थेमुळे टिकतं हे श्रीयंश भंडारी किंवा राहुल अधिकारी ह्यांच्या सारख्यांना ऐकल्यामुळे कळतं. काही जण स्वतःच्या प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी धडपड करता करता इतरांना देखील अनुकूलतेकडे घेऊन जाताना वेधमध्ये पहायला मिळतात. राजस्थानच्या रुमादेवी काय किंवा अभिजित थोरात काय, स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता आपला कामाचा परीघ किती मोठा करतात हे पाहून थक्क व्हायला होतं.
बरेचदा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा एकच विशिष्ट दृष्टिकोन आपल्या आसपासचा समाज देत असतो. ह्याचे वेगळे पैलू पहायला वेध शिकवतं, हे मला दिशा शेख ह्यांच्या मुलाखतीत जाणवतं. समाजाच्या प्रत्येक घटकाकडे पाहण्याची आपली दृष्टी स्वच्छ, निकोप असली पाहिजे, हा त्यादिवशी मिळालेला धडा कायमचा लक्षात राहील.

नाडकर्णी सरांनी उल्लेख केलेल्या उन्नत भावना जगणारी ही माणसं आहेत. सर mind fest मध्ये ज्यावेळी neo cortical emotions विषयी बोलत होते, अशा मंडळींची उदाहरणं देत होते तेव्हा लक्षात येत होतं, आपण अशा थोर मंडळींविषयी पुस्तकांमधून वाचतो,पण अशी माणसं आपल्या अवतीभोवती कितीतरी आहेत. आणि आपण किती भाग्यवान आहोत की त्यांना आपण प्रत्यक्ष पाहू, ऐकू शकतोय.
हे लिहीत असताना मला रेणू गावस्करांचं सत्र आठवलं…आपल्यातला मायेचा आणि आस्थेचा झरा किती मुलांना त्यांच्या आयुष्यात मिळालेल्या नकारांना हसत पाहण्याची जिद्द देतो, तेच मतीन भोसले, रवी बापटले, संतोष गर्जे, ह्यांच्या बाबतीत वाटत राहतं.अशा मंडळींना ऐकून फार भारावून जायला होतं.

मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळेस मोतीलाल नेहरूंनी गांधीजींना पत्र लिहून विचारलं की अशी यात्रा काढून, चालत जाऊन काय होणार? त्या पत्रावर गांधीजींनी एका ओळीत उत्तर दिलं, “करके देखो।” जेव्हा एखादी कल्पना work होईल की नाही असा किंतु मनात असतो तेव्हा ती गोष्ट करून पहावी. त्याचे परिणाम आपल्या अपेक्षेप्रमाणे झाले तर उत्तम, आणि जरी परिणाम अपेक्षित नसतील तरी त्या प्रयोगातून आपल्याला शिकायला मिळेलच की! वेधच्या सगळ्या faculties ‘करके देखो’ वर विश्वास ठेवणाऱ्या!

वेध संपल्यावर घरी जाताना खूप काही वाटत असतं, सत्रांवर आपला विचार सुरू होतो. आणि तो प्रभाव काही एक दोन दिवसापुरता नसतो. आपण बराच काळ त्या विचारात असतो. ह्याचं जितकं श्रेय त्या त्या faculties चं असतं तितकंच नाडकर्णी सरांचं! त्यांच्या समर्पक प्रश्नांमधून संवाद शैली कशी असावी हे हळूहळू समजत जातं आणि शेवटी सर मुलाखतीचं जे सार मांडतात त्यातून किती अमूल्य धन घरी घेऊन जाणार आहोत हे जास्त स्पष्ट होत जातं…आणि पुढचे कित्येक दिवस घरी दारी गप्पांमध्ये वेध सोडून दुसरा विषय नसतो.

अगदी सुरुवातीला ऐकलेली वेधची सत्र जेव्हा पुन्हा आता YouTube वर ऐकते तेव्हा खूप गोष्टी नव्याने गवसल्याचा वेगळाच आनंद मिळतो. त्यांना ऐकताना आपण सुद्धा संवेदनशील होत असतो. पुस्तकातली empathy ची व्याख्या म्हणजे फक्त शब्द असतात. पण आस्था म्हणजे काय हे ह्या मंडळींकडे पाहून समजतं. वेधच्या अफाट ऊर्जेच्या सान्निध्यात आपण मोठे होतोय, इतक्या खऱ्या अर्थाने ‘celebrities’ ना पाहतोय, ऐकतोय ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे आता लक्षात यायला लागलंय. आणि वेधची मोहिनी वाढतंच जात आहे!

– आभा,
कार्यकर्ती,
बदलापूर वेध.

2 thoughts on “वेध सोबत वाढताना

  1. खूप छान लिहिले आहे. वेध बद्दल अगदी याच भावना मनात येतात. वेध चा विषय निघाला की किती बोलू आणि काय काय बोलू असं होऊन जातं. डॉ. नाडकर्णी दरवर्षी एक एक हिरे शोधून आणतात आपल्या साठी.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: