उन्नतीचा प्रवास …….

“वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास” या ‘IPH’ या संस्थेच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमामध्ये एक वेगळा विचार मिळाला.
मन म्हणजे नक्की काय? ते माझ्या शरीरात नेमक कुठे आहे? माझ्या जगण्यामध्ये त्याचं नेमक काय प्रयोजन आहे? हे थोडंफार या तीन दिवसांमध्ये लक्षात आलं.

विचार – भावना – वर्तन यांच्या एकत्रित आविष्कारातून आपल्याला मन जाणवत राहतं. विचार – भावना – वर्तन हे हातात हात घालून जाणाऱ्या एका समभुज त्रिकोणाचे तीन कोन आहेत. यांची समभुजता एका कोनाने जरी बिघडली तरी गडबड होऊ शकते. विचार – भावना – वर्तन या त्रिकोणाच्या पायावर आपलं संपूर्ण अस्तित्व उभं आहे. या तीनही कोनांचा आदिमा कडून प्रगत व प्रगत कडून उन्नत याकडे होणारा विकास आपल्या व्यक्तित्वाचा विकास घडवू शकतो.

आदिम भावना या आपल्या जगण्याच्या संघर्षातून आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या आपल्याला कोणी शिकवाव्या लागत नाहीत. कोणत्या आहेत या आदिम भावना? या आहेत लढा (fight ), पळा (flight ), थिजून जा (freeze ). म्हणजेच आपल्याहून कमी ताकदीचं संकट असेल तर आपण लढून त्याचा सामना करू शकतो, जास्त ताकदवान संकट असेल तर पळून जा पण आपल्या कल्पनेपलीकडील, अतर्क्य संकट असेल तर आपण थिजून जातो. Fight: Anger, Flight: Anxiety, Freeze: Depression या आदिम भावना आपल्या लिम्बिक सिस्टिम मध्ये आहेत. या प्रत्येक जीवा मध्ये असतातच. जसजसा मानवाचा मेंदू विकसित होत गेला तसा नवीन भावनांचा उगम होत गेला. आदिम भावना या स्वकेंद्रित ( I ) आहेत तर प्रगत भावना या मी व माझ्याबरोबरचे इतर (Me to We ) यांना जोडणाऱ्या आहेत. उन्नत भावना या “मी”पणाला विरघळवून टाकणाऱ्या (Oneness ) आहेत. तिथे पोचल्यावर मी व इतर हा भेद रहातच नाही, हे सगळेच एकरूप होऊन जाते. ‘हे विश्वची माझे घर’ अशी भावना यातूनच निर्माण होते. संत वचनांमधून , वेदांतामधून हीच कल्पना मांडलेली आहे.

सध्या सर्व क्षेत्रांमध्ये मानव प्रगती करत आहे, राहणीमान सुधारत आहे आणि जगण्याच्या संघर्षातील आव्हानांवर आपण विजय मिळवलेला आहे. परंतु आता आपल्याला नवीन आव्हानांचा सामना करायचा आहे आणि यासाठी आपल्याला आव्हानांना सामोरे जाण्याची आपली पद्धत बदलायला लागणार आहे. हा बदल कधी घडेल? हा बदल घडेल जेंव्हा आपण आदिम भावनांच्या सवयीतून बाहेर पडू. स्वकेंद्रित विचारांकडून, “मी” पणा सोडून “आम्ही “ कडे जायला हवंय. तेंव्हाच या नवीन आव्हानांचा सामना सहजपणे करणं आपल्याला जमू शकेल. याचा सतत सराव करावा लागेल कारण आदिम भावना या निसर्गदत्त आहेत. आपण पटकन त्या प्रकारे React होऊ शकतो. परंतु एकदा का आपण “मी” कडून “आम्ही” कडे गेलो की मग आपल्याला पुढच्या टप्प्याचा प्रवास चालू करता येईल.

पुढचा टप्पा म्हणजे एकरूपता ….. या संपूर्ण विश्वाची एकतानता….. भया कडून अभया कडे आणि अभया कडून निर्भया कडे ….. द्वैतांकडून अद्वैताचा प्रवास, स्वार्थाकडून सहयोगाकडे आणि सहयोगातून समर्पणाकडे नेणारा प्रवास……

-वैदेही भिडे

माइंड फेस्ट या कार्यक्रमाचा भाग १ AVAHAN IPH या YouTube मालिकेवर प्रसिद्ध झाला आहे, नक्की बघा! https://youtu.be/rKMWqQJsINk

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: