खुल्या नभाच्या अंगणातील बिनभिंतीची शाळा

“कहाणी माझ्या घडण्याची” हे सूत्र घेऊन पहिल्यांदा २०१५ साली परभणी मध्ये वेध चा कार्यक्रम रंगला. तेव्हापासून ते २०१८ सालच्या “आयुष्याचे धडे गिरवताना” या सूत्रापर्यंतचा हा प्रवास! गोबीचे वाळवंट पार करणारी पहिली भारतीय महिला सुचेता कडेठाणकर, सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, जेष्ठ लेखिका वीणा गवाणकर, समाजसेविका गुंजन गोळे अशा अनेक पाहुण्यांनी परभणी वेध चे व्यासपीठ आजपर्यंत समृद्ध केले आहे.

जेव्हा हे सर्व पाहुणे परभणीकरांसमोर आपल्या आयुष्याचे धडे गिरवतात तेव्हा विद्यार्थ्यांना ‘ Vocational Direction ‘ देण्यास तर मदत होतेच; पण त्या पलीकडे जाऊन मी म्हणते की वेध ही त्यांच्यासाठी अनौपचारिक शिक्षण पद्धतीच होय!

वेध मध्ये आलेल्या पाहुण्यांची खासियत अशी की त्या सगळ्यांकडे प्रत्येक क्षण पूर्णपणे जगण्याचाच नाही तर स्वीकारण्याचा सुद्धा मोकळेपणा असतो. याच मनमोकळेपणाने जगण्यातून स्वतःला गवसत गेलेले ते, प्रेक्षकांसमोर आपल्या आयुष्याचे धडे गिरवतात.

एव्हरेस्ट वीर प्रा. मनिषा वाघमारे

परभणी वेध मध्ये २०१८ साली पाहुण्या म्हणून आल्या होत्या ‘Wildlife Mother’ विनया जंगले . त्यांनी बिबट्याचा हल्ला परतवून लावून त्यालाच जीवनदान दिले होते .”आयुष्यात प्रत्येक क्षणाला संघर्ष असतो. त्याला धीटपणे सामोरे गेलो तर सुख नक्की पदरात पडते”, असा धडा परभणीकरांना त्यांनी दिला. ‘Make India Read’ असे मिशन असलेला Booklet Guy अमृत देशमुख म्हणतो की ,”कृतीतूनच प्रेरणा मिळते”. परभणीची कन्या एव्हरेस्ट वीर प्रा. मनिषा वाघमारेंनी सांगितले की शिखरावर पोहोचणे म्हणजे जन्म आणि मृत्यू मधला प्रवासच जणू. “आपली कला इतरांच्या कामी यावी”, अशी स्व च्या पलिकडे नेणारी शिकवण दिली विकी रॉय यांनी. विकी रॉय बद्दल सांगायचं झाला तर कचरा वेचणारा मुलगा ते जागतिक कीर्तीचा फोटोग्राफर असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.

‘Wildlife Mother’ विनया जंगले

अशा कित्येक दिग्गजांकडून मिळालेल्या धड्यांमुळेच वेध मध्ये नकळत नीतिमूल्ये रुजवली जातात; आपल्या वैयक्तिक जीवनात मदत करतील असे विचार मनाशी जोडले जातात. प्रत्येक पाहुण्याचे तासाभराचेच सत्र, पण त्यातून मिळणारी ऊर्जा मात्र वर्षभर पुरेल एवढी. म्हणूनच ही दिवसभराची परिषद उत्साहाने पार पडते. वेधचे Education + Entertainment ,अर्थात ‘Edutainment’ ;म्हणजेच ‘ज्ञानरंजनाचा मेळावा’ हे नाव अगदी सार्थ आहे. गेल्या चार वर्षात वेध हा परभणीच्या सांस्कृतिक वलयात सामिल झाला आहे.

वेध मध्ये पाहुण्यांचे स्वागत त्या वर्षीच्या सूत्राला साजेशा एका गाण्याने होते. २०१८ सालचे परभणी वेध मधील गीताचे शीर्षक होते “खुल्या नभाच्या अंगणातील बिन भिंतीची शाळा”. ही ओळ जणू वेध चे वर्णनच करत आहे.
दरवर्षीचा नोव्हेंबरचा शेवटचा रविवार माझ्यासाठी जादूई दुनियेसारखा भारलेला, मंतरलेला ठरतो. या वर्षी वेधची ही जादुई सफर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी “अजब स्वप्नांची गजब दुनिया” या सूत्रासह मार्गक्रमण करणार आहे.

विशाखा नायक,
प्रमुख कार्यकर्ती,
परभणी वेध.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: