आता वेध- बदलापूर वेधचे!

सुहृद: एक कलांगण बदलापूरमध्ये राहणाऱ्या उत्साही, कलासक्त आणि आपल्या routine च्या बाहेर वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्या मैत्रिणींचा गट. आपापले नोकरी, व्यवसाय, संसार ह्यात स्थिर होण्याच्या टप्प्यावर ह्या मैत्रिणी एकत्र आल्या ते निमित्त होतं, ‘ऋतुगंधा’ ह्या रंगमंचीय कार्यक्रमाचं. ऋतुगंधाचे विविध ठिकाणी प्रयोग सादर करत असतानाच मनात आलं, घडत्या वयातल्या मुलामुलींसाठी काही उपक्रम करता येतील का, जे बदलापूरसारख्या छोट्या शहरात मुलांना मिळत नाहीत.  digital युगात जन्मलेल्या पिढीला भावनिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांची बीजं रोवली गेली. आणि  जन्माला आल्या छंद आनंद ही कार्यशाळा, ऐकू आनंदे ही व्याख्यानमाला, अंतरंग हा स्वविकासाचा उपक्रम, बालवाचक कट्टा असे कितीतरी…

ह्या आणि अशा अनेक कल्पनांचं बीजारोपण होत असताना ‘वेध’ हा आमच्या उद्दिष्टांना सर्वार्थाने पूरक असणारा किंबहुना एक वेगळी उंची देणारा आणि पालक, मुलं आणि एकंदरीत समाजाला विचारांनी श्रीमंत करणारा वेध हा उपक्रम बदलापूरमध्ये व्हावा ही कल्पना मनात आली. एव्हाना आणखी अनेक समविचारी मित्रमंडळी सुहृद्शी जोडली जात होती आणि सगळ्यांच्याच मनात वेध बदलापुरात आणायची इच्छा बळावत होती. एके दिवशी डॉ. नाडकर्णी यांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. डॉक्टरांनी त्यासंबंधीचं ट्रेनिंग घेणे, इतर शहरात जाऊन वेध attend करून प्रत्यक्ष अनुभव घेणे ह्या सगळ्या प्रक्रिया समजावल्यानंतर आमचा उत्साह दुणावला. त्यानंतर ठाण्यात झालेलं वेध संमेलन attend केलं ज्यात इतर शहरांमधल्या वेध कार्यकर्त्यांना भेटायची, वेधबद्द्द्ल आणखी जाणून घेण्याची संधी मिळाली. आम्ही आमच्या मित्रमंडळींसोबत ह्या सगळ्याची चर्चा केली तेव्हा सगळ्यांनीच वेध ची कल्पना उचलून धरली. वेध साठी आणखी नवी मंडळी आमच्या कंपूमध्ये सहभागी झाली. त्यामध्ये अर्थातच आमची मुलं, आमचे जोडीदार, इतर अनेक मित्रमैत्रिणी आणि बदलापुरातली प्रतिष्ठित मंडळी आहेत.

जुलै महिन्यात झालेल्या पहिल्या ट्रेनिंगला आमच्या टीमपैकी आम्ही आठजण उपस्थित होतो. दोन दिवस अक्षरशः वेधमय झालो होतो. डॉक्टर स्वतः दोन दिवस पूर्णवेळ आमच्याशी संवाद साधत होते, वेधच्या वाटेने नेत त्या वाटेवरचे खाचखळगे, तिथल्या आनंदाच्या, समाधानाच्या जागा त्यांच्या खास शैलीत आम्हाला दाखवत होते. वेध हा ज्ञानरंजन करणारा, आजच्या काळात हरवत चाललेल्या पण खूप आवश्यक असलेल्या मुल्यसंस्कारांची पखरण करणारा, महाराष्ट्रातच नव्हे तर यु – ट्यूबच्या माध्यमातून जगभरात पोहोचलेला अनोखा उपक्रम. आपल्या स्वप्नाचा पाठलाग करत आपले ध्येय साध्य केलेले young achievers ना डॉक्टर बोलत करत त्यांचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांसमोर माडतात. स्वतःचा आणि इतरांचा विनाअट स्वीकार, उत्तमाच्या ध्यासाबरोबरच विनम्रता, कृतज्ञता ह्या मुल्यांची जपणूक, जीवनाशी मैत्रीपूर्ण सामना अशा उच्च संस्कारांची पोतडी समोर बसलेल्या कोवळ्या मनांना दरवर्षी अधिकाधिक समृद्ध करत राहते.

वेधची ही पार्श्वभूमी सांगितल्यानंतर डॉक्टरांनी वेध हा event म्हणून कसा प्रभावीपणे साकारला जावा ह्याचे बारकावे आमच्यासमोर मांडले. त्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच पूर्ण कार्यक्रम ‘पाहता’ आला पाहिजे, हे भान दिलं. अगदी प्रवेशद्वारापासून ते backstage ला पाहुण्यांची व्यवस्था आणि session च्या प्रश्नावलीपासून कुठला स्वयंसेवक कुठे उभा आहे ह्याचे mapping इतक्या बारीक गोष्टीवर काम करण्याची दृष्टी डॉक्टरांनी आम्हाला दिली. वेध च्या आयोजनाच्या दृष्टीने teams कशा तयार कराव्यात, जवाबदार्या कशा वाटून घ्याव्यात, त्याचे follow ups कसे घ्यावेत, जमाखर्चाच गणित कसं मांडावं, आयत्या वेळी येणाऱ्या अडचणींसाठी कसे backup plans तयार असावेत, हे पद्धतशीरपणे शिकायला मिळालं. तांत्रिक भाग कसा नेटकेपणाने हाताळावा हेही विशेष सत्रांमधून आवाहनच्या सचिनदादा आणि त्यांच्या teamकडून शिकायला मिळालं. वेध चा हा कार्यक्रम त्या दिवसापुरता न राहता इंटरनेटवर कायमसाठी असणार आहे, त्यामुळे तो प्रेक्षणीय आणि तितकाच प्रभावी होण्यासाठी स्टेजचं नेपथ्य, त्याचा अवकाश(space), रंगसंगती ह्या सगळ्याचं नियोजन करण्याविषयी सविस्तरपणे सांगितलं.

आणखी एक interesting session होत group activity चं. त्यामध्ये प्रत्यक्ष theme वर काम करायचं होतं. faculties कशा निवडाव्यात, सत्रांची सुसंगती राखत हारात फुल ओवताना जी सौंदर्यदृष्टी वापरू त्या कल्पकतेने एका सूत्रात गुंफण कशी करावी ह्याचं प्रात्यक्षिक अनुभवायला मिळालं.

एकंदरीत दोन दिवसात वेधकडे जाण्याची एक स्थिर दिशा आम्हा सगळ्यांना मिळाली. वेधमध्ये मांडलेल्या प्रत्येक sessionगणिक प्रेक्षक म्हणून आपण सारेच समृद्ध होत असतो. पण हे सगळं परिश्रमपूर्वक घडवून आणतानाची प्रक्रिया तितकीच निखळ आनंदाची आणि समाधानाची असते हे सरांच्या परिपूर्ण मार्गदर्शनाने खोलवर रुजवलं आणि त्यातूनच प्रेरणा घेत आम्ही बदलापूरकर वेध नावाच्या आनंदयात्रेसाठी सज्ज आहोत!      

        आमला पटवर्धन,

आयोजक,

बदलापूर वेध

One thought on “आता वेध- बदलापूर वेधचे!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: