वेध गुजगोष्टी का?

VEDH- Vocational Education Direction and Harmony.

वेध ची सुरुवात १९९१ साली ठाणे शहरात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून  झाली. इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ या संस्थेचा वेध हा flagship प्रोजेक्ट!

     “सुदृढ मन सर्वांसाठी”या संकल्पनेला जीवननिष्ठा मानून विविध उपक्रमांची आखणी व कार्यवाही करणारे आय.पी. एच. चे संस्थापक डॉ आनंद नाडकर्णी यांचे द्रष्टेपण आज वेध या उपक्रमाची “ सामाजिक चळवळ” झाल्याचे पाहून ठळकपणे अधोरेखित होते. तीन दशकांच्या वाटचालीत वेधचे स्वरूप माहिती ते दृष्टीकोन, जीवन मूल्य ते जीवन की पाठशाला ( Life Skill Conclave ) असे बदलत गेले.    

१९९१ साली सुरु झालेला वेध आता शतकाकडे वाटचाल करत आहे. वेध सुरु होऊन ३० वर्ष झाली. २०१४ मधे पुण्यात ५० वा वेध झाला आणि आता २०२० मधे १०० वा वेध आयोजित करण्याचे भाग्यसुद्धा पुणे वेध ला लाभत आहे. वेध सुरु झाल्यानंतर जवळपास २५ वर्षानंतर ५० वा वेध झाला आणि आता ६ वर्षातच १०० वा वेध होत आहे . ही वाढ भूमिती श्रेढी ने exponential growth झाली हे फलित मोठ्या प्रमाणात समाजाला जोडले जाण्यात आहे.आज ठाणे ,नगर ,औरंगाबाद , पुणे ,नाशिक ,लातूर , कल्याण , परभणी व पेण अशा ९ शहरांना वेध ने जोडले आहे.

या सर्व वेध मधून डॉ नाडकर्णी यांनी “प्रत्यक्ष संवाद’ (Live interaction)  या माध्यमातून जवळ जवळ ७०० संवादकांचे कर्तृत्व सुमारे तीन लाख प्रेक्षकांच्या पुढे उलगडलेले  आहे .माझ्या मते हा एक जागतिक विक्रमच होय ! यातील काही मुलाखती आता avahaniph या यू ट्यूब चॅनल वर तुम्ही बघू शकाल.

वेध ची जादू समाज माध्यमांद्वारे जगभरातील मराठी माणसांपर्यंत नेण्यासाठी ‘ वेध- गुजगोष्टी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  तरुणाई पुढे आशावादाचा अंकुर रुजावा , समाजातील वेगवान बदलांवर स्वार होताना लय व गती बिघडू न देता विवेकनिष्ठा , लोकशाही मूल्य , सर्वधर्मसमभाव जपण्याची मनोभूमिका तयार करणे ,नेतृत्व गुण निर्माण करणे , चांगलं जगण्याचे पर्याय त्यांच्या पुढे आणणे हे वेध चे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत नेणे हा हेतू या ब्लॉगचा आहे .

हा ब्लॉग वेध बरोबर निगडीत असणारे संवादक ,विद्यार्थी ,पालक ,शिक्षक ,वेधचे आयोजक व इतर कार्यकर्ते यांच्या लिखाणातून सादर करण्यात येणार आहेत.आजपासून सुरु होणाऱ्या या ब्लॉगद्वारे करियर करणाऱ्या सर्वांनाच वेगवेगळे दृष्टीकोन, करियरमधे कोणती कौशल्य आत्मसाद करावी , जीवनाकडे बघताना चांगले पर्याय कसे निवडावे याचेही भान मिळेल.

सप्टेंबर २०२० मधे १०० वा वेध आहे तो पर्यंत १०० ब्लॉग आपल्या पुढे सादर करणार आहोत . आपण हे ब्लॉग निश्चित वाचावे आणि इतरांना देखील वाचावयास सांगावे.

दीपक पळशीकर,

आयोजक,

वेध- पुणे  

One thought on “वेध गुजगोष्टी का?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: