वेध संमेलन २०२०, पेण

“वेध संमेलन १५ ,१६ फेब्रुवारी रोजी पेण येथे आहे, उत्सुक असणाऱ्यांनी कळवावे”, असा निरोप धनंजय सरांचा आला त्यावेळी सुरुवातीला काही घरगुती अडचणीमुळे मी सरांना नाही म्हणून सांगितले होते, तरीही मनात धाकधुक चालू होती…. येण्याची इच्छा कायम होती. अगोदर नाही म्हटलं, पण नंतर येण्यासाठीची निश्चितता कायम झाली.

यावर्षी संमेलनाला यायची इच्छा होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे यावर्षीचे आमचे लातूर वेधचचे विचारसुत्र ”गौरव बंडखोरीचा’ . वेध झाल्यापासून अस्वस्थता निर्माण झाली ती अजूनही कायम आहे! वेधनंतर सरांनी सर्वांना आपल्या मनातील भावना, वेधचा अनुभव लिहायला सांगितला. वेध ने प्रत्येकाच्या मनावर छाप टाकली आहे असं जाणवलं. यावर्षीचा वेध झाल्यापासून मनात खूप काही प्रश्न पडत होते…. गोंधळ होता….. अस्वस्थता होती. त्यामुळे आता वेधविषयी जास्त seriousness आला होता. यावर्षीच्या वेध ने मला स्वतःच्या पलीकडे विचार करायला शिकवलं .

१५, १६ फेब्रुवारी पेण वेध संमेलनानंतर विचारात अजून भर पडली. येथे जमलेले सर्वजण बोलत असताना जाणवत होत की यांचा सर्वांचा अभ्यास खूप मोठा आहे. आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार याची जाणीव झाली.
पहिला दिवस म्हणजे दि. १५ फेब्रुवारी सकाळी ९.३० च्या आसपास आम्ही संमेलन स्थळी पोहोचलो. “कृषिवन” चे फोटो आधी पाहिल्यामुळे उत्सुकता वाढली होती. ‘क्षितिज’ ( पेण वेध) च्या कार्यकर्त्यांकडून छान हसत स्वागत झाले.
हे माझ पहिलं वेध संमेलन…. सर्वकाही पाहून उत्सुकता वाढत होती .

पहिल्या सत्रात सर्व ठिकाणहून आपला मागील वर्षाचा वेध चा आढावा सांगण्यासाठी प्रतिनिधींनी पुढे यावे असे डॉ. आनंद नाडकर्णी सरांनी सांगितले. प्रत्येकाने अगदी आपल्या आपल्या शहराच्या वेधचा सारांश डोळ्यासमोर उभा केला. नंतरचं सत्र सप्टेंबर २०२० मध्ये होत असलेल्या १०० व्या वेधबद्दल होतं..१०० व्या वेधबद्दलची उत्सुकता आता वाढली आहे.

जेवणानंतर “12 angry men” हा चित्रपट पहायला मिळाला ,तो परत एकदा लातूर च्या टीम ने सोबत पहावा अशी मागणी मी धनंजय सरांना केली आहे. “12 angry men” पाहिल्यानंतर डॉ. आनंद नाडकर्णी सरांनी त्यावर दिलेली पूर्ण माहिती- चित्रपट कसा पहावा, त्यातील प्रत्येक पात्राच्या मानसिकतेचे वर्णन, प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा, त्यांच्या व्यवसायाचा त्यांनी घेतलेल्या निर्णयावर कसा प्रभाव पडतो या सर्व गोष्टी अद्भुत वाटल्या!
संध्याकाळच्या वेळी खेळातून अनुभवायला मिळालेले टीमवर्क,नंतर डॉ. आनंद नाडकर्णी सरांसोबत गप्पा…. ऐकत राहावं वाटत होत. दिवस खूप छान गेला….

रविवारी सकाळी पक्षी निरीक्षणासाठी गेलो, तेंव्हाच पक्षीमित्र प्रेमसागर मिस्त्री यांची ओळख झाली. त्यानंतर १० वाजता सुरु झालेल्या पाहिल्या सत्रात त्यांच्या कार्याची माहिती झाली. २० वर्षे एका कार्यावर टिकून राहण्यामागे काय भावना असतील, याची जाणीव सागर ने करून दिली. त्यांचं कार्य एकून सर्वांनाच असे वाटले की वेधच्या माध्यमातून त्यांचं काम आणि विचार संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचावे

यानंतर मी व इतर १५ वेध संमेलनासाठी आलेल्या नवीन सदस्यांना, त्यांना संमेलनाूून काय मिळाले हे सांगण्याची संधी मिळाली. हे अनुभव एकत असताना परभणीच्या रेखाताईंचा उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी महिलांना ,त्यांच्या सहकाऱ्यांना वेध बद्दल माहिती देण्यासाठी जी धडपड केली ती खूप काही शिकवून गेली, त्या धडपडीचे बीज सर्वांमध्ये रोवून गेली. सातत्याने, विचारपूर्वक प्रयत्न करत राहणे हे शककवणारा असा हा वेध चा कार्यक्रम खूप व्यापक झाला..

– सुनीता कदम,
लातूर वेध.

2 thoughts on “वेध संमेलन २०२०, पेण

  1. मला वेध या initiative बाबत माहिती मिळेल.का मी पुण्याला राहतो..आपल्या
    उपक्रमात सहभागी होऊ इच्छितो..धन्यवाद .

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: