वेध आणी मी- एक सहप्रवास

२०२० मध्ये होणाऱ्या शंभराव्या वेध ची बातमी बघितली आणि माझ्या डोक्यातून पावलापर्यंत एक सुखद संवेदना सळसळली. होय, पुणे वेध सुरु झाले २०११ साली. ‘यशवंतराव’चा पडदा वर गेला आणि हसत हसत, ‘सुस्वागतम्’ म्हणत डॉक्टर. आनंद नाडकर्णी यांनी क्षणार्धात प्रेक्षकांचे मन जिंकले. पहिलाच कार्यक्रम ‘सृजनशीलता व सर्जनशीलता’ हे सूत्र घेऊन संपन्न झाला. सुचेता चे कष्ट, सलील कुलकर्णी व संदीप खरेचे गाण्याचे गुळपीठ, अभिजीत ची जिद्द, रेणुका चेतन, सर्वच भन्नाट. एवढा उच्च दर्जा पहिल्याच कार्यक्रमाने दाखवून दिला.

‘प्रतिकूल- अनुकूल’ परिस्थितीत आपला ‘मकसद्’ पूर्ण करण्यासाठी ‘स्वप्नांच्या वाटेवर’ असणाऱ्या ह्या बहुगुणी व्यक्ती ‘स्व च्या पलीकडे’ जाऊन समाजाचं ऋण फेडत आहेत. या सर्वांनी त्यांच्या कामात त्यांचा ‘छंदानंद’ शोधला. खडतर वाट सुद्धा आपली करून जंगल बसवण्याचा वसा घेतलेला, सच्चा दिलाचा  जादव पायेंग, आनंद शिंदे चे हत्ती प्रेम, “माझं प्रिय वाद्य म्हणजे माझा श्वास”, असं म्हणणारे तौफिक कुरेशी, याच बरोबर येल्लो गर्ल गौरी गाडगीळ, सोनम वांगचुंग अश्या अनेक अनुभवसंपन्न व्यक्ती विसरू म्हटले तरी नाही विसरता आल्या. काश्मीर व भारतातील जातीवादाचा भस्मासुर विसरून माणुसकीचा पूल बांधणारे सारंग गोसावी, यास्मिन आणि युनूस, यांचा अनुभव ऐकताना उर भरून आले. पुणे वेध मध्ये पेश झालेल्या अश्या किती रत्नांची नावे सांगू? नद्या वा जलस्रोत धोरणांची आखणी आणि अंमल बजावणी करणारे मौलिक सिसोदिया, ‘एलिझाबेथ एकादशी’ च्या मधुगंधा कुलकर्णी. ‘जीवन हेच संगीत व संगीत हेच जीवन’ हे अमर ओक आणि मधुर पाडवळ या दोघांनी दाखवून दिले. तेजस गुप्ते, कमांडर दिलीप दोंदे, यांची जिद्द व कष्ट करण्याची ताकद हे बघून, देवाने ह्यांना कोणत्या मिश्रणाने बनवले आहे, असा मला प्रश्न पडला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या सहकारी डॉ. ज्योती शिरोडकर यांची मुलाखत घेण्याची पद्धत. ते दोघेजण या अवलियांच्या एकनिष्ठतेचे, चिकाटीचे, ध्यासाचे, मूल्यांचे, गुणांचे एकेक पदर कौशल्याने उलगडत जातात. आपल्या डोळ्यांसमोर एका सुरवंटाचे फुलपाखरूत रूपांतरच होत आहे जणू!

ह्या सगळ्या मुलाखतींमधून एक जाणीव होते; ती म्हणजे ह्या सगळ्या व्यक्तींनी अनेक शारीरिक, मानसिक व आर्थिक अडचणींवर मात करत, स्वतःला तावून सुलाखून घेत जीवनाला सोन्याची चमक आणली आहे ह्याची.

पुणे वेधचे कार्यक्रम हे नेहमी एक सकारात्मक संदेश देणारे, जगाकडे आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारे, सामाजिक भेदभाव आणि जातिधर्मांच्या भिंतींपलीकडे बघायला प्रवृत्त करणारे असतात. आयुष्याला दिशा देणाऱ्या ह्या वेध च्या बोधचिन्हामधील बाण अगदी पूरक आहे.

मला कायम वाटतं, सख्या सोयऱ्यांना, मित्र मैत्रिणींना आपण अनंद साजरा करण्यासाठी बाहेर मेजवानीसाठी घेऊन जातो त्या ऐवजी त्यांना ह्या कार्यक्रमाला घेऊन यावे व त्यांचा आनंद द्विगुणित करावा.

गेल्या काही वर्षात जसं वेध बरोबर माझं नातं घट्ट होत गेलं, तसं पुणे वेध आयोजित करणाऱ्या  पळशीकर  दाम्पत्त्याशी माझा संवाद वाढला. हे दाम्पत्त्य मनमिळावू तर आहेच, शिवाय सहकाऱ्यांना आपल्या समवेत घेऊन जाण्याचे कौशल्या ही त्यांच्याकडे आहे. त्यांचे सहकारी विनासायास, तत्परतेने, आनंदाने मदतीचा हात देऊन वेध चा कार्यक्रम यशस्वी करताना मी पहिले आहे.

वेध म्हणजे मनाचा वेध, आपल्या असीम स्वप्नांचा वेध, स्व च्या पलीकडे जाण्याचा वेध लावून जातो.

पुढच्या वेध ची आतुरतेने वाट पहाते,

मृदुला पराडकर,
कॅनडा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: